मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२

गांधीवादी's picture
गांधीवादी in काथ्याकूट
24 Aug 2010 - 7:25 pm
गाभा: 

मी देशी घेत नाही.
काल रात्री झोप येत नव्हती, २ वाजले तरी ह्या अंगावरून त्या अंगावर, हेच चालले होते, मग कंटाळून गच्चीवर गेलो, तर मला खालील शोध लागले, मी उरेका उरेका म्हणून बोंबललो तर बायकोने आणि काही आजूबाजूच्या लोकांनी मला लाथा घातल्या, मग मी निमुटपणे खाली आलो, आणि झोपलो. आणि सकाळी उठून हे टंकत आहे. तरी सुद्धा आपण सगळे शोध नीट वाचावेत हि विनंती,

तर मला काही शोध लागले आहेत, ते मी इथे देत आहे, ते विचार करून आपणा मला एखादे मोबेल पारितोषिक वगेरे द्यावे नाहीतर मग माझ्या बायकोसारख्या मला येऊन लाथा घालाव्यात, माझा पत्ता मी देईनच, पण अगोदर माझे शोध वाचा, मी आपल्या सगळ्या शंकाचे पूर्णपणे निरासरण करणार आहेच, पण ते पुढच्या लेखात, ह्या लेखात फक्त माझे शोध.
१) पृथ्वी सपाट आहे.,
मी मागे एकदा आपल्या पुण्याच्या नेहरू खेळाच मैदान बघायला गेलो होतो, काय मस्त गुळगुळीत मैदान आहे ते, बघून मला एक शोध लागला होता, तेव्हा कोणाला सांगितला नाही, काल सांगितला आणि मार खाल्ला.
२) सूर्य आणि चंद्र एकाच आकाराचे आहेत, (म्हणजे त्यांचा व्यास सारखा आहे )
नाही नाही माफ करा , चंद्राचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा निम्मा आहे. हा एकदम बरोबर.
नक्की लक्षात येत नाहीये, पण असंच काहीतरी.
३) आपला शनिवार वाड्यापाशी एक खूप मोठा ज्वालामुखी आहे (सुप्त आहे , तो कोणाला दिसणार नाही), तेथे खूप जड मुलद्रव्य सापडतात, त्यामुळे मला असे वाटते कि शनिवार वाडा आपल्या पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य आहे.
३) रात्री वर गच्चीत उभे असताना मला क्षितिजावर चंद्र दिसत होता, त्या चंद्राच्या आणि माझ्या मधून एक जर रेषा काढली तर ती कदाचित लंडन ला छेदून जाईल. असा मी एक निष्कर्ष काढला (मी कधी लंडन गेलो नाही कि चंद्रावर जाण्याची लायकी नाही. खरतर लंडन ला देखील जाण्याची लायकी नाहीये, पण हे दुष्ट कंपनीवाले हाकलतात अधून मधून. जाऊ द्या सोडा. माझे रडगाणे काय चालूच राहील. )
४) दिवसभर मोबायील वरून बोलून बोलून माझे डोके खूप दुखते, म्हणून मी डोक्याला एक तांब्याची तर बांधून ठेवली आहे, आणि तिचे दुसरे टोक जमिनीवर घसरत जाईल अशी ठेवली आहे, आपण नाही का घरात ३ पिन वापरत, त्याची एक तार earthing करतो, अगदी तसेच,.आणि माझे डोके एकदम दुखायचे थांबले. हे मी पेटंट ला टाकण्याचा विचार करत आहे.
५) मला वाटते कि जगात मीच भारी आहे.

तर मग कसे काय वाटले माझे शोध ?

ह्या सगळ्यांची थेअरी मांडताच आहे एक दोन दिवसांत. मात्र मला दाट शंका आहे कि काही जणांनी माझा शोध निबंध अगोदरच ढापला आहे, पण हरकत नाही, मोबेल पारितोषिक मलाच मिळेल ह्याची मला खात्री आहे. आपण सगळे पांढरपेशी, काळपेशी, आहेरे, नाहीरे गटातले A to Z माझ्या बरोबर जे आहात.

चला तो पर्यंत तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

सुज्ञांना जर काही (सु)वास येत असेल तर त्यांनी प्रतिक्रिया न दिलेल्याच बऱ्या. (keep silent)

प्रतिक्रिया

अर्धवट's picture

24 Aug 2010 - 7:28 pm | अर्धवट

मी काही तज्ञ नाही पण शोध क्रमांक ५ ला जोरकस अनुमोदन आहे ब्वॉ आपलं..

छोटा डॉन's picture

24 Aug 2010 - 7:34 pm | छोटा डॉन

अर्धवटरावांशी सहमत ..

>>मी काही तज्ञ नाही पण शोध क्रमांक ५ ला जोरकस अनुमोदन आहे ब्वॉ आपलं..
+१, हेच म्हणतो.

पुढच्या भागाची वाट पहात आहे :)

गांधीवादी तुम्ही दांडीयात्रा किंवा जमल्यास चार धाम यात्रा करा... हे वेगवेगळे शोध लागण कमी होईल. ;)
बाकी
दिवसभर मोबायील वरून बोलून बोलून माझे डोके खूप दुखते, म्हणून मी डोक्याला एक तांब्याची तर बांधून ठेवली आहे, आणि तिचे दुसरे टोक जमिनीवर घसरत जाईल अशी ठेवली आहे, आपण नाही का घरात ३ पिन वापरत, त्याची एक तार earthing करतो, अगदी तसेच,.आणि माझे डोके एकदम दुखायचे थांबले. हे मी पेटंट ला टाकण्याचा विचार करत आहे.
हे वाचले आणि हे आठवले.

काल रात्री झोप येत नव्हती, २ वाजले तरी ह्या अंगावरून त्या अंगावर,
आँ..आँ... अश्लील्..अश्लील!

...नाहीतर मग माझ्या बायकोसारख्या मला येऊन लाथा घालाव्यात...
आता या अंगावरून त्या अंगावर केल्यावर, बायको लाथा नाही घालणार तर काय आरती ओवाळेल?

बाकी शोध बेताचेच आहेत... २ ऐवजी ४ पर्यंत जागे राहून बघा, थोडे बरे शोध लागतील.

>>काल रात्री झोप येत नव्हती, २ वाजले तरी ह्या अंगावरून त्या अंगावर,

आयाया.. हसतोय अजुन

मृत्युन्जय's picture

24 Aug 2010 - 8:31 pm | मृत्युन्जय

हाहाहा. पडलो मी वाचुन. :D

अभिरत भिरभि-या's picture

24 Aug 2010 - 7:43 pm | अभिरत भिरभि-या

>> मी देशी घेत नाही.
फक्त विदेशीच घेतात हे सांगायचे आहे का ?

>> मी उरेका उरेका म्हणून बोंबललो तर बायकोने आणि काही आजूबाजूच्या लोकांनी मला लाथा घातल्या,
अहो तुमच्या बायकोने सुरेखा सुरेखा ऐकले असेल. मग काय बसणारच लाथा !

>> १) पृथ्वी सपाट आहे.,
आहेच ती. अ‍ॅरिस्टॉटलने जेव्हा पृथ्वी गोलाकार असल्याचा शोध लावला तेव्हा तत्कालिन राजापण म्हणे हेच म्हणला होता - "Oh fool. Can't you use your eyes" .. तुम्ही डोळे वापरता तर ? :)

>> ३) आपला शनिवार वाड्यापाशी एक खूप मोठा ज्वालामुखी आहे
होते. शन्वारवाड्यासमोरच्या सभा म्हणजे म्हणजे ज्वालामुखीच होते. गेले ते दिवस .. चला घ्या आणखी एक घोट .. ए गणप्या चकणा आण रे !

>> ३) रात्री वर गच्चीत उभे असताना मला क्षितिजावर चंद्र दिसत होता,
रेखा लंडन छेदेल की म्हायती नाय पण आपला दिल जरूर छेदेल . पण मालक रेखा का सुरेखा ?? चढली वाटत आता !

>> ५) मला वाटते कि जगात मीच भारी आहे.
तुमचे राव उलटच ! आमाला घेतली की कसे हलके हलके वाटते .. :)

हलके हलके घ्या :)

धमाल मुलगा's picture

24 Aug 2010 - 10:08 pm | धमाल मुलगा

अभ्या...
मेलोऽऽ.....................
(इथे छातीत चाकू भोसकुन घेणारी स्मायली.)

[ हे मी पेटंट ला टाकण्याचा विचार करत आहे. ]
मि म्हन्तो टाकाच पेटंट , मिळनारच !

वेताळ's picture

24 Aug 2010 - 8:16 pm | वेताळ

गांधीवादाचा इतका टोकाचा परिणाम माणसावर होतो हे मी प्रथमच पहात आहे.

मी आज सकाळ सकाळी घरात बसलो होतो, माझे शोध निबंध प्रकाशित करणार तेवढ्यात....
मला खिडकीतुन एक हाक ऐकू आली,
खिडकीतुन डोकावून बघतो तर काय, समोर माझा एक जुना परम मित्र गणप्या एक यानामधेय बसून मला बोलावित होता.
आमचा गणप्या मासा नावाच्या एक कंपनीत अवकशात सोडणाऱ्या यानात धुनी भांडी धुवायची कामं करतो. आज तो योगायोगाने माझ्या घराच्या गच्चीवरून चालला होता, माझी आठवण आली म्हणून त्यांनी यानाच्या driver ला यान जरा खालून घ्यायला लावले. मी त्याला माझे कालचे शोध निबंध सांगितले, तर त्याने मला परत यानातूनच लाथा घातल्या अन म्हणाला कि, चल माझ्याबरोबर, तुला पृथ्वी दाखवतो. मी निघालो त्याच्या बरोबर यानातून (फुकट ).आत मध्ये दोन अंतराळवीर होते , ते माझ्याकडे नजर रोखून बघू लागले तर आमचा गणप्या त्यांना म्हणाल कि, जाऊद्या साहेब, माझा मित्र आहेत.
तर अश्या प्रकारे माझी अंतराळ सफर चालू झाली,
मी खुप उंचावर गेल्यावर, मला पृथ्वी गोल गोल दिसू लागली, मला तिसरीतल्या भूगोलातला पृथ्वीचा एक फोटो आठवला, शेम टू शेम असाच दिसत होता, अगदी, दोन चार round मारले मी आपल्या पृथ्वी भोवती, मग मला गणप्या म्हणाला कि आता सांग पृथ्वी गोल कि सपाट ? मी म्हणालो , गणप्या तू म्हणतो तेच खरं, पृथ्वी गोलंच हाय राव !

मग माझे पुढचे निष्कर्ष त्याच्या पुढे केले,
तर त्याने मला एक फुटपट्टी दिले, आणि यान काही वेळापुरते थांबवायला सांगितले,
आणि म्हणाला कि आता बघ जरा यानाच्या speedometer कडे. मी बघितले , त्यात शून्य speed असे तो speedometer दाखवीत होते,मग मी फुटपट्टीने यान आणि सूर्याचे अंतर मोजले, आणि नंतर यान आणि पृथ्वी मधले अंतर मोजले.मग आम्ही मस्त पैकी जेवण मारले, (आमच्याकडे मारणे हे क्रियापद बर्याच बाबतीती लागू होते, जसे पिक्चर मारला, जेवण मारले, सिंहगड मारला).मग एक तासांनी पुन्हा वरील माज्मापे घेतली, तर असे अआधाळू आले कि सूर्यापासूनचे यांचे अंतर काही बदलले नाही, पण पृथ्वी पासूनचे अंतर मात्र आता फुटपट्टीत मोजता येत नव्हते,
ह्या वरून असा निष्कर्ष काढला कि सूर्य तर एकाच जागेवर हाय,पण आपली पृथ्वी मात्र गरागरा त्याच्या भोवती गिरक्या घालती आहे.

तर माझे काही निष्कर्ष हे चुकीचे निघाले,
पण मी अगोदरच नमूद केल्याप्रमाणे माझे काही शोध निबंध चोरीला गेलेले आहेत, ते कुणास मिळाल्यास मला संपर्क करावा. देव जाने कोण त्यांचा कसा (गैर)वापर करीत असेल ?
-------------------------------------------------------------------------------------------------------
मला व्यनी तून एकाचा निरोप आला कि, तुम्ही राव उगाचच दुसर्यांच्या धर्माला नावे ठेवत आहात.
आता मिपावासी,
तुम्हीच सांगा राव, मी अजून पर्यंत एकाला तरी नावे ठेवली आहेत काय ? एकालातरी उद्देशून काय म्हणालो आहे का राव ? माझे शोध, माझे निष्कर्ष, भले चुकीचे असतील तर मला लाथा घाला, हे काय मी चुकीचे बोललो आहे का राव ?
आणि हो, इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? ह्या धाग्याशी माझ्या लेखाचा काहीतरी संबंध आहे का ?
(असला तरी मला तर अजून काय माहित नाही, कोणाला माहित असेल तर मलाच सांगा )

अनामिक's picture

25 Aug 2010 - 7:15 am | अनामिक

देव जाने कोण त्यांचा कसा (गैर)वापर करीत असेल ?

कोण त्यांचा कसा वापर करत असेल ते माहीत नाही, पण देव मात्र तुमच्या शोध निबंधांना चाल लावण्यात मग्न असतील.

भडकमकर मास्तर's picture

25 Aug 2010 - 5:51 pm | भडकमकर मास्तर

गद्य शरदिनी आहे वाटतं... शरद ??