स्पर्श
वाटतं कधी कुणीतरी यावं नकळत पाठीमागून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या पाठीवरून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या केसातून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या डोक्यावरून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या चेहर्यावरून
वाटतं कधी कुणीतरी यावं अन धरावा हात माझा आपल्या हातात
वाटतं कधी कुणीतरी यावं अन पहावं माझ्या खोलवर डोळ्यात
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा आपलेपणा
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा लळा
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा लडिवाळपणा
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळाव्या थोड्या गुददुल्या
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावं थोडं वात्सल्य
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा निस्वार्थीपणा
वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा स्पर्श
भूषण
प्रतिक्रिया
22 Aug 2010 - 4:17 pm | बी.प्रसन्नकुमार
थोडं थोडं म्हणत बरंच काही मागितलंत राव! तथास्तो
23 Aug 2010 - 10:04 am | अशक्त
जे मागितलत ते थोड दुसरयाला आय मिन दुसरिलाहि द्या...तुम्हालाही मिळेल थोडी कळ काढा...