स्टेपनीची गरज

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
13 Sep 2010 - 4:15 pm

गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला म्हणतातच की.
स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून साईडला ठेवायचे. त्याकडेला जॅक लावून गाडी वर उचलावी लागते. हरभऱ्‍याच्या झाडावर चढवल्याइतकी! मग गाडी अंतराळात विहरत असतांनाच अलगद नटबोल्ट खोलून मूळ चाकाऐवजी स्टेपनी रस्त्याच्या व गाडीच्या खाली चतुरतेने घ्यावी लागते. एखाद्या फूल्लटाईट चाकाचे नटबोल्ट खोलतांना त्रास होतो खरा परंतु तो सहन करायचाच. कारण पुढील काम मार्गी लागणार नसते. चाक बाजूला घेतलेय हे मूळगाडीच्या या चाकाचे त्या चाकाला कळू न देण्यातच खरा मुरब्बीपणा. स्टेपनी घेतल्याची खबर कोणालाही लागू न देता हा गनिमीकावा पार पाडावा लागतो.
तसे पाहिले तर स्टेपनी नुसतीच बाळगून फायदा नाही, तर तिचा वेळोवेळी काळजीपूर्वक वापर करता यायला हवा. स्टेपनी लावून सुखाचा प्रवास सुरु झाला की गाडीला वाटते आपल्यामुळेच रस्ता जोराचा धावतोय तर स्टेपनीला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा. म्हणून तीही सहसा पंक्चर होण्यापासून स्वतःला जपत येते. अर्थात स्टेपनीलाही अडगळीत राहण्यापेक्षा रोडवरची दौड केल्याचे विलक्षण समाधान लाभत असतेच म्हणा. तिलाही चालू स्थितीत फार बरे वाटत असावे.
शेवटी काय तर एकमेकांवर अवलंबून राहण्यात बरेच फायदे गवसतात. जसे की स्टेपनी!

जीवनमानमौजमजामाहितीवादविरंगुळा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

13 Sep 2010 - 4:19 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा !
काय अगाध लेखन प्रतिभा आहे हो :) काही एक क्षण मला 'मचाक' ब्लॉगवर आल्यासारखेच वाटले.

असो...

पंक्चरवाला

सुनील's picture

13 Sep 2010 - 4:24 pm | सुनील

स्वैंपाकी झाला, पुजारी झाला आता डायवर!!!

चालू द्या!!!

विनायक प्रभू's picture

13 Sep 2010 - 4:26 pm | विनायक प्रभू

लेख आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2010 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>लेख आवडला
प्रभुसरांशी सहमत...! :)

'स्टेपनीची गरज' शिर्षकावरुन लेखनातील आशयासंबंधी अपेक्षा वाढल्या होत्या.
स्टेपनी कशा कशाला म्हणतात. वगैरे, इत्यादि. असो...!

-दिलीप बिरुटे

सूड's picture

13 Sep 2010 - 4:36 pm | सूड

डोक्यावरुन गेलं !!

कदाचित प्रेमत्रिकोण (Love Triangle ) असावा. तीन बिंदू खालीलप्रमाणे.
चालक, गाडी, स्टेपनी

ज्ञानेश...'s picture

13 Sep 2010 - 4:45 pm | ज्ञानेश...

टारझणला मिस करतोय.

स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा जास्त डेकोरेटेड , हवेशीर ठेवावे लागते. पण नुस्त्या स्टेपनीच्या भरोशावर प्रवास चालू ठेवला तर स्टेपनी पंक्चर झाल्यावर मात्र गाडी पूर्णच खाली बसते. आडरस्त्याला पंक्चरवाला मिळत नाही. त्यातून जॅक तुटलेला असेल तर दुसरी गाडी थांबवून उसना जॅक मागून घ्यावा लागतो ;)

(येथे लेखक पंपचर करुन मिळतील)रंगान्ना

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Sep 2010 - 8:20 am | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत आहे.
स्वति घरात नसताना कंडू शमनार्थ रुण्डिरा खावी|
ती ही घरात नसताना स्वहस्तेच बुद्ली दाबावी ||
याचा अर्थ साधारण असा होतो की सुंठ घरात नसेल तर कंडू म्हणजे खोकला थांबवण्यासाठी खडीसाखर खावी. ती ही म्हणजे खडीसाखरही घरात नसेल तर आपल्याच हाताने (बुद्ली) पडजीभ दाबावी.
तस्मात डॉ साहेब ** ठेवा सांगण्यासाठी इतक्या शब्दांचा खटाटोप?
प्रतिसाद संपादीत केला आहे

राजेश घासकडवी's picture

14 Sep 2010 - 8:34 am | राजेश घासकडवी

श्री. पेशवे,

इथे गाड्या, प्रवास, त्यातल्या अडचणी, ड्रायव्हरांचे प्रश्न असल्या विषयांवर चर्चा चालू असताना तुम्ही जे अश्लीलतेकडे झुकणारे लिहिले आहे त्याचा तीव्र निषेध. बाई ठेवणे, ** राखणे, ** दाबणे हे अवांतर आहे. कृपया सदर विषयावर लिहिता येत नसेल तर किमान चर्चेमध्ये गोंधळ माजवू नये ही विनंती. आता काही जणांना नसतो ड्रायव्हिंगचा अनुभव, किंवा गती नसते, अॅक्सिडेंट वगैरे झालेले असतात. म्हणून आकस धरून असे वाह्यात वर्तन करू नये.

संपादक यात लक्ष घालतील काय?

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Sep 2010 - 9:19 am | llपुण्याचे पेशवेll

असो. आम्ही आपली पूजा चालू ठेवतो, कसे?

sagarparadkar's picture

13 Sep 2010 - 7:46 pm | sagarparadkar

धन्य हो डॉक्टरसाहेब ...

साष्टांग नमस्कार इथे कसा दर्शवायचा माहीत नाही म्हणून __/\__ एव्ह्ढ्यावरच भागवून घ्या ...

कदाचित ___^_/ असा दर्शवता येईल ...

>> तर स्टेपनीला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा <<

हल्लीच्या स्टेपनीला ती स्टेपनी आहे हे कळले तर गाडी नुसतीच थंडावेल की कायमचीच बंद पडेल किंवा कसे .... स्टेपनी वापरण्याचा अनुभव नसल्याने सांगता येणार नाही ...

गाडीला स्टेपनी असणे चांगलेच.. गाडीचा वापर जास्त असणार्यांसाठी..

परंतु ती लावायची वेळ न येणे बरं.. अर्थात इतर चार चाकांबरोबर तिचे हवा-पाणी देखील नियमित तपासून घेतो..

धमाल मुलगा's picture

13 Sep 2010 - 8:46 pm | धमाल मुलगा

है शाब्बास्स!
य्ये हुई ना ब्बात!

डॉक्टरसाहेबांच्या लेखाचं सार्थक झालं असं म्हणेन मी.

-धमायक प्रभु.

टिउ's picture

14 Sep 2010 - 2:06 am | टिउ

माजगावकर, अहो तुमच्याकडे ऑलरेडी चार चाकं असतांना अजुन स्टेपनी कशाला पाहीजे?
तुमच्यासारख्या लोकांमुळे स्टेपन्यांचे भाव वाढलेत हल्ली... ;)

निशदे's picture

13 Sep 2010 - 9:06 pm | निशदे

च्यायला.....ही स्टेपनी होय!!!!!!!

सुरेख श्लेष. त्या वृत्तांची माहिती विचारणार्‍यास अलंकारही शिकून घ्यायला सांगावे.

शहराजाद's picture

14 Sep 2010 - 1:50 am | शहराजाद

स्टोरेजच्या सोयीसाठी स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असण्याची पद्धत आहे. पण गाडी ओढून नेण्याच्या कामी ती मूळ चाकाइतकी स्थिर आणि सुरक्षित कधीच नसते, एवढे लक्षात असूद्या.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Sep 2010 - 2:16 am | विश्वनाथ मेहेंदळे

वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण ज्यांच्याकडे स्टेपनी असते त्यांना साधारणता हे माहित असते. आणि म्हणूनच ते स्टेपनी ला मूळ चाक म्हणून नाही वापरत. मूळ चाक ते मूळ चाक आणि स्टेपनी ती स्टेपनी !!!

कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!!

(तलवारी उपसल्या जाण्याची वाट पाहणारा) वि. मे.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Sep 2010 - 9:21 am | llपुण्याचे पेशवेll

कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!!
अहो कसं आहे.. चालकानी स्टेप्नी बाळगणे आणि गाडीला स्टेप्नी आहे हे न कळणे जसे असते तसे गाडीनेच स्टेप्नी किंवा पर्यायी स्टँड ठेवणे आणि चालकाला याची खबरबात नसणे हे ही असते म्हणूनही असेल कदाचित.

Pain's picture

14 Sep 2010 - 11:06 pm | Pain

मी जेव्हा पंक्चर चाक काढून स्टेपनी लावली होती तेव्हा दोन्हीवर लिहिलेला साइझ पाहिला होता. सारखाच होता.
मूळ चाकापेक्षा लहान आकार असणे अयोग्य आहे.

(कदाचित तुम्ही दुचाकीबद्दल बोलत असाल, मी चारचाकीबद्दल बोलत आहे.)

शहराजाद's picture

15 Sep 2010 - 12:01 am | शहराजाद

काही गाड्यांची स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असते. ठेवण्याच्या सोयीसाठी हे करतात असे कळले. माझा मुद्दा , मूळ चाकाचीच निगा राखून स्टेपनीची गरजच भासू नये अशी काळजी घेणे इष्ट. यापुढे प्रत्येकाची मर्जी.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Sep 2010 - 12:29 am | विश्वनाथ मेहेंदळे

अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत. भारतात मी छोटी स्टेपनी नाही पाहिली. असेलही, काही खास अनुभव नाही.
अमेरिकेत डिकीत (ट्रंक म्हणायचे बरे, डिकी म्हटले की काहीतरी वेगळेच समजतात) सहजपणे बसावे म्हणून स्टेपनी छोटी बनवतात. अशी स्टेपनी असेल तर ५५ मैल प्रती तास या गतीपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची नसते.

यातून नक्की काय काय अर्थ लोक काढतील ते तो एक श्रीराम जाणे (देव, धागाप्रवर्तक नाही)

राजेश घासकडवी's picture

14 Sep 2010 - 7:54 am | राजेश घासकडवी

बहुतेक वेळा आपली स्टेपनी आपण कायम गाडीतच बाळगावी अशी सिस्टिम असते. पण हा संसाधनांचा शुद्ध अपव्यय आहे. म्हणून मी नवीन सिस्टिमचा विचार करत होतो.

समजा असं केलं तर? स्टेपनी गाडीत बाळगायचीच नाही. गाडी पंक्चर झाली की मेकॅनिकला फोन करायचा, मग तो आपल्याला हवी तशी स्टेपनी आणून देईल. तात्पुरती वापरायची. नंतर मेकॅनिकला परत करायची. कशाला उगाच ती विकत घ्यायची? आणि कायम बाळगून पेट्रोल अधिक खर्च करायचं? मुळात गाडी विकत घेतली त्यात खर्च आहेच.

बरं, मेकॅनिकलाही भाडं मिळेल, आणि इतर कस्टमरांना वापरायला देता येईल. थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. तसं म्हटलं तर ती आधी कोणी इतर कस्टमरांनी वापरली आहे म्हणून आपल्याला तरी कुठे फरक पडतो? मग थोड्या स्टेपन्या खूप लोकांना पुरतील, व एकंदरीत समाजाचा स्टेपनी-विषयक खर्च देखील कमी होईल. दर वेळी सेफ्टी जरा चेक करून घ्यावी लागेल, पण मान्यवर गराजनी जर स्टेपन्या पुरवल्या तर तो धोकादेखील कमी होईल.

काही लोकांच्या मते सामाजिक वर्दळ सुरळीतपणे चालण्यासाठी अशी सिस्टिम उपयोगी ठरेल. नाहीतर काही लोक चाक पंक्चर झालं आणि स्टेपनी परवडली नाही की दुसऱ्याच्या गाड्यांची चाकं बळजबरीने पळवतात...

खरं तर आख्खी गाडीच भाड्याने घेता आली तर? अशीच कल्पना मी आधी देखील मांडली होती. पण अनुमोदनाच्या औष्ठ्यसेवेपलिकडे कोणी काही केलं नाही.

ही गाडीसंस्था फार माजली आहे साली.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Sep 2010 - 9:22 am | llपुण्याचे पेशवेll

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ.. औष्ठ्यसेवा.. ;)

गांधीवादी's picture

14 Sep 2010 - 9:27 am | गांधीवादी

>>ही गाडीसंस्था फार माजली आहे साली.
अशी गाडीला नावे ठेऊ नयेत. आपण वापरतो नं तिला. मग अशी नावे का बरे ठेवायची ?
त्रास तर माझी गाडी पण देते, कदाचित तुमच्या गाडी पेक्षा जास्त, खूप खूप आवाज करते, खूप हादरे बसतात. माझा सगळा पगार तिच्यासाठीच संपतो. गाडी नसेल तर कित्ती कित्ती , कशा कशाचे, हाल होतील ते विचार करा. वर्षातून एक-दोन वेळाच स्मूथ चालते. (गाडीला इच्छित स्थळी जायचे असेल तरच )
माझी गाडी स्वस्तात घेतली होती, पण आता मेंटेनन्स खर्चच जास्त होतो. सप्लायर कडे जास्त गाड्या होत्या, आमची गाडी हि पहिलीच मोडेल. त्यामुळे स्वस्तात दिली त्याने.
गाडी जुनी देऊन नवीन मिळेल अशी काय योजना आहे काय ?(वाट्टेल तेवढा खर्च करायला तयार आहे)
सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.

राजेश घासकडवी's picture

14 Sep 2010 - 10:41 am | राजेश घासकडवी

अशी गाडीला नावे ठेऊ नयेत.

तुमचा गैरसमज होतोय. नावं गाडीला ठेवलेलीच नाहीत. प्रवासालाही नाहीत (तो प्रवास सुंदर होता...)
गाडीच्या लायसेन्सिंगच्या नियमाला नावं ठेवली आहेत. समाजवादी अर्थकारणाच्या विचारसरणीत गाडी ही चैनीची वस्तु समजली गेली - आणि प्रत्येकाला एकच गाडी - तीही मोठ्या मिनतवारीने मिळणार...

सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.

हे फारच पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह झालं. स्टेपनीचं बघा जरा...

गांधीवादी's picture

14 Sep 2010 - 11:13 am | गांधीवादी

OK OK असं होय,समजले.
थोडा गोंधळ उडालेला होता.

सहमत आहे.

>>स्टेपनीचं बघा जरा...
गाडी ने कितीही त्रास दिला तरी अजून काय कुठेच पंचर नाही. एकदम शॉल्लीट MRF चे आहेत आमचे टायर्स, त्यामुळे हा सल्ला कामाचा नाहि

नितिन थत्ते's picture

14 Sep 2010 - 10:59 am | नितिन थत्ते

सोय हवी पण स्टेपनी सांभाळायला नको हा कोता-चंगळवादी विचार केल्याबद्दल घासकडवी यांचा निषेध.

गाडी आणि चाके यांचे गुणोत्तर तसे आहे म्हणून एका गाडीला चार चाके आणि एक स्टेपनी ठेवण्याची पद्धत असावी. गुणोत्तर वेगळे असते तर दोन स्टेपन्याठेवण्याची किंवा घासकडवींच्या मनोराज्याप्रमाणे स्टेपनी भाड्याने मिळण्याची पद्धत आली असती.

स्टेपनी ठेवायची नसेल तर आधी चाकांची निर्मिती कमी करावी लागेल.

मी_ओंकार's picture

15 Sep 2010 - 9:48 am | मी_ओंकार

थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं.

काही स्टेपनींना साबण चोळून ही चकाचक करतात असे ऐकून आहे.

- (ऐकीवातला)

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Sep 2010 - 10:43 am | llपुण्याचे पेशवेll

त्या ष्टेप्न्या जस्ट इन टाईम असतात. कायमस्वरूपी नाही.

त्याच्या करीता काही सुचना आहेत का?पुर्वी बजाज स्कुटरला स्टेफनी असायची .आताच्या स्कुटरला स्टेफनी नसते. त्यामुळे खुपच कुचंबणा होते.रस्त्यावर हात हालवत उभे रहावे लागते.

नितिन थत्ते's picture

14 Sep 2010 - 10:51 am | नितिन थत्ते

रस्त्यावरच?

मी-सौरभ's picture

15 Sep 2010 - 12:28 am | मी-सौरभ

काय कळ्ळं नाहे ब्बॉ :)

चिगो's picture

14 Sep 2010 - 3:59 pm | चिगो

अवो, ते हात हलवत म्हन्ले... काय्यच्या क्काय..

सुहास..'s picture

14 Sep 2010 - 4:04 pm | सुहास..

स्टे फनी लेख !!

नावातकायआहे's picture

14 Sep 2010 - 9:05 pm | नावातकायआहे

काय राव .... पंकचर टायर नाय 'टूब' व्हति...
आटू 'सिलंट' टूब वापरा... ;-)

धमाल मुलगा's picture

14 Sep 2010 - 11:11 pm | धमाल मुलगा

ला हौल विलाकुवत!

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Sep 2010 - 10:51 am | llपुण्याचे पेशवेll

हेच म्हणतो लाहोर व्हायाकुवेत.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2010 - 10:33 am | प्रकाश घाटपांडे

काही लोक गाडी 'एकहाती' वापरण्याबाबत आग्रही असतात. त्यामुळे गाडी तंदुरुस्त राहते म्हणे! आम्ही त्यांना विचारतो पंक्चर झाल्यावर कितीही तुम्ही एकहाती वापरली असली तरी स्टेपनी लागतेच.
आता मोटरसायकलसारख्या दुचाकीला स्टेपनी लावताच येत नाही. त्यांनी काय करायच?
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंतात. स्टेपनीचा शोध यातुनच लागला असावा.

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Sep 2010 - 11:18 am | llपुण्याचे पेशवेll

एकहाती गाडी वापरल्याने गाडीचेच नव्हे तर चालकाचेही आरोग्य चांगले राहते. नाहीतर इतर कोणी गाडी नीट नाही वापरली तर गाडी खिळखिळी होऊ शकते त्यामुळे चालकाचेही जजमेंट चुकू शकते ना!

चौथा कोनाडा's picture

18 May 2023 - 6:01 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !
लई भारी !

😄 😄 😄