जीव गुंतला .. ( चाल खेळ मांडला)

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
17 Oct 2010 - 4:23 pm

खालील कविता ही पाचोळ्या प्रती मेघाची ओढ दाखवते आहे.
मेघ- पाउस .मेघ - वसुंधरा ह्यांचे नाते सर्वांना माहीत आहेच.
पण या नविन नात्याची अनोखी ओढ

प्रिय पाचोळ्या

तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई
साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई
तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी
हरवल देह भान मावळल्या नभी
झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा
वनवा ह्यो उरी पेटला... जीव गुंतला

जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला

सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा
तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला
ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा
ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला

ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी
झडलेल्या झाडापरी जीनं, अंगार, जीवाला जाळी

आस घेयी भिडायाला पीरतीची ओढ दे
बोलवीती प्रीतगान वादळात झेप घे
उसवला श्वास राजा संपला प्रवास
तरी न्हाई प्राण सोडला ... जीव गुंतला
जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला

--- तुझा मेघ

करुणशांतरसकविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 Oct 2010 - 7:35 pm | विसोबा खेचर

छान रे..