मिसळपावच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार,
मिसळपाववर मी (सध्या) नवीन आहे. परंतु आपल्या सर्वांच्या सह्कार्याने मला या संकेतस्थळावर रुळायला वेळ लागणार नाही याची मला खात्री आहे. आपण सर्व मला मदत करालच अशी आशा बाळगून मी मा़झे लि़खाण सुरु करत आहे.
ज्योतिष शास्त्राबद्दल खुप कमी जणांना आवड असते. काही काही जण तर त्यावर विश्वास सुध्दा ठेवत नाहीत. परंतु माझा विश्वास आहेच त्यावर. त्यासाठी मी आपल्याला काही माहिती विचारत आहे. माझ्या शंकेच निरसन नक्कीच होणार (!).
कुंडलीमध्ये वेगवेगळे भाव असतात. कुंडलीमध्ये बारा घरांच त्या त्या स्थानातील महत्व असते एवढेच मला काय ते माहित आहे. परंतु पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या) जर राहु ग्रह आला तर ते फारच वाइट असते का? का खरच राहु हा ग्रह इतका वाइट ग्रह आहे. पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का? कृपया मदत करा.
प्रतिक्रिया
27 Sep 2010 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार
तुमचे माहित नाही पण आज काल आमच्या आणि आमच्या पितरांच्या राशीत शनीचे भ्रमण , राहुचे मुष्टीयुद्ध आणि साडेसातीचा फेरा चालु आहे हे नक्की.
27 Sep 2010 - 12:59 pm | विनायक प्रभू
सुस्वागतम
सेंचुरी नक्की.
इ.प सैब लागले बर का तुम्हाला काम.
27 Sep 2010 - 1:11 pm | मीरसिका
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! मिसळपावचे काही सांकेतिक शब्द असल्यास मलासुध्दा कळवा बर
27 Sep 2010 - 1:19 pm | ऋषिकेश
मुळात राहु हा ग्रह आहे असा जो तुमचा ग्रह आहे तोच चुकीचा ग्रह आहे.. (राहु केवळ स्थान आहे) तेव्हा राहुला ग्रह म्हणण्याच्या चुकीच्या ग्रहावर बेतलेले असल्याने ते स्थान कोणत्याही गृहात येऊन काहि फरक पडेल असा तुमचा आग्रह चुकीचा वाटतो
:)
27 Sep 2010 - 1:23 pm | कवितानागेश
पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का?>>>>
कालसर्पयोग: राहू-केतू च्या एकाच अक्षात ( एका बाजूला) सगळे ग्रह असतात, तेंव्हा त्याला कालसर्पयोग म्हणतात. त्यात वाइट काही नाही. पंडित नेहरुंच्या पत्रिकेत सुध्दा होता!
काळजी करु नका. ;)
27 Sep 2010 - 6:31 pm | वेताळ
त्यात वाइट काही नाही. पंडित नेहरुंच्या पत्रिकेत सुध्दा होता!
तो कालसर्पयोग तिथुन भारताच्या कुंडलीला कायम चिकटला त्याचे काय?
27 Sep 2010 - 6:34 pm | गांधीवादी
कुठल्या कुंडलीत ? जन्म कुंडली का लग्न कुंडलीत ?
27 Sep 2010 - 7:52 pm | कवितानागेश
जन्म कुंडली का लग्न कुंडलीत
जन्म कुंडली = लग्न कुंडली!
चंद्र कुंडली वेगळी मांडतात!
27 Sep 2010 - 6:38 pm | अनिल २७
मी ऐकलयं कि कालसर्पयोग असलेली माणसं झोपेत 'फुस्स' फुस्स असा आवाज काढतात म्हणे ! जाणकारांनी यावर "प्रकाश" टाकावा..
27 Sep 2010 - 6:40 pm | अवलिया
कालसर्प योग असल्यास जास्त बटाटे खाण्याची आवड असावी त्यामुळे असे होते का यावर संशोधन व्हायला हवे
27 Sep 2010 - 6:42 pm | विनायक प्रभू
ह्या पादार्थाला विसरु नका.
28 Sep 2010 - 11:21 am | परिकथेतील राजकुमार
कालसर्पयोग असल्यास स्वप्नात साप वगैरे येतो काय ? आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? स्वप्नात आलेला साप म्हणजे बायकोच्या जाचामुळे आत्महत्या केलेला नवरा असु शकतो काय ?
28 Sep 2010 - 12:06 pm | अनिल २७
>>आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ?
त्यास 'कालकर्कयोग' म्हणावे .. ;-)
28 Sep 2010 - 12:48 pm | गांधीवादी
असहमत,
कर्क म्हणजे खेकडा, कावळा म्हणजे काक
त्यामुळे
>>आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ?
कालकाकयोग
28 Sep 2010 - 10:39 am | गांधीवादी
बाकी माहित नाही, पण CWG च्या नशिबात मात्र सर्प योग नक्की आहे.

27 Sep 2010 - 1:32 pm | मेघवेडा
हल्ली प्रत्येक गोष्टीची शांत करून मिळते. आणि हल्ली कुंडलीतले ग्रहसुद्धा इकडे तिकडे करून मिळतात. त्यामुळे सांगणं कठीण आहे. :)
27 Sep 2010 - 6:40 pm | गांधीवादी
सध्याच्या घडीला CWG ची कुंडली बदलून मिलेले काय ?
27 Sep 2010 - 2:22 pm | विजुभाऊ
मीरसिकाजी या संस्थळावर ग्रहगोलांच्या संदर्भात डॉक्टरेट केलेल्या एक ठाणेकर सदस्या आहेत. त्यांच्या अभ्यासामुळे तुमच्या बहुतेक शंकांचे त्या निरसन करतील.
27 Sep 2010 - 2:28 pm | स्वानन्द
विजू भाऊ,
पण त्या astronomy च्या अभ्यासक आहेत, astrology च्या नव्हे.
27 Sep 2010 - 2:31 pm | विनायक प्रभू
ते काहीही असो.
त्यांनि दुर्बिण रोखली की साक्षात राहु चळाचळा कापतो ( असे मला राहुने स्वप्नात येउन सांगितलय)
27 Sep 2010 - 3:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय दंगा सुरू आहे इथे?
27 Sep 2010 - 4:21 pm | परिकथेतील राजकुमार
आला ! ३_१४ चा फेरा आला.
27 Sep 2010 - 6:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गप्राऽव पर्या तू!
27 Sep 2010 - 2:26 pm | विनायक प्रभू
काय विजुभौ काय चाल्लय?
उगाच नविन सदस्यांना त्रासात का टाकताहात?
27 Sep 2010 - 2:39 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
27 Sep 2010 - 2:48 pm | नितिन थत्ते
धोंडोपंत, अमोल केळकर किंवा युयुत्सु यांच्याशी संपर्क करावा.
यांपैकी तिसरे गृहस्थ स्त्रीद्वेष्टे म्हणून प्रसिद्ध असून ४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष वाकडे आहे असे समजते. ;)
27 Sep 2010 - 3:10 pm | मितभाषी
४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष वाकडे आहे असे समजते
=)) =)) =))
अग्गागागा थत्तेसाहेब. अशक्य हसतोय मी.
27 Sep 2010 - 3:33 pm | अनिल २७
यावर एक रामबाण ऊपाय आहे. आमच्या 'पितरांपैकी' एकाने सांगितला असावा असे वाटते..
तर ऊपाय असा आहे कि, १)ती कुंडली घेऊन एका दगडावर ठेवावी, २)आता कुंडलीवर हळद-कुंकू सश्रद्ध वाहावे, ३) एक बोट आपल्याही कपाळास लावावे, ४) आता कुलदैवतेचे नावं घेऊन कुंडली ठेवलेल्या दगडास प्रदक्षिणा घालावी, ५) कुंडलीतील १२ घरांसाठी त्या कुंडली ठेवलेल्या दगडास १२ वेळा नमस्कार करावा, ६) आता थोडेसे रॉकेल घेऊन कुंडलीवर शिंपडावे, ७)त्यानंतर बिनधास्त कुडलीस आगपेटीच्या काडीने आग लावावी, ८) कुंडली जळून पुर्णपणे खाक होत नाही तोवर तिथेच हात जोडून ऊभे रहावे, ९)कुंडली जळून खाक झाल्याची खात्री पटताच बेधूंद होऊन नाचावे. (दुसरी कुंडली बनविण्याचा विचार ईथेच सोडून द्यावा)
हे सर्व केल्यानंतर तुम्हास पुढच्या आयुष्यात कधीच ग्रहदशा सतावणार नाही याची खात्रीशीर ग्यारंटी..
27 Sep 2010 - 3:41 pm | परिकथेतील राजकुमार
येवढे सगळे करण्यापेक्षा कुंडलीवर एक रजनीकांतचा फोटु डकवावा.
27 Sep 2010 - 6:17 pm | अनिल २७
यथासांग विधी केल्याचे समाधान कसे मिळणार? ;-)
27 Sep 2010 - 6:23 pm | गांधीवादी
ग्लोबल वार्मिंग वाढेल त्याचे काय ?
27 Sep 2010 - 6:33 pm | अनिल २७
ग्लोबल वार्मिंग?? ते काय असते बॉ ? असल्या गोष्टींवर आमी विश्वास नाय ठेवत. आमच्या पत्रिकेतील राहू, केतू, मंगळ शांत झालेच पाहिजेत . काय?
27 Sep 2010 - 6:26 pm | विनायक प्रभू
ग्लोबल वार्मिंग च्या भितीने कोणकोणते यथासांग विधी बंद करायचे बॉ?
27 Sep 2010 - 6:29 pm | गांधीवादी
जे काही पाहून, बघून, वाचून, करून, गरम होते असे सगळे विधी
27 Sep 2010 - 6:31 pm | विनायक प्रभू
हे पपु गांधींना पण जमले नाही (असे म्हणतात)
27 Sep 2010 - 6:35 pm | मेघवेडा
काहींना जमते म्हणे. म्हणजे निदान तसं दाखवतात तरी!
27 Sep 2010 - 6:39 pm | अवलिया
पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या) जर राहु ग्रह आला तर ते फारच वाइट असते का?
हो आणि नाही. कुंडलीत राहु कोणत्या राशीत आहे, इतर ग्रह कोणत्या राशीत आणि स्थानात आहेत यावर बरावाईटपणा अवलंबुन असतो. केवळ एक ग्रह एक राशी आणि एक स्थान यावर अवलंबुन नसते. समग्र अभ्यास करुनच ते ठरवावे लागते. केवळ अमुक ठिकाणी अमुक ग्रह आहे म्हणुन तुम्हाला वाईट काल आहे असे जर कुणी ज्योतीषी सांगत असेल तर तो लबाड आहे हे निश्चित समजा.
का खरच राहु हा ग्रह इतका वाइट ग्रह आहे. पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का?
राहुच्या पहिल्या स्थानामुळे कालसर्पयोग होत नाही. त्याचे निकष वेगळे आहेत.
28 Sep 2010 - 10:29 am | kamalakant samant
नुसता लग्नी रहु म्हणुन चालणार नाही.
१-शुभ ग्रहा॑ची द्रुष्टी महत्वाची
२-कीती अ॑शात आहे हे पहावे लागेल
३-कोणते योग आहेत
४-कोणत्या राशीत आहे
अनुमानाने एवढेच सा॑गता येइल की त्या व्यक्तीला जेवढा त्रास असेल
त्याहून जास्त इतरा॑ना ती व्यक्ती त्रासदायक असू शकते.
ग्रहा॑वर ज्याची सत्ता त्याचे पाय धरलेले बरे.
साम॑त