लहानपणी एक मस्त गोष्ट वाचली होती काहीशी अशी की एका शेतकर्याची बायको अतिशय असंतुष्ट असते आणि तिला मोठं घर हवं असतं. मग शेतकरी १ युक्ती करतो त्याच्या लहान घरातच कोंबड्या, बकर्या, गाय आणून बांधतो. खूप दिवस जातात बायको त्रागा करते करते पण शेवटी रुळते. असह्य दुर्गंधी, अजीबात जागा नसणे या गैरसोईंमध्ये दोघे रहात असतात. पुढे शेतकरी परत सगळी जनावरं गोठ्यात नेऊन बांधतो आणि बायको जाम खूष होते तिला आता तेच घर मोठं, ऐसपैस वाटू लागतं, नवरा तालेवार वाटू लागतो आणि सर्व काही आलबेल होतं.
याच तात्पर्याची गोष्ट नव्या काळातील -
आई मुलीच्या खोलीमध्ये प्रवेश करते आणि भींतीवरील मुलीच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी पाहून तिच्या पोटात खड्डा पडतो. थरथरत्या हाताने, धडधडत्या हृदयाने ती चिठ्ठी वाचू लागते.-
" आई, तू ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा माझ्या स्वप्नांच्या राजकुमाराबरोबर मी खूप खूप दूर गेले असेन. खरं तर हे लिहीताना मला दु:ख होत आहे पण काय करू, राकेश शिवाय जगणं मला शक्य नाही. आमचे प्रेम अमर आहे. राकेशला जरी गुटखा आणि दारूचे व्यसन आत्ता असले तरी मी त्याला त्यापासून सोडवेन याबद्दल तू निश्चिंत रहा. राकेश फक्त सलमान खानसारखा दिसतच नाही तर सलमान खानसारखीच त्याच्यामध्ये लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची हिंमत आहे आणि या जगात फक्त मी हे जाणते. मी फक्त १५ वर्षाची असले तरी मला बर्या वाईटाची चांगली जाण आहे. राकेश आत्ता जरी १२ वी पास असला तरी त्याला पुढे डॉक्टर होऊन एडस वर औषध शोधायचं आहे आणि त्याच्या या संशोधनात मी त्याची सहचारीण बनून साथ देणार आहे. आम्हाला खूप मुलं हवी आहेत. आम्ही दोघं लवकरच तुझं नातवंड घेऊन येऊ तेव्हा आमचं स्वागत तू आणि बाबा कराल ना ग? अरे हो एक सांगायचं राहीलं मी तिजोरीमधून तुझी मोहनमाळ, ठुशी आणि हीर्याच्या कुड्या घेऊन जात आहे नाहीतरी त्या तू मलाच दिल्या असत्यास याची मला खात्री आहे.
ता. क. - आई वरील सर्व गोष्टी खोट्या आहेत. मी शेजारी शुभांगीकडे गेले आहे. माझं निकालपत्र कपाटाच्या खालच्या कप्प्यात आहे. माझ्या निकालपत्राखेरीजही वाईट गोष्टी जगात आहेत हे सांगण्याकरता हा पत्रप्रपंच.
प्रतिक्रिया
12 Nov 2010 - 7:36 am | रन्गराव
झकास :)
12 Nov 2010 - 8:29 am | नरेशकुमार
हा लेख पोरान्नि वाचला नाहि पाहिजे, नाहितर पन्चायत होइल,
म्हनुन अध्यक्शन्ना विनन्ति हि गोश्ट उडवा.
12 Nov 2010 - 8:31 am | शुचि
काय आक्षेपार्ह आहे यात? : (
12 Nov 2010 - 8:46 am | नरेशकुमार
आक्षेपार्ह काहि नाहि.
पोरन्नि वाचला तर ते हुशार होतिल. नापास झाले कि असे पत्र तयार करतिल.
तुमचि गोश्ट छान आहे.
----------------------------------------------------------------
सहि
मलापन एक रिप्लाय द्या ना. गोगल्गाय वर.
12 Nov 2010 - 8:38 am | Pain
मूळ इंग्रजी/ पाश्चात्य गोष्ट इमेलमधून फिरत असते आणि अनेक संस्थळांवर आहे. तुम्ही तिचे मराठीकरण करण्याचा प्रयत्न करताना "अनुवादित" असे नमूद करायला हवे होते.
12 Nov 2010 - 8:46 am | शुचि
लहानपणी शेतकर्याची वाचलेली गोष्ट कोणी या गोष्टी बरोबर जोडलेली नाहीये. ती माझी युक्ती आहे आणि ही काही फार थोर साहीत्यीक कलाकृती नाहीये की "अनुवादीत" असं मी द्यावं. साधा विनोद आहे. शिवाय पूर्ण अनुवादीत नसून माझी भर आहे.
12 Nov 2010 - 8:51 am | नगरीनिरंजन
>> साधा विनोद आहे
अतिशय सहमत.
मध्यंतरी टीव्हीवर स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसंबंधी काही जाहिराती येत असत त्यातही हा प्रकार वापरलेला होता. नवीन काहीच नाही.
12 Nov 2010 - 12:02 pm | गणेशा
नविन कार्टी जास्त बदमाश झालेली आहेत
12 Nov 2010 - 12:05 pm | अवलिया
गैरसमज आहे हा.
सातवी आठवी नंतर आम्ही निकाल पत्रावर बापाची सही ठोकत होतो. आता निकालपत्र घरी देत नाहीत तोंडीच मार्क सांगतात असे घरी सांगितले होते. घरचा आणि बाहेरचा नाना हे कंप्लिट वेगळे असल्याने घरच्यांचा सहज विश्वास बसला.
अवांतर - दहावी पहिल्याच प्रयत्नात पास झालो होतो :)
12 Nov 2010 - 12:12 pm | रन्गराव
आयडीया चांगली केलीत. पण सगळी पाप ईथच फेडावी लागतात हे लक्षात असू दे नाना. आणि बापसे बेटा सवाई निघतो असे म्हणतात. उद्या तुमची पोरं तुम्हाला शेंडी लावणार नाहीत अशी प्रार्थना करा ;)
12 Nov 2010 - 12:15 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
अशी मुले पूर्वी पण असत.
अवांतर : नानांना बापाची सही करण्याची वेळ कधी आली असेल असे वाटत नाही. :)
12 Nov 2010 - 12:33 pm | चिगो
मस्त आयडीया... बाकी नाना म्हणाले तसा बापाची सही मारण्याचा प्रकार आधीही होता हे खरे..
(अनुभवी) चिगो
12 Nov 2010 - 1:24 pm | इंटरनेटस्नेही
सदर लेखाची एक कॉपी आमच्या परमैत्रीणीकडे तिच्या माहितीसाठी रवाना केली आहे!
--
(१२ वी पास) इंटेश.
12 Nov 2010 - 3:19 pm | स्पंदना
>> परमैत्रीणीकड>>>>> पर= दुसरा मैत्रीण दुसर्याची मैत्रीण?
12 Nov 2010 - 3:21 pm | स्पंदना
शुची पोरीन अगदी गुगली टाकली!!
आम्हाला काय कुणी पाठवल नाय तवा आपण तर पयल्यांदा वाचतोय लय मजा आली.
पण असली गुगली जर माझ्या पोरांनी टा़कली तर्...ती आहेत अन छडी आहे.
12 Nov 2010 - 5:08 pm | रन्गराव
पण असली गुगली जर माझ्या पोरांनी टा़कली तर्...ती आहेत अन छडी आहे.
अस करू नकात. काही मुल अशा परिस्थितित वाकन्याएवजी जास्त हट्टाला पेटतात. वचक ठेवला की पोर बिघडत नाही आणि आज्ञाधारक होतं हा गोड गैरसमज बर्याच पालकांचा ( आमच्या पालकांचा ही होता) असतो. पण धरणात तुंबलेला पाण्याचा दाब जसा वाढत जातो तसा मुलांच होत मग. दोन गोष्टी होतात एकतर तूटून ती पार शामळू होतात किंवा इतकी निगर गट्ट होतात की कशाची भिती रहात नाहीत. दोनीही गोष्टीही वाईट. मुल अशी गुगली टाकतात त्याच कारण पालक रागवतील ह्याची भिती. आणि जेंव्हा अशी वेळ येते तेंव्हा वचक अतिरेकी झालाय हे लक्षात घेवून नीट समजूत काढा. सारखा सारखा छडी दाखवायला लागलात तर छडीची परीणामकारकता कमी होते. पटल नाही तर राहू देत तसही वैयक्तीक मत आहे कुठलाही पूरावा नाही.
12 Nov 2010 - 8:31 pm | रेवती
ही एक जाहिरात बघण्यात आली होती.
http://www.youtube.com/watch?v=mb4gyT_mKOc
14 Nov 2010 - 1:26 pm | गोगोल
लेख सारिका मोकाशी नावाच्या डांबिस बाईने आपल्या नावाने मनोगतवर छापला आहे. ही पहा त्याची लिंक:
http://www.manogat.com/node/21068
14 Nov 2010 - 1:40 pm | शिल्पा ब
शुचीचच नाव सारिका मोकाशी असू शकेल किंवा ...