मनसे गीत

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
29 Sep 2010 - 2:22 pm

मनसे गीत

मनसेचे सैनीक आम्ही....हो हो हो
आम्ही मराठीसाठी लढणार
हिंदूस्थानी राहूनहीहो
आम्ही मराठीपण जपणार ||धृ||

कितीक नडले त्यांना भरडू
कितीक चिडले त्यांना चिरडू
आडवे आले त्यांना कापून काढू
आम्ही शरण कुणा न जाणार ||१||

महाराष्ट्र नवनिर्मीण्या पुढे सरसावू
समृद्धी अन विकास पाहू
महाराष्ट्र अन मराठी असे ध्येय आमुचे
आम्ही मराठी भाषा वैभवासी नेणार ||२||

विविध जाती, पंथ निराळे
धर्म वेगळा, वर्ग निराळे
मनसेच्या ध्वजाखाली एकत्र करणार
आम्ही महाराष्ट्र नवनिर्मीणार ||३||

असो कुणी हिंदू वा असो कुणी मुस्लीम
राहो कुणी बौद्ध वा राहो कुणी ख्रिश्चन
जात न मानू आम्ही धर्म न कोणता मानू
आम्ही सारे मराठीचे मुले होणार ||४||

समस्या असोत कितीही आम्ही सोडवू
मराठी आड कोण येई त्यांना फोडू
नवरचना करण्या, संघर्ष करण्या
आम्ही हाती हात धरून कामे करणार ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
मनसे सैनीक
२९/०९/२०१०

वीररसकविता

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

29 Sep 2010 - 3:08 pm | गांधीवादी

आम्ही पण मनसे सैनिक.

गणेशा's picture

29 Sep 2010 - 4:05 pm | गणेशा

छान आहे .. आवडले ..

विशाल कुलकर्णी's picture

29 Sep 2010 - 4:08 pm | विशाल कुलकर्णी

झकास :)

इंटरनेटस्नेही's picture

29 Sep 2010 - 6:09 pm | इंटरनेटस्नेही

गीत चांगले आहे. पण चाल ही शिवसेना गीताची थेट नक्कल वाटते.

इंस्ने, तुला ज्या अर्थी नक्कल वाटते त्या अर्थी तू हे गीत गावून म्हटले आहे असे वाटते.
जरा चाल सांग म्हणजे लगेचच आपल्याला समजेल की चाल सारखी आहे की वेगळी.
अरे, शिवसेना अन मनसेचे वैर त्यांच्यापाशीच राहू दे. आपण सामान्य कार्यकर्ते आहोत, सतरंज्या उचलणारे!

तू तू मी मी सोडून गाण्याचा आस्वाद घे फक्त.
:-)
अवांतर: अभ्यास चालू आहे की नाही बाबा?

संजयशिवाजीरावगडगे's picture

29 Sep 2010 - 8:52 pm | संजयशिवाजीरावगडगे

लई भारी!!! झक्कास !!@!!

आमोद शिंदे's picture

29 Sep 2010 - 8:57 pm | आमोद शिंदे

मराठीला काळीमा फासणार्‍या मनसेच्या विरोधात असल्याने ह्या कवितेला आमचा पास!

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 8:55 am | शिल्पा ब

कसा आणि कुठे मराठीला काळीमा फासला मनसेने? कृपया सांगाल का? नाही म्हणजे सांगाच हा आग्रह आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Sep 2010 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गांधीवादी's picture

30 Sep 2010 - 5:23 am | गांधीवादी

>>मनसे ला कविता जरुर पाठवा.......!
सगळ्यांच्या प्रतीसादासहित (विशेष करून आमच्या प्रतिसदासाहित)
मनसेचे मांस किलो किलोने वाढेल.

पाषाणभेद's picture

30 Sep 2010 - 7:33 am | पाषाणभेद

काळजी करू नका. पाठवलेली आहे. त्यांचा प्रतिसाद येतोच. अन या धाग्याची लिंकही पाठवलेले आहे.

कशिद's picture

29 Sep 2010 - 9:38 pm | कशिद

आम्ही पण मनसे सैनिक