मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवा

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
28 Sep 2010 - 11:41 am

काल रात्री घासूगुर्जीचा स्वप्नांचा कौल  आणि आमच्या कशे कावळे येती आणिक...या विडंबनाला शुचितैनि दिलेला प्रतिसाद वाचून झोपलो, पण नेहमी सारखी गाढ झोप काही येईना, मध्यरात्री गदिमांचा मोर आमच्या स्वप्नात नाचू लागला आणि आम्ही झोपेतच गाण म्हणायला सुरुवात केली मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवाबाई मला प्रतिसाद ठासू हवाटाकला सैलसर सवाल धाग्यावरीघावला अतरंगी बकरा ग त्यावरीमोकळे करा या मनास जालावरीपितरं आली कितीदा स्वप्नी मोजून हळू टंकवात्या विडंबनातील अंजन लई झोंबतेक्युरीऑसीटी कुठे पण माझी थांबतेफिरफिरुनी फुटकळ धागे मी काढतेसार्‍या जाली प्रसिद्ध झाला पितरांचा चांदवाबघ चीज कराया येतील गुर्जी तेकिती हुषार, त्यांच्या गुणास मी जाणतेपहा कौला त्यांच्या नगरी वाखाणतेअक्कल नाही , तुला जरा ही कळते हे "केशवा"

विडंबन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Sep 2010 - 11:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खल्लास! (हसून हसून) अल्ला जीव गेला!!

नगरीनिरंजन's picture

28 Sep 2010 - 11:50 am | नगरीनिरंजन

:-) केशवसुमार, तुमच्या विडंबनाला काही सुमार नाही पण खुमार लै आहे.

Nile's picture

28 Sep 2010 - 11:55 am | Nile

बघ चीज कराया येतील गुर्जी ते
किती हुषार, त्यांच्या गुणास मी जाणते
पहा कौला त्यांच्या नगरी वाखाणते

धमाल!

मिसळभोक्ता's picture

28 Sep 2010 - 11:58 am | मिसळभोक्ता

धासू विडंबन आहे, अपेक्षेप्रमाणे.

अर्थात, ह्या मीटर वर तुमची हुकुमत आहेच म्हणा.

(संदर्भः प्रतिसाद विजुभै..)
(स्पष्टीकरणः सदर विडंबन "म्यानातुन उसळे..." ह्या मीटर मध्ये म्हणावे. दर शेवटच्या शब्दात एक गुरू जोडावा.)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2010 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा टोचा मारुन वातावरण अगदी हलके केलेत हो गुर्जी.

गुर्जींवर माझे प्रेम आहे, म्हणजे त्यांच्या लिखाणावर.*

*वरील प्रतिसाद हा पुर्णपणे काल्पनीक असुन त्याचे कुठल्याही वा कोणीही कोणालाही उद्देशुन लिहिलेल्या जुन्या प्रतिसादाशी काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

नावातकायआहे's picture

28 Sep 2010 - 12:08 pm | नावातकायआहे

>>फिरफिरुनी फुटकळ धागे मी काढते
सार्‍या जाली प्रसिद्ध झाला पितरांचा चांदवा

जय हो!!

हाहाहा :D

फार आवडले. खूप पिसे काढालीत :)

निखिल देशपांडे's picture

28 Sep 2010 - 12:19 pm | निखिल देशपांडे

केसु केसु
तुमचे चरण कुठे आहेत हो???

खरच. काय ही प्रतिभा!

हे हे हे
टोचे कसे मारावे ते आमच्या केसुकाकंना विचारा ;) *

*वरील प्रतिसाद हा पुर्णपणे काल्पनीक असुन त्याचे कुठल्याही वा कोणीही कोणालाही उद्देशुन लिहिलेल्या जुन्या प्रतिसादाशी काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2010 - 1:06 pm | बिपिन कार्यकर्ते

अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला!!! अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला!!! * आज सकाळी सकाळी गुर्जींनी हे विडंबन दाखवले आणि दिवस चांगला सुरू झाला.

*वरील प्रतिसाद हा पुर्णपणे सत्य असुन त्याचे कुठल्याही वा कोणीही कोणालाही उद्देशुन लिहिलेल्या जुन्या प्रतिसादाशी काही साम्य आढळल्यास तो निव्वळ हेतूपूर्वक समजावा.

हॅ हॅ हॅ ..
लै भारी केसुशेठ.. महान आहात तुम्ही
च्यायला, लैच पाणचट चालल होत, काही हि झाल कि काढा धागा

--टुकुल

सुहास..'s picture

28 Sep 2010 - 1:31 pm | सुहास..

मार डाSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSला !!!!!!!!

चिंतामणी's picture

28 Sep 2010 - 3:41 pm | चिंतामणी

खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास

खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास

;)

आमोद शिंदे's picture

28 Sep 2010 - 10:14 pm | आमोद शिंदे

कहर आहे!!!

श्रावण मोडक's picture

28 Sep 2010 - 4:28 pm | श्रावण मोडक

काय खरं नाही आज. मरतोय, हसून हसून...

वेताळ's picture

28 Sep 2010 - 5:08 pm | वेताळ

अजुन किती दिवस ही पापी पितर येणार नाना जाणे.
अशा फुटकळ धाग्यामुळे चांगले वाचनिय धागे पाठीमागे पडतात. त्यामुळे असल्या धाग्यावर चाप हा हवाच.

सहमत आहे. शांती करावी लागेल.

प्रियाली's picture

28 Sep 2010 - 5:08 pm | प्रियाली

खल्लास! फुटकळ धाग्यांवर विडंबन हा रामबाण उपाय आहे हेच खरे. ;)

मुक्तसुनीत's picture

28 Sep 2010 - 5:11 pm | मुक्तसुनीत

मिपाच्या या काशीवरि खेळतो "सुमार" !
गहिवरले जीव "वरी" , सुटले पितर ! ;-)

तिमा's picture

28 Sep 2010 - 6:16 pm | तिमा

छान भुस्काट पाडलं व तुमी त्या सर्वपित्रीचं!

पितृपक्षांत 'सुतरफेणीला' ही पितरफेणी म्हणतात का हो ?

ठिकठाक विडंबन!
तुमची आधीची ग्रेट विडंबने वाचली असल्याने हे फारसे पसंतीस उतरले नाही.

शिल्पा ब's picture

28 Sep 2010 - 10:30 pm | शिल्पा ब

विडंबन छान.

राजेश घासकडवी's picture

29 Sep 2010 - 2:37 am | राजेश घासकडवी

चांगलं विडंबन... मीटरातला घोळा मुक्तसुनीत अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील.

अक्कल नाही , तुला जरा ही कळते हे "केशवा"

मधील केशवा हे संबोधन आहे हे चटकन लक्षात येत नाही. :)

चतुरंग's picture

29 Sep 2010 - 5:46 am | चतुरंग

काय गुर्जी जोरदार आतषबाजी सुरु आहे! एवढ्यात दिवाळीचे वेध लागले वाट्टं! ;)

(नाचरा)मोररंग

अविनाशकुलकर्णी's picture

29 Sep 2010 - 7:05 am | अविनाशकुलकर्णी

मस्त..केशव सुमार नाहि..केशव कुमार

अमोल केळकर's picture

29 Sep 2010 - 9:33 am | अमोल केळकर

मस्त . मजा आली :)

अमोल

रामदास's picture

29 Sep 2010 - 10:37 am | रामदास

एक विडंबन येणार असेल तर फुटकळ धाग्यांचे स्वागत आहे.

केशवसुमार's picture

29 Sep 2010 - 10:44 am | केशवसुमार

रामदसशेठ,
बच्चे की जान लोगे क्या?
(बच्चा)केशवसुमार
त्या धाग्यांच्या रेट्या पुढे विडंबनाचा रेट खूप कमी पडेल..
(इ स्लो)केशवसुमार

केशवसुमार's picture

29 Sep 2010 - 12:23 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार

आजानुकर्ण's picture

3 Nov 2010 - 7:43 pm | आजानुकर्ण

केशवराव,

विडंबन आवडले.

नरेशकुमार's picture

4 Nov 2010 - 8:32 am | नरेशकुमार

हॅ हॅ हॅ हॅ हॅ