भेटेन नव्याने पुन्हा
माहित नाही कसे अन केव्हा
कधी बनेन एक मुग्ध कल्पना अन उतरेन चित्रात तुझिया
चित्रामधील बनून रेषा साठवीत राहीन नजरेत तुजला
भेटेन पुन्हा ...नव्याने पुन्हा
बनून कोवळ्या किरणाचा कवडसा
विरघलेन तुझिया हर एक रंगा
रंगेन मी चित्रात तुझिया
भेटेन पुन्हा एकदा पुन्हा एकदा
माहीत नाही कशी अन केव्हा
परी भेटेन पुन्हा एकदा नव्याने एकदा
किवा बनून थेंबांचा शीतल शिडकावा
उसळून उधळेन तुझ्यावरी स्वत:ला
मिटवेन धग अन दाह मनाचा
थंड शिरशिरी अन धुंद गारवा
बनून भेटेन पुन्हा एकदा ..पुन्हा एकदा
इतकं नक्की ठाउक आहे मला
या जन्मी तू राहशील माझा.. फक्त माझा
म्हणतात की सोडता या नश्वर शरीरा
सारेच संपते अन अंततात जाणीवा
तरीही उरतात नभी या
निरंतर चेतना... निरंतर चेतना
सावरून नाभीच्या एकेक चेतना
गुंफून विणेन एक रेशीमधागा
अन भेटेन नव्याने पुन्हा ..पुन्हा एकदा..
मुळ कविता : अमृता प्रीतम
प्रतिक्रिया
2 Sep 2010 - 5:23 pm | काव्यवेडी
कवितेचा अनुवाद छान जमला आहे. आधीचा पण वाचला होता.
तो पण मस्त च !!!
2 Sep 2010 - 6:40 pm | शुचि
सुंदर ग जाई!
मी वाट वाकडी करून वाचत नाही अन्य भाषेतलं पण मिपा मुळे समृद्ध व्हायची संधी मिळते.
>>बनून कोवळ्या किरणाचा कवडसा
विरघळेन तुझिया हर एक रंगा
रंगेन मी चित्रात तुझिया
भेटेन पुन्हा एकदा पुन्हा एक>>>>
आहा! सो रोमँटीक!!!
27 Nov 2014 - 12:00 pm | सुहास पुनेकर
farach chhan jaai kaku..:)
Su
27 Nov 2014 - 12:48 pm | कवितानागेश
हा अनुवाद वाचलाच नव्हता.
फारच सुंदर.
अजून एक इथे आहेhttp://www.misalpav.com/node/24897