बायरन या महान कवीची "She walks in Beauty" ही कविता जेव्हा मी कॉलेजमध्ये वाचली तेव्हा अगदी प्रेमात पडले होते. मला त्या वेळेस नक्की कळलं नव्हतं की मी इतकी मंत्रमुग्ध का झाले होते पण तेव्हा "The best" वाटली होती, अजूनही वाटते. विचार करता पहिल्यांदा वाटलं की एका स्त्रीच्या पदन्यासाचं, सौंदर्याचं अप्रतिम वर्णन आहे, लक्षवेधी उपमा आहेत म्हणून असेल कदाचित. पण मग मग जशी स्वतःची ओळख होत गेली लक्षात येऊ लागलं की कारण वाटतं तितकं उथळ नाही आहे. "द्वैत आणि संतुलन यांच्या आपल्याला असलेल्या खोल आणि तीव्र आकर्षणामध्ये कुठेतरी या कवितेची गोडी दडलेली आहे.
1
She walks in beauty, like the night
Of cloudless climes and starry skies;
And all that's best of dark and bright
Meet in her aspect and her eyes:
Thus mellowed to that tender light
Which heaven to gaudy day denies.
2
One shade the more, one ray the less,
Had half impaired the nameless grace
Which waves in every raven tress,
Or softly lightens o'er her face;
Where thoughts serenely sweet express,
How pure, how dear their dwelling-place.
3
And on that cheek, and o'er that brow,
So soft, so calm, yet eloquent,
The smiles that win, the tints that glow,
But tell of days in goodness spent,
A mind at peace with all below,
A heart whose love is innocent!
ही कविताच मुळी द्वैत या एका कन्सेप्टभोवती घट्ट विणली आहे. कवितेची सुरुवातच द्वैताने होते. कवितेतील रूपगर्विता पदन्यास करीत अवकाशाच्या तृतीय मितीमध्ये पुढे पुढे सरकत आहे जशी जणू काही चांदण्यांनी नटलेली रजनी ही पदन्यास करीत काळाच्या चतुर्थ मितीमध्ये पुढे पुढे सरकत आहे. हे कडवं पारलौकिक(? ) जगातील द्वैत दाखविते.
दुसऱ्या कडव्यातच संतुलनावर, समतोलावर बायरनने भर दिला आहे. कविताविषयाच्या लावण्याचे वर्णन करताना बायरन म्हणतो - तम आणि उजळपणा यांचा अलौकिक मेळ तिच्या लावण्यात साधला गेला आहे. एखादी तमाची छटा अधिक अंधारली असती अथवा उजाळ्याची छटा अधिक उजळली असती तर तिचे सौंदर्य कुठेतरी उणावले असते. अशा रीतीने दुसऱ्या कडव्यात किती सुंदर रीतीने भौतिक जगातील द्वैत बायरन ने उलगडून दाखविले आहे. खरंच सहजसुंदर!!! केवळ महान कवीच ते करू जाणे.
पुढे पारलौकिक आणि भौतिक प्रतलावरील द्वैत मनःपातळीवर घेऊन जात बायरन मन आणि हृदय (Mind & Heart) कसे भिन्न आहेत हे सूचित करतो. या दोहोंच्या निर्मळतेमधून, विशुद्धतेमधून जे प्रतीत होते ते सौंदर्य येथे अपेक्षीत आहे. तिचे मन शांतीमध्ये वास करते तर हृदय आकंठ प्रेमात बुडून गेले आहे. ज्या व्यक्तीने केवळ चांगुलपणामध्ये दिवस कंठले आहेत केवळ अशा व्यक्तीस साध्य असे निर्मळ स्मितहास्य तिला वर म्हणून लाभले आहे.
अशा तीनही पातळ्यांच्या कसोट्यांवर सुंदर ठरलेली स्त्री कवीला सुंदर वाटते. या कवितेचा विशेष हा की कोठेही हा उल्लेख नाही की ही स्त्री बायरनची प्रेयसी आहे अथवा नाही. ते शेवटपर्यंत गूढच ठेवले आहे.
प्रतिक्रिया
21 Nov 2010 - 4:43 pm | पियुशा
मस्त !
21 Nov 2010 - 5:06 pm | डावखुरा
शुचि तै खुप छान रसग्रहण....
धन्यवाद...
21 Nov 2010 - 5:09 pm | स्पा
शुचि तै खुप छान रसग्रहण....
धन्यवाद...
असेच म्हणतो.............
21 Nov 2010 - 6:02 pm | विलासराव
कविता.
रसग्रहणही छान.
22 Nov 2010 - 7:05 pm | सुनील
या कवितेचा विशेष हा की कोठेही हा उल्लेख नाही की ही स्त्री बायरनची प्रेयसी आहे अथवा नाही. ते शेवटपर्यंत गूढच ठेवले आहे.
खॉ खॉ खॉ!!
बायरन इतका बदफैली होता की नक्की कुठल्या स्त्रीचे नाव घ्यावे असा प्रश्न त्याला पडला असावा! (हो, एकीचे घेतले की दुसरी खवळायची!)
सदर कवितेतील ही सुंदर स्त्री त्याची एक दूरची नातेवाईक असलेली विधवा बाई होती, असे समजले जाते!
कविता चांगली पण "पारलौलिक जगातील द्वैत" वगैरे सगळे झूट! साधी सरळ (आणि सुंदर) प्रेमकविता!
असो, आम्हाला बायरनच्या प्रेमकवितांपेक्षा त्याच्या ग्रीक स्वातंत्रलढ्यावरील कविता अधिक भावतात (आणि बायरनपेक्षाही त्याची कन्या अॅडा आधिक आवडते!)
23 Nov 2010 - 12:48 am | इन्द्र्राज पवार
"...या कवितेचा विशेष हा की कोठेही हा उल्लेख नाही की ही स्त्री बायरनची प्रेयसी आहे अथवा नाही....."
~ जवळपास २०० वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या एका जगप्रसिद्ध कवितेचा आस्वाद तितक्याच उत्कटतेने घेत असताना विषयातील स्त्री कोण आहे आणि तिचे कविच्या हृदयातील स्थान काय आहे, या गोष्टी म्हटल्या तर दुय्यमच असतात कारण मुळात कवितेच्या गेयतेने आणि त्यातील मनप्रसन्न भावानेच वाचक इतका चिंब झालेला असतो की त्याला प्रत्यक्ष जीवनातील दाखले शोधायची आवश्यकताच भासत नाही. ती 'स्त्री' कुणी मिसेस जॉन विलमॉट होती की बायरनची सावत्र बहीण ऑगस्टा होती, या गोष्टी फक्त साहित्याच्या इतिहासकारांच्या पोतडीतील पिसे जिच्याशी एक रसिक म्हणून काव्यप्रेमीना कसलेही सोयरसुतक नसते.
शुचिताईं कवितेबद्दल किती भारावून गेल्या आहेत हे तर त्यांच्या प्रत्येक शब्दातून रोखठोक प्रचितीस येतेच पण त्याहीपेक्षा मला भावला तो त्यानी कवितेचा तीन विविध पातळीवर केलेला विचार. कवितेचा विषयच मुळी एका स्त्रीचे विलक्षण सौंदर्य [जे त्या शोकपोशाखातून तर अधिकच खुलून दिसत असले पाहिजे] आणि त्यापोटी निर्माण झालेली प्रेमभावना. बायरनच्या सादरीकरणात तिच्या सौंदर्यामुळे आलेला उत्साह तर आहेच पण त्याचे आकर्षण हे निव्वळ शारीर पातळीवरील नसून आत्मिक अनुभूती त्याला आली आहे :
A mind at peace with all below,
A heart whose love is innocent !
ही कबुलीच बायरनचे भारावलेपण सिद्ध करण्यास पुरेसे आहे.
'उजेडा' चे अतोनात महत्व या कवितेत दिसून येते. Cloudless climes and starry skies त्या सुंदरीचे रूप आणखीनच खुलविण्यास साहाय्य करीत आहेत. Best of dark and bright तसेच Tender night हे वर्णन तिच्या उपस्थितीमुळेच झाले असून जरा काही प्रकाशांच्या त्या छ्टामध्ये फरक पडता तर तिच्या सौंदर्याचे प्रमाणच चुकले असते. बायरनने प्रत्येक शब्द तोलूनमापून घेतलेला दिसतो तो अशासाठी की कवितेच्या पहिल्या ओळीपासून ते अखेरपर्यंत वाचकाने अन्यत्र कुठेही लक्ष न देता त्या दैवी सौंदर्याकडेच आपले डोळे केन्द्रीत करावेत. या स्वयंपूर्णतेच बायरनच्या 'शी वॉक्स..." ची ताकद सामावलेली आहे. ती कविता तत्कालिन सामाजिक जाणिवेपासून दूर आहे; तिला आजुबाजूच्या घडामोडीशी कर्तव्य नाही. सर्वसामान्य घटनांशी देणेघेणे नाही तद्वतच तशी कविता एका 'विधवे' बद्दल लिहिली म्हणून निर्माण होऊ शकणार्या सामाजिक वा सांस्कृतिक समस्यांशी बायरनचा काहीच संबंध नाही.
कवितेच्या 'मीटर'च्या भाषेत She Walks in Beauty हे एक गाणे [Song] आहे आणि मीटरच्याच नियमावलीनुसार असे गाणे हे उत्कट भावना दर्शविणारे असते, शिवाय केन्द्रस्थानी विचारही एकाचा किंवा एकीचाच करावा लागतो....कल्पनाविश्वात रममाण होण्यापेक्षा "जे मला दिसते, जे मला भावले, ते मी शब्दबद्ध केले..." असे कविला म्हणायचे असते.....बायरनने नेमका हाच धागा त्या सुंदरीचे सौंदर्य टिपण्यासाठी उचलला आहे.
मराठीमध्ये पु.शि.रेगे यानी "प्रतिमे"चा हा प्रकार समर्थपणे हाताळला आहे असे जाणवते. उदाहरणादाखल त्यांची "दाणे दाळिंबाचे" ही कविता :
"दाणे दाळिंबाचे
लालभोर,
टपोर....
एकाशी एक चुस्त जुळवित मोहळ मदिर,
बुंद
एक एक जणू रूप तुझेच माझ्या मनचे,
एकाहुन एक
हरवित मिरवित अंतर....."
~ यातील रेग्यांचे "एकाशी एक चुस्त जुळवित मोहळ मदिर"....काय किंवा बायरनचे "The smiles that win, the tints that glow' ह्या दोन्ही बाबी कविमनाने सौंदर्याला दिलेली एक सलामीच होय !
थॅन्क्स शुचि फॉर गिव्हिंग मी अ रेअर चान्स ऑफ रीडिंग समथिंग स्पेशल !!
इन्द्रा
23 Nov 2010 - 2:33 am | येडाखुळा
शुचिताई, मला पी.बी.शेली ची "द इंडियन सेरेनेड" हि कविताही खूप आवडते. खाली देत आहे. तुम्ही त्याचे रसग्रहण केलेत तर..सोने पे सुहागा...
The Indian Serenade
By Percy Bysshe Shelley
I.
I arise from dreams of thee
In the first sweet sleep of night,
When the winds are breathing low,
And the stars are shining bright
I arise from dreams of thee,
And a spirit in my feet
Hath led me -- who knows how?
To thy chamber window, Sweet!
II.
The wandering airs they faint
On the dark, the silent stream --
The Champak odours fail
Like sweet thoughts in a dream;
The nightingale's complaint,
It dies upon her heart; --
As I must on thine,
Oh, belovèd as thou art!
III.
Oh lift me from the grass!
I die! I faint! I fail!
Let thy love in kisses rain
On my lips and eyelids pale.
My cheek is cold and white, alas!
My heart beats loud and fast; --
Oh! press it close to thine again,
Where it will break at last.