पुन्हा क्रांती

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
9 Oct 2010 - 1:20 pm

स्वार्थाचा कल्लोळ
प्रेमाचा दुष्काळ
स्नेहाचा अकाल
चोहिकडे

हिंसा आणि क्रोध
धर्म भेदाभेद
बुद्धाला निर्बुद्ध
केले आम्ही

रोज नवे पक्ष
त्यांचे नवे झेंडे
प्रत्येकाचे दांडे
मजबूत

क्रांतीबिंती काही
होणारच नाही
ऐसे काहीबाही
वाटे मज

कुत्र्याचे शेपूट
कायम वाकडे
करणारे वेडे
सरळ ते

होईल होईल
मुठी वळतील
मेलेला उठेल
चितेतूनी

चितेच्या या ज्वाला
होतील मशाल
तख्त हादरेल
माजोरडे

रयतेचे राज्य
रयतेच्या हाती
स्वप्नामध्ये क्रांती
केली हो मी....!!!

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

9 Oct 2010 - 2:49 pm | गांधीवादी

क्रांती क्रांती क्रांती,
कोणाला पाहिजे क्रांती ?
ज्यांना पाहिजे ते काय इथे येऊ शकत नाहीत.
जे इथे येतात त्यांना जसे आहे तेच बरे वाटते.

पाषाणभेद's picture

9 Oct 2010 - 6:48 pm | पाषाणभेद

मोठा अभंग वृत्तात घेतलेली मेहनत फळाला आली.
एकदम उत्तम रचना.

विसोबा खेचर's picture

9 Oct 2010 - 6:49 pm | विसोबा खेचर

रयतेचे राज्य
रयतेच्या हाती
स्वप्नामध्ये क्रांती
केली हो मी....!!!

गोखलेसाहेब,

अजून एक सुंदर कव्य..

आपली काव्ये एकसे एक असतात..!

आपला चाहता,
तात्या.

श्रावण मोडक's picture

9 Oct 2010 - 7:58 pm | श्रावण मोडक

अल्पाक्षरी चांगली.

रोज नवे पक्ष
त्यांचे नवे झेंडे

त्यावेळी वाटते
" विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती "

प्राजु's picture

11 Oct 2010 - 1:26 am | प्राजु

आवडली...
:)

राघव's picture

12 Oct 2010 - 6:52 pm | राघव

चांगली कविता.