सुसाट......... नादखुळे विनोदः
१)
गब्बर : " ये हात मुझे दे दे ठाकूर..."
ठाकूर (वैतागून) : घे, माझे हाथ घे, विरू चे हात घे, जय चे हात घे, बसंतीचे पण हात घे...सगळे हात गोळा कर आणि दुर्गा माता बन...
गब्बर : माफ कर यार, तू तो sentimental हो गया ....
***********************************************************************
२)
रशियन डोअरकीपरचे नाव काय असेल सांगा बरं?
- "उभाका बसकी"
जपानी हॉस्पिटलच्या बाहेर Silent Zone असतो, तिथल्या पाटीवर काय लिहीलेले असते?
- "हाकानका मारू"
चीनी शाळेचे नाव काय असेल?
- "या शिका"
सिंगापूरमध्ये एक उंच इमारत असते. त्या इमारतीच्या टेरेसवर एक सूचना फलक असतो. त्यावर काय लिहिलेले असेल?
- "वाकू नका"
आफ्रिकन स्विमींग पूल चे नाव काय असेल?
- "या डुंबा डुंब डुम"
***********************************************************************
३)
परीक्षेच्या RESULT नंतर:
जर चांगले गुण मिळून पास झाला तर…
शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा
...बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच ...
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि...
जर नापास झाला तर….
शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस .
.
.
.
पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच....
-
-
-
सगळे बदलतात पण मित्र नाही.
*********************************************************************************
४)
शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर
शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा
थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले,
'' महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?''
...
'' अगं काही नाही गं... हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता''
************************************************************************************
५)
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते....
नवरा बायकोला चिडवण्यासाठी म्हणतो, "ती बघ तुझी नातेवाईक..!"
.
....
.
.
.
.
.
.
.
बायको : अय्या....!!! सासूबाई !!!!!
*************************************************************************
६)
घोर कलियुग -
एक मुलगा बस स्टॊपवर एका मुलीला छेडतो.
मुलगी - तुझ्या घरी आई-बहीण नाहीयेत का?
मुलगा - नाही.
.
.
.
.
मुलगी - मग चल ना तुझ्या घरी जाऊ,इथे काय टाईमपास करतोयस!!!!!!!
*****************************************************************************
७)
भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...!
.
.
.
.
....
घरमालक:- अरेSSS....., १५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का????
**********************************************************************************
८)
हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?
बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.
हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???
...
बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ..!!
प्रतिक्रिया
7 Oct 2010 - 3:14 pm | आप्पा
गर्लफ्रेण्डच्या नखऱ्यांना वैतागलेला बंडु ठरवतो, 'या बायकांना समजून घेणं कठीण
असतं... मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही.... आणि
माझ्या मुलांनाही हाच सल्ला देईन!!'
7 Oct 2010 - 6:57 pm | मृत्युन्जय
हॅ हॅ हॅ. हे सत्यात पण उतरु शकते. विनोदाची गोष्ट नाही काही ही
7 Oct 2010 - 3:18 pm | Arun Powar
एका स्टेशन वर ट्रेन थांबते..
Passenger: कोणते स्टेशन आहे?
Platform वरचा माणूस: अरे टवळ्या, बाहेर येऊन बघ की स्वत: .. आळशी नुसता.. बसल्या जागी पाहिजे सगळं.. डोळे फुटले का तुझे?
....
.
.
Passenger: अरे वा पुणे आलं की !! :-D
7 Oct 2010 - 6:59 pm | मृत्युन्जय
हे पुणे असणे शक्य नाही. पुण्यात किमान शब्दात कमाल अपमान करतात. अपमान करण्यासाठी एवढे शब्द वापरण्याची गरज किमान पुणेकरांना तरी नाही. आणि पुणेकर अपमान करताना चिडत नाहीत. ते फक्त तिरकसपणे तिरसटपणे बोलतात. त्यात कमाल अपमान भरलेला असतो
7 Oct 2010 - 7:18 pm | योगप्रभू
अस्सल पुणेकर फक्त इतकंच विचारेल
'कुठून आलात?'
7 Oct 2010 - 7:20 pm | धमाल मुलगा
प्लॅटफॉर्मवरचा माणूस मागच्या बोर्डाकडं बोट करुन गाडीतल्या माणसाला विचारतो, "आपण अशिक्षित का?"
प्रवासी: अरे वा! पुणं आलं की.
7 Oct 2010 - 9:42 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मृत्यूंजया....
१ लंबर....!
7 Oct 2010 - 3:19 pm | Arun Powar
सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ??
.
.
...
.
.
.
.
.
.
.
मला जाऊ द्या न घरी ....................आता वाजले कि बारा....
7 Oct 2010 - 7:00 pm | मृत्युन्जय
हीहीहीहीही. हे बेष्ट आहे.
7 Oct 2010 - 3:21 pm | Arun Powar
एकदा एक माणूस नदीत बुडत असतो...आणि ओरडत असतो, "बाप्पा मला वाचवा, बाप्पा मला वाचवा!!"
तिथे गणपती बाप्पा प्रकट होतात आणि जोरजोरात नाचू लागतात ...
तो माणूस म्हणतो, "बाप्पा मला वाचवायचं सोडून नाचताय काय?"
...
......
बाप्पा म्हणतात...."वा रे वा !, माझ्या विसर्जनाच्या वेळेला किती जोरजोरात नाचत होतास!!
7 Oct 2010 - 3:23 pm | Arun Powar
एकदा एक बाळ इस्पितळात जन्माला येते.
तेव्हा नर्स त्याला विचारते,"बाळा ,तुझे नाश्ता-पाणी तर झालेच असेल ?"
तेव्हा ते म्हणते,"च्या मारी !,परत सदाशिव पेठेतच जन्माला आलो वाटते ."
7 Oct 2010 - 7:02 pm | मृत्युन्जय
बाळा ,तुझे नाश्ता-पाणी तर झालेच असेल ?"
लै ओढुन ताणुन विनोद होता बरं का हा. (हा विनोद आहे असे तुम्हाला म्हणायचे असेल तर). जगातली कुठली नर्स नवजात अर्भकाला नाष्टा पाणी झाले का म्हणुन विचारते?
7 Oct 2010 - 11:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"इनो घ्या मालक!"
-- नक्की मिपावर पोहोचला आहात.
8 Oct 2010 - 12:31 am | मृत्युन्जय
इनो घेतल्यावर हा इनोद वाटायला लागेल का?
7 Oct 2010 - 3:28 pm | Arun Powar
एक इंग्लिश माणूस कोल्हापूरला मराठी शिकायला आला आणि १५ दिवस राहिला..
शेवटी तो २ वाक्येच शिकला:
१. अरे वा! लाईट आले !!
..
..
..
२. च्या मारी, परत गेले !!
7 Oct 2010 - 3:32 pm | विजुभाऊ
पुण्यातील दुकानातील अफ्रीकन बोर्ड:
बंबाला पिंपाला कॉईल लावून मिळेल
7 Oct 2010 - 7:03 pm | मृत्युन्जय
विजुभौ कुठे आहे हा बोर्ड? अजुन तो श्राद्धाचा बोर्ड कुठे आहे ते पण नाही सांगितले तुम्ही.
7 Oct 2010 - 5:44 pm | नाना बेरके
हा.. हा.. विजुभाऊ. लै भारी. हा खरा नादखुळा विनोद.
8 Oct 2010 - 11:24 pm | उपेन्द्र
एकदा एक पोपट एका ट्रकला धडकला.. ट्रकवाल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत घरी पिंजर्यात नेऊन ठेवला..
जाग आल्यावर समोर पिंजर्याचे गज बघून पोपट म्हणाला....
..
..
..
..
..
"आयला... जेल... ट्रकवाला मेला बहुतेक टकरीत... !!"