"जमीन का पाणी" हा खेळ कोण खेळत नाही लहानपणी?
पण गंमत म्हणजे आपल्याही नकळत हा खेळ मोठेपणीदेखील चालूच रहातो.
भावनेच्या भरात वाहून जाऊन एखाद्या निर्णयाप्रत यायचं की थंड डोक्याने निर्णय घ्यायचा हा तो खेळ.
पैकी या "डाऊन टू अर्थ" - जमीनीवरच्या लोकांच्या आम्हा पाण्यातील लोकांना खूप हेवा वाटतो.
हे ना निराशेच्या भोवर्यात गटांगळ्या खातात ..... ना अतिउत्साहाच्या लाटांवर आरूढ होतात....
यांचे पाय नेहमी ठाम जमीनीवर.
कोणत्याही निर्णयात यांचं चित्त स्थिर!
नाहीतर आम्ही पामर - सतत उन्माद, हर्षोल्हास, औदासिन्याच्या थपडा खात खात हेलकावे खाणारे.
उत्साह, मरगळीच्या द्वंद्वात आलटून पालटून जखडलेले.
आज परत एकदा विश्वास बसला जगात दोन च प्रकारचे लोक आहेत - भावनाप्रधान आणि व्यवहारी , एक खेळ नेहमी नेहमी खेळला जातो - जमीन का पाणी
प्रतिक्रिया
8 Oct 2010 - 5:31 am | गांधीवादी
>>आज परत एकदा विश्वास बसला जगात दोन च प्रकारचे लोक आहेत - भावनाप्रधान आणि व्यवहारी
अजून एक प्रकारचे लोक आहेत, ते ह्या दोघांचा वापर करून घेतात, त्यांना राजकारणी असे म्हणण्याची पद्धत आहेत. आनि त्यांना नावे ठेवण्याची पद्धत नाही(पण fashion मात्र आहे.)
8 Oct 2010 - 7:43 am | पक्या
जमीन का पाणी म्हणजे कोणता खेळ?
8 Oct 2010 - 7:50 am | शुचि
असतो एक खेळ. त्याला तळ्यात की मळ्यात देखील म्हणत असावेत कदाचित . आम्ही जमीन की पाणी म्हणायचो.
8 Oct 2010 - 2:51 pm | भारतीय
आमच्याकडे या खेळास दगड का माती असेही म्हणत.. डोंगर का दरी असेही म्हणत :-)
8 Oct 2010 - 10:45 am | sneharani
आमच्याकडे हाच खेळ 'दगड की माती' असा खेळला जायचा.
8 Oct 2010 - 11:15 am | विसोबा खेचर
सुंदर प्रकटन.. मनापासून आवडलं..!
तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
8 Oct 2010 - 11:32 am | वेताळ
मला खुप कौतुक वाटते.
8 Oct 2010 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार
मला तर खरे अशा लेखनाचेच खुप कौतुक वाटते.
सतत येवढे टुकार रटाळ भिकार आणि भकास लेखन करण्यासाठी सुद्धा फार अभ्यास लागतो म्हणे :)
8 Oct 2010 - 12:05 pm | रणजित चितळे
द्वंद्व हे माणसाच्या जातीला आलेला वारसा आहे. माणसाला निवड बुद्धी देउन घोटाळा झाला आहे. टुबी - नॉट टुबी, द्वैत - अद्वैत, करावं का मरावं, हे का ते, असे का तसे जिवनात सारखे चालले असते. त्याचीच तोंड ओळख लहानपणीच्या खेळात मिळते पहायला. तळ्यात का मळ्यात, विष- अमृत, दगड का माती, जमीन का पाऊस ...............
जिवना बद्दलची टिप्पणी खुप आवडली
8 Oct 2010 - 12:10 pm | सहज
तळ्यात का मळ्यात / जमीन का पाणी खेळ काय हे तरी समजुन सांगा म्हणजे हा धागा दोनदा क्लिकवल्याचे सार्थक तरी होईल.
8 Oct 2010 - 6:48 pm | अवलिया
तो सामान्य जनतेचा खेळ आहे आपल्यासारख्या उच्चभ्रुंसाठी नाही.. तुम्ही डॉक्टर डॉक्टर खेळा
8 Oct 2010 - 1:13 pm | इंटरनेटस्नेही
शुचि ताई.. चांगला धागा आहे.. जी गोष्ट नेहेमीच आपल्या बघण्यात / माहितीत असते तिचा असा रिलेव्हन्स, फिलॉसॉफिशी लावणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. ते समोर आणणयासाठी देखील एक प्रकारची व्हिजन लागते. ती तुमच्याकडे आहे.
बाकी लेखातल्या विषयाबद्दल बोलायचे झाले, तर मी देखील सहमत आहे... अतिशय दुर्दैवाने सध्याच्या जगात केवळ व्यवहारी माणसेच दिसुन येतात.
(कायम पाण्या बरोबर वाहत जाणारा) इंट्या.
8 Oct 2010 - 6:48 pm | अवलिया
सुरेख प्रकटन.