आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे ..

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
16 Apr 2008 - 4:23 pm

तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु.
तुला आठवतो का ग आपला एखादा प्रवास ? मला खिडकीचीच जागा हवी म्हणुन हट्ट असायचा तुझा, अन जागा मिळाल्यावर काय तो ओसंडुन वहाणारा आनंद. गाडी हलली - जssरा गार वारा लागला की बोलता बोलता आपसुक डोळे मिटायचे तुझे आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे. खाचखळग्यात झटका बसुन तुझे डोके पुढे आदळु नये म्हणुन दुसर्‍या हाताने मी तुझ्या हनुवटीला अलगद आधार देउन ठेवायचो. भुरभुर उडणारे तुझे केस माझ्या कानाला, गालांना गुदगुल्या करायचे आणी मग शेवटी न रहावुन मी त्यांना सावरायचा प्रयत्न करायचो, या सगळ्यात तुझा डोळा उघडायचा आणी मग तु मला रागे भरायचीस,
"काय रे! दोन मिनीटे काही जिवाला शांत बसु देणार नाहीस, आत्ता कुठे थोडा डोळा लागला होता तर ...".
असं थोडं काही मनाविरुद्ध झालं की लगेच रुसायचीस तु, गाल फुगवुन बसायचीस आणी दोन मिनीटात बाहेरची गम्मत जम्मत पाहण्यात रमुन पण जायचीस. माझ्या हाताला लागलेली कळ कधी लक्षात आली होती का ग तुझ्या ?

हा आणी असेच कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवुन गेलीस तु, अशाच एका एका प्रवासात अलविदा म्हणालीस अन नव्या प्रवासाला निघुन गेलीस नव्या दिशेला. तुझा तो अलविदा कळायला मला जरा उशीरच झाला. माझा तर प्रवासच खुंटावला आणी दिशा पण हरवल्या, जसा झोकात उडणारा एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा.

आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे
दुनिया ने फिर न पूछा, लूटा है मुझको कैसे
न किसी का साथ है, न किसी का संग
मेरी ज़िंदगी है क्या.............

मुक्तक

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

16 Apr 2008 - 4:36 pm | धमाल मुलगा

आंद्या, छानच रे.

क्षणभर वाटलं चोरुन कोणाची तरी डायरी वाचतोय.

तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु.

:-) ही 'तीला' तिच्या लहानपणी कशी दिसत असेल ते पाहण्याची कल्पना आवडली. मस्त.

आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे. खाचखळग्यात झटका बसुन तुझे डोके पुढे आदळु नये म्हणुन दुसर्‍या हाताने मी तुझ्या हनुवटीला अलगद आधार देउन ठेवायचो. भुरभुर उडणारे तुझे केस माझ्या कानाला, गालांना गुदगुल्या करायचे आणी मग शेवटी न रहावुन मी त्यांना सावरायचा प्रयत्न करायचो,

चित्रच आलं डोळ्यापुढे.

माझ्या हाताला लागलेली कळ कधी लक्षात आली होती का ग तुझ्या ?

क्या बात है! स्विट अँड सिंपल. हृदयातल्या कळेला हाताच्या कळेचं रुप देऊन विचारलेला प्रश्न !

छोटसंच पण मस्त झालंय !
साला, अंदर दबाया हुआ दर्द क्यों झिंजोडते हो ज़नाब? हम तो खुश थे उसे भूला के, क्यों याद दिलाते हो जनाब?

- (लैलेने हाकललेला, हीर पासून दुरावलेला, सोणीला विसरण्याच्या प्रयत्नात) ध मा ल.

मनस्वी's picture

16 Apr 2008 - 4:43 pm | मनस्वी

चित्र, लेखन, रुपक - सगळंच छान.

एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा.

पुढच्या वेळी कामटी आणि मांजा दोन्ही मजबूत घ्या, येवढेच म्हणेन.

निनाद's picture

16 Apr 2008 - 4:56 pm | निनाद

लेखन छानच आछा.

वरचे प्रकाशचित्र मला ऑस्ट्रेलियातील हॉल्स गॅप या ठिकाणाचे वाटले.
तिथे असाच एक कडा आहे. आणि खाली खोल दरी.
आपल्या लेखना इतकेच सुंदर ठिकाण आहे हे.

-निनाद

विसोबा खेचर's picture

16 Apr 2008 - 5:21 pm | विसोबा खेचर

क्या बात है! अतिशय सुरेख लिहिलं आहे...

जियो...!

तात्या.

शितल's picture

16 Apr 2008 - 5:41 pm | शितल

मनाला हळ्वा करणारा लेख, एकदम ह्यदय पाघळ्वणारा
पण, काय मी म्हणते,सरळ सरळ तीला आपल विचारुन टाकुन मग खा॑द्यावर डोके टेवायला द्यायचे होते ना, (just kidding ,don't take it serious) शब्द स॑कलन उत्तम, आणि फोटो पाहुन तर आता खाली पडते की न॑तर असे वाटते. डोळ्यात पाणी आणलत हो आमच्या.

पिस्तुल्या's picture

16 Apr 2008 - 6:47 pm | पिस्तुल्या

आपले लेख आम्हाला फार आवडले. असेच लेखन करत रहा.
पिस्तुल्या.

प्रमोद देव's picture

16 Apr 2008 - 7:49 pm | प्रमोद देव
धनंजय's picture

17 Apr 2008 - 3:05 am | धनंजय

नि:शब्द करून टाकले.

नंदन's picture

17 Apr 2008 - 5:04 am | नंदन

म्हणतो. सुरेख लिहिलंय.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

इनोबा म्हणे's picture

16 Apr 2008 - 7:53 pm | इनोबा म्हणे

चित्र आणि लेखन दोन्हीही आवडले.

जसा झोकात उडणारा एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा.
हे रुपक तर खासच..

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

लिखाळ's picture

8 Oct 2008 - 12:23 am | लिखाळ

आनंदयात्री,
लेख छान आहे. पतंग-लहान मुलाचे रूपक आवडले.
पु ले शु
--लिखाळ.

छोटा डॉन's picture

16 Apr 2008 - 7:57 pm | छोटा डॉन

आता ह्या आंद्याने एवढ्या "कमी शब्दात एवढा भारी लेख" लिहला, त्याला मोठा प्रतिसाद देणे बरोबर नाही ....

एकच शब्द " अप्रतिम " ...

"तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु."
च्यायला, सगळी मंडळी हाच डायलाक मारतात का ?
मला वाटलं आमचं राखीव कुरण आहे ते, पोरगी बाकी लै खूष होती असं ऐकल्यावर !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2008 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कमी शब्दात अधिक हळवा आशय व्यक्त झालाय.
आणि अस्स हळवं करणारं कोणी लिहिलं की मलाही तिचे-

''असेच कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवुन गेलीस तु, अशाच एका एका प्रवासात अलविदा म्हणालीस अन नव्या प्रवासाला निघुन गेलीस नव्या दिशेला''

आठवते रे !!!

आपला,
कटलेला एक पतंग

विजुभाऊ's picture

16 Apr 2008 - 8:32 pm | विजुभाऊ

"तू बोलताना तुला पहायला आवडते.
तुझ्या कानातले डूल हालताना पाहुन मलाच डोलायला होते"

आन्द्या माझ्यातला कवी जागृत करु नकोस रे.
सहजच छेडुन ;उगाच भूतकाळात रमायला लावु नकोस रे.

चतुरंग's picture

17 Apr 2008 - 3:30 am | चतुरंग

एक सुळका खडकाचा
तिरपा, खोल दरीवरचा
माणुस टोकावरचा
काय पाही न कळे?

चतुरंग

शितल's picture

17 Apr 2008 - 6:04 am | शितल

क्षणभर वाटलं चोरुन कोणाची तरी डायरी वाचतोय.

लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव.

धमाल मुलगा's picture

17 Apr 2008 - 11:53 am | धमाल मुलगा

लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव.

तुम्हाला कोणि सांगितलं शितलताई?

-(आचरट, उचापात्या) ध मा ल.

शरुबाबा's picture

17 Apr 2008 - 11:13 am | शरुबाबा

चित्र आणि लेखन दोन्हीही आवडले.

शितल's picture

17 Apr 2008 - 6:32 pm | शितल

लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव.
तुम्हाला कोणि सांगितलं शितलताई?
-(आचरट, उचापात्या) ध मा ल.

अरे, धमाल्या कोणि म्हणुन काय इचारतल्॑स, तु माका ताई मानतल्॑स, म्हणुन सा॑गतेलय माका ठाव हाय लहानग्याच्या उचापात्या.

नीलकांत's picture

17 Apr 2008 - 11:04 pm | नीलकांत

खुपच छान लिहीले आहे हो. एकदम मस्त.

नीलकांत

आनंदयात्री's picture

18 Apr 2008 - 10:06 am | आनंदयात्री

केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद.

-आनंदयात्री.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2008 - 9:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आंद्या, काय मस्त लिहिलं आहेस रे! मी आत्ताच पाहिलं!

आणि आता कितीतरी महिन्यात लिहिलं नाही आहेस याचीही आठवण झाली. तेव्हा लिहा, नुस्त्या खरडवह्या भरवू नका!

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2008 - 11:56 pm | बिपिन कार्यकर्ते

आज्जीशी सहमत.... आज्जीचं ऐका जरा... X(

बिपिन.

मेघना भुस्कुटे's picture

8 Oct 2008 - 10:06 am | मेघना भुस्कुटे

होय, अगदी असंच म्हणते. लिही लवकर कायतरी टोण्या...

यशोधरा's picture

7 Oct 2008 - 9:56 pm | यशोधरा

सुरेख मुक्तक!

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2008 - 10:04 pm | प्रभाकर पेठकर

मी सुद्धा आत्ताच वाचलं. छान आहे प्रकटन. स्मृती पटलावरील भावनांची हळुवार झुळूकच म्हणायची. पण, किंचित त्रासच देणारी.

टारझन's picture

7 Oct 2008 - 11:23 pm | टारझन

जबरा रे आंद्या ... क्लास .. आणि एक णंबर... आणंदयात्री .. आपण आणंदाणे सर्व प्रवास करा .. मुव्ह लगावं (मुव्ह ऑन) आह से आहा तक ...

(मणकी बांते : च्यायला टार्‍या तु तर ल्हानपनी नुस्ती लाइन मारून झुरलास .. तुझ्या ना खांद्यावर डोका ठेवला कुणी ना कुणी तुला अलविदा केला ... तु तर फक्त झुरळासारखा झुरलास :) )
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

झकासराव's picture

7 Oct 2008 - 11:37 pm | झकासराव

आंद्या,.
जबरा लिहिल आहेस रे. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

बेसनलाडू's picture

8 Oct 2008 - 12:05 am | बेसनलाडू

(आस्वादक)बेसनलाडू

अनिल हटेला's picture

8 Oct 2008 - 9:16 am | अनिल हटेला

छान मुक्तक !!

आवडले !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण's picture

8 Oct 2008 - 9:42 am | मदनबाण

आनंदराव लयं मस्त...

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

शिप्रा's picture

8 Oct 2008 - 10:16 am | शिप्रा

खुप छान लिहिले आहे..पुढचे लेखन लगेच येऊ दे..

विजुभाऊ's picture

8 Oct 2008 - 10:53 am | विजुभाऊ

तुझे भुरभुरणारे केस माझ्या गालांशी रुंजी घालत होते. तो गुदगुल्या करणारा तो स्पर्ष मला हवाहवासा वाटत होता.
तुझ्या चेहेर्‍यावरचा निरागसपणा आणि मधुनच तुझ्या गालावर येणारे ते स्मित; मी त्यात हरवुन गेलो
ये गेसुओ़ की लट ;
हवासे लहराती है;
मै बच्चा बन जाता हुं
छुपकर उन लटों का झुला बनाकर
मन ही मन थोडासा झूल लेता हुं
विजुभाऊ सातारवी

टुकुल's picture

8 Oct 2008 - 11:09 am | टुकुल

आंद्या नि तर जबरा लिहिल आहे आणि त्यात तुम्ही अजुन थोडी भर टाकली विजुभौ, अजुनही येवुद्यात

विजुभाऊ's picture

8 Oct 2008 - 12:23 pm | विजुभाऊ

आज होली है
लाल नीला पीला हरा गुलाबी
कई रंग है गालों पर
उनमेसे एक रंग वो भी है;
जो तुम्हारे रंगे होने के खयालसे ही
उभरा है गालो पर

डोमकावळा's picture

8 Oct 2008 - 12:54 pm | डोमकावळा

मस्तच लिहीलय.
आणि चित्रही लेखात अगदी प्रभावीपणे भावना भरतय.

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

विजुभाऊ's picture

8 Oct 2008 - 1:06 pm | विजुभाऊ

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
काव काव करता तीरपी करुन मान ; माशाचा तुकडा दिसतो कोठे? याचे ठेवावे भान

विजुभाऊ's picture

10 Oct 2008 - 11:42 am | विजुभाऊ

मै तुम्हारी बातों का यकीन तो नही करता
पर क्या करु तुम्हारी आंखोने मुझे कही का नही छोडा था.

ऋचा's picture

10 Oct 2008 - 12:18 pm | ऋचा

जब्राट लिहिलस रे!!
सही
चित्र आल डोळ्यासमोर :)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चिंचाबोरे's picture

10 Oct 2008 - 12:38 pm | चिंचाबोरे

केवळ १५-२० ओळित डोळ्यात पाणी आणलंत कि राव तुम्ही!! अरे एवढं हळवं आणि सुंदर लिखाण आम्ही कसं वाचायचं?