नदीचं मुळ आणि साधूच कुळ कुणी शोधू नये असं म्हणतात. मला वाटतं तसचं चपलांचा इतिहास कुणी शोधू नये. पादुका, खडावा, चप्पल,बूट असा हा चपलेचा अनंतकाळाचा प्रवास ... गावातील एका झाडाखाली चप्पल बांधणी पासून चकाचक अशा माँल पर्यंत प्रवास करत पोहोचलेले चप्पल आणि बूट..
.
चपलांच्या दुकानात गेलं कि इवलाश्या आकारा पासून अगदी फताड्या पायापर्यंत सर्वच आकारामध्ये चप्पल आणि बूट पहायला मिळतात.बूटातही नाविन्य आहेच..लेदरचे चकाकणारे बूट ते रफ अँन्ड ट्फ स्पोर्ट्स शूज पर्यंत रंगीबेरंगी बूटांचा प्रवासही वाखणण्याजोगा .माणसाच्या आयुष्यात चप्पल आणि बूटांना तसे तुच्छ स्थान...पण खर सांगू थोडा विचार केला तर त्यांचे स्थान बहूमोल असे आहे.कपड्यानंतर माणूस सर्वाधिक काय वापरत असेल तर ती चप्पल !. प्रत्येक सुखदु:खात , द-याखो-यात.,काट्याकुट्यात ,ऊनपावसात चप्पल आणि बूट आपल्याला साथ देतात.आणिबाणिच्या प्रसंगात उपयोगात येणारे हमखास हत्यार म्हणजे चप्पलच .
देवाच्या दर्शनाला उभे असलो तरी आपली नजर चपलांकडे असतेचकी.चप्पल आणि बूट कुणी चोरणार नाही ना ? हा विचार मनात येतच असतो.खडाखडा बूटांचा आवाज करत चालणारे पोलिस -सैनिक पाहिले कि अंगावर रोमांच उभे राहतात.प्रभुरामचंद्र वनवासात गेल्यावर त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने राज्यकारभार केला होता.आता नेत्यांचा चपला उचलून हुजरेगिरी करून अनेक जण स्वामीनिष्ठा दाखवतांना आपण पाहतो.अंगावर चप्पल नाहितर बूट फेकून मारण्याचे नवीन फँड हल्ली जोर धरतेय. जाँर्ज बूश, पी.सी.चिदंबरम ,अडवाणी, बिहार विधानसभाध्यक्ष , उमर अब्दुल्ला, अशोक चव्हाण यांच्यावर चप्पल-बूट फेकून मारलेली उदाहरणे आहेत.अभिनेता जितेन्द्र पासून आरोपीने न्यायाधिशाला चप्पल-बूट फेकून मारल्याचे आपण वाचलेले आहे.त्यामुंळे सद्यस्थितीत चपलांना महत्व प्राप्त झाले.
चप्पल ,बूट ,ज्युता ,सँन्डल ,शूज ,सभ्य भाषेत पादत्राणे तर गावरान भाषेत पायताण -वहाण असे विविध शब्दप्रयोग आपल्या वापरात कायम असतात.नोकरीसाठी मुलाखत देणा-या उमेदवाराला कपड्यांइतके चप्पल-बूटांकडेही लक्ष द्यावे लागते ,छेड काढणा-या मवाल्यांपासून दूर रहायचे असेल तर महिलांना चपलांचा कित्ती-कित्ती आधार वाटतो.मेरा ज्युता है जपानी म्हणत चप्पल सिनेमात पोहचली.बूटांवर कँमेरा मारल्या खेरीज हिरोची सिनेमात एन्ट्री कधी झालेय ?.लग्नकार्यात वराचे जोडे लपवल्या शिवाय करवलीला हक्काची कमाई कशी होणार ?.पिकपिक आवाज करणारे बूट घालून चालणा-या लहान मुलाकडे सारेच कसे प्रेमाने बघतात. टाचांच्या चपला घालून स्त्रीयाही उंच व्हायला बघतात.कोल्हापूरी चपलांचा आवाज तर भारदस्तपणा दाखवणारा.जीन्स पँन्ट्वर शोभणारे बूट तरूण तरुणींचे व्यक्तिमत्व कसे खुलवते.आपल्या सामाजिक वैयक्तिक जीवनात चपलांना कळतनकळत महत्व आलेले आहे.हे महत्व वाकप्रचार-म्हणींपर्यंत पोहचले आहे.पाहूण्याच्या बूटाने विंचू मारणे ,बापाचे जोडे मुलाला झाले कि मुलगा मोठा झाला.मुलीचे लग्न जुळवतांना जोडा झिजवावा लागतोच.पायातली वहाण पायात बरी असं म्हणत एखाद्याची लायकी काढली जाते.त्याला चपलेशी उभा करू नका..चपलेने हाणा असा शब्द रागाच्या भरात निघतो. हे सार खरं असले तरीहि रात्री-अपरात्री घराबाहेर पडतांना पायात चप्पल घालून जा रे असा वृद्ध व्यक्तिंचा हमखास सल्ला असतो. केवढा हा चपलेवर भरवसा...आपल्या सोबत असणा-या या चपलेने आपले विश्व किती व्यापलयं ना ?,
लहाणपणी आई आणि आता पत्नी मला बजावते अरे ते बूट बदल आता किती झिजलेत ?
माझे बूट खराब झाले म्हणून मी कच-याच्या कुंडीत टाकून दिले.काही दिवसांनी माझे तेच बूट एका भिका-याच्या पायात मी पाहिले.माझी गरज संपलेले ते बूट आज कुणाची तरी गरज झाले होते.स्वत: झिजून दूस-याला सुगंध चंदन देते हे आपल्याला माहित आहे .पण स्वत: झिजून आपल्याला आनंद देणा-या चपलेच्या बाबतीत आपण सापत्नभाव ठेवतो ,आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपल्याला साथ देणारी चप्पल आपल्या कडून तशी दुर्लक्षित राहते.
.................................................................................
प्रतिक्रिया
17 Sep 2010 - 10:17 pm | जिप्सी
सुनिलभौ, मस्त लिखाण ! अजून लिहा ! वेगळाच अँगल !
(९ नं)जिप्सी
17 Sep 2010 - 11:20 pm | शुचि
सिंड्रेला विसरलात का? काचेचा बूट :)
छान हलका फुलका लेख.
17 Sep 2010 - 11:33 pm | रेवती
छान लेखन!
हमखास हत्यार म्हणजे चप्पलच .
अगदी!
आपल्याकडे सध्या म्याचिंग चपला घालण्याचं वेड कितपत आहे ते माहित नाही पण इकडं हिरव्या देशात बर्याचजणांकडे ढिगानं वहाणा असतात. अगदी पोपटी हिरव्या, पिवळ्या, नारिंगी रंगाचे जोडेही पाहिले आणि आश्चर्य वाटले.
17 Sep 2010 - 11:52 pm | मस्तानी
छान लेख आहे !
हे हॉलंड चे प्रसिद्ध लाकडी बूट ...
अवांतर : इथे पण 'चपला घालून चालू पडा' असा एक खास वाक्प्रचार वापरलो जातोच की :)
18 Sep 2010 - 12:08 am | चिरोटा
छान लेख. शेवटची दोन वाक्ये खासच:चपलांबाबत कधी नव्हे ती सेंटी करुन गेली.
18 Sep 2010 - 10:50 am | मस्त कलंदर
शेवट वाचता वाचता पुन्हा एकदा माझा आवडता चित्रपटः चिल्ड्रेन ऑफ हेवन आठवला!!!! :)
18 Sep 2010 - 12:45 pm | दिपक
एकदम खुसखुशीत झालय बघा चप्पल पुराण. शेवट वाचुन चितळे मास्तरांच्या चपलांची आठवण झाली.
अवांतर: आपल्या परा’ला आवडणारे कातड्याचे जोडे. ;-)
18 Sep 2010 - 6:04 pm | मदनबाण
सुंदर लेखन... :)
18 Sep 2010 - 10:34 pm | मी-सौरभ
:)
18 Sep 2010 - 10:39 pm | बेसनलाडू
पुराण श्रवणीय झाले आहे. यावरून आम्हाला आम्ही वर्षभरापूर्वी खरडलेल्या पुराणकाची आठवण झाली.
(स्मरणशील)बेसनलाडू
19 Sep 2010 - 1:31 am | चतुरंग
चपलापुराण आवडले. आदिम काळापासून चपलांनी माणसाची साथ केलेली आहे. मध्यंतरी यूरोपात एका बर्फाळ गुहेत हजारो वर्षे जुना सांगाडा सापडला तो पायातल्या जोड्यांसकट!
फिलीपाईन्सचे पदच्युत राज्यकर्ते मार्कोस दांपत्यापैकी इमेल्डा मार्कोस हिचा पादत्राणांचा सोस कुप्रसिद्ध होता. तिच्याकडे तब्बल २७०० जोड होते असे म्हणतात! :(
चतुरंग
19 Sep 2010 - 8:05 am | उदय
माझ्या लहानपणी २-३ रुपयात चप्पल शिवून देणारे चांभार पोट कसे भरतात हा प्रश्न मला नेहमी पडायचा. आता तर काय चांभारच दिसत नाहीत.
मी रुईया कॉलेजला असताना तिथे जवळच १ आजोबा त्यांच्या घरासमोर रोज १ सुविचार लिहायचे. त्यातले १ वाक्य आठवले.
I complained that I had no shoes, till I met a person who had no feet.
मस्त लेख. आवडला.