आपले आवडते वुत्तपत्र व काही सुझाव.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
12 Aug 2010 - 10:03 pm

सुझाव???????

असो...नमस्कार्,नमस्कार.......

आम्ही आजच पेपरवाल्या अण्णाला 'कल से ये न्युजपेपर बंद करना है" अस सांगितल.त्याने "ठीक है,फीर कोनसा पेपर लोगे?' हा अपेक्षित प्रश्न विचारला.
मी विचार तर नव्हता केला म्हणून "बाद मे बताता हुं,१५ तारीख तक यही पेपर देना" अस सांगितल.
तर मला एक मराठी व एक ईंग्लिश असे दोन पेपर रोजच्या वाचनात आणायचे आहेत.बाहेर जाउन DNA,Mumbai-Mirror व Mid-Day आणला,त्यात ,Mumbai-Mirror आवडला पण फार मर्यादीत असतो.बाकी काही लिखाण छान होतं.आपण कोणता ईंग्रजी पेपर सुचवाल?तो आपल्याला का आवडतो हेही सांगा.पेपरात नोकरी(आम्हाला हाय बर्का!)),शिक्षण व विज्ञान ह्या विषयावर अलग विभाग असावा ही अपेक्षा.तेव्हा क्रुपया एखादा चांगला ईंग्रजी पेपर सुचवावा.

आणि आता मराठी पेपराबद्दल.आम्ही आमचा आत्ताचा पेपर खुप काळापासुन वाचत आहोत.अगदी नाक मुरडत,त्याच्या नावाने बोंबा मारत वाचला पण ह्याने कुणाचाच फायदा नसुन आमचेच नुकसान आहे हे कळल्यावर त्याला आता ड्च्चु देत आहोत.
तेव्हा एखादा चांगला मराठी पेपर हातोहात सुचवुन टाका.त्यात आठवड्यातुन २-४ वेळा कथा व तत्सम साहीत्य छापुन यावं ही अपेक्षा आहे.ह्या बाबतीत सकाळ व लोकमत चांगले असावेत कारण मी ते मोबाईलवर वाचतो(कधीतरी).

तेव्हा आपण आपला फु़कटचा वेळ निरर्थक प्रतिक्रीया देण्यात न घालवता,काहीतरी भल्याचं काम करावं ही माफक अपेक्षा ठेउन आपला निरोप घेतो.

जय हींद!!!

नोंद : माझे गेल्या २-३ दीवसात(आजही) काही लेख व प्रतिसाद उडाले,मी कारण नेहमीप्रमाणे नाही विचारले(विचारुन फायदा व्हायचा तेव्हाही नाही विचारलं).पण असा लेख आधी प्रकाशित झाला आहे ह्या कारणाने हा लेख उडवु नये ही विनंती.
आणि एखाद्या सदस्याला माझ्या उगाच बावळटासारखं लिहण्याचा राग आल्या असल्यास आमच्या चुकांवर हसत पांघरुण घालावं ही ईच्छा!

जीवनमानसल्ला

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

12 Aug 2010 - 10:23 pm | नावातकायआहे

संध्यानंद आनी पोलिस टायम्स वाचा मंग तुमि दुसरा पेपर हातात घेनार नाय...

आता तुम्ही सुचवलेला पेपर कसं चुकीच्याच बातम्या देतो असा वाद घालायचाय काय?
बाकी तुम्ही थोडा काळ पेपर काय कुठल्याच बातम्या वाचणं सोडा..

>>> बाकी तुम्ही थोडा काळ पेपर काय कुठल्याच बातम्या वाचणं सोडा.

हा हा हा !! शिल्पा ब, _/\_.
बाकी तुम्ही भलतेच विनोदी बरकां. :) :)

शिल्पा ब's picture

13 Aug 2010 - 7:03 am | शिल्पा ब

आता यात विनोद तो काय...एक उपयोगी सल्ला एवढंच. ;)

छोटा डॉन's picture

12 Aug 2010 - 10:58 pm | छोटा डॉन

.पेपरात नोकरी,शिक्षण व विज्ञान ह्या विषयावर अलग विभाग असावा ही अपेक्षा.तेव्हा क्रुपया एखादा चांगला ईंग्रजी पेपर सुचवावा.

आणि आता मराठी पेपराबद्दल.आम्ही आमचा आत्ताचा पेपर खुप काळापासुन वाचत आहोत.अगदी नाक मुरडत,त्याच्या नावाने बोंबा मारत वाचला पण ह्याने कुणाचाच फायदा नसुन आमचेच नुकसान आहे हे कळल्यावर त्याला आता ड्च्चु देत आहोत.
तेव्हा एखादा चांगला मराठी पेपर हातोहात सुचवुन टाका.त्यात आठवड्यातुन २-४ वेळा कथा व तत्सम साहीत्य छापुन यावं ही अपेक्षा आहे.ह्या बाबतीत सकाळ व लोकमत चांगले असावेत कारण मी ते मोबाईलवर वाचतो(कधीतरी).

माफ करा, आपल्या अपेक्षित असणारे कंन्टेन्ट देणारे किंवा नको असलेले न देणारे कुठलेच वृत्तपत्र सध्या अस्तित्वात नाही.

म्हणुन, आपणच "नवा पेपर" सुरु करा असे सुचवतो.
हा हा म्हणता त्याचा प्रचंड खप होईल, वरचा कन्टेन्ट असेलच पण साथ में फ्री विरंगुळा मिळेगा तो मै नक्की विकत घेयेगा ह्यो पेपर ... :)

- ( वृत्तपत्रप्रेमी ) छोटा डॉन

चिरोटा's picture

12 Aug 2010 - 11:01 pm | चिरोटा

डी एन ए वाचा. स्वस्त आणि मस्त. दोन रुपयांनाच मिळतो ना मुंबईत पण? मिड डे/मिरर वगैरे दुसर्‍याकडून घेवून 'बघायचे' असतात आणि ५ मिनिटांत परत करायचे असतात. टाइम्स ऑफ इंडिया? स्पॉन्सर्ड न्युजचे चाळे त्यानीच चालु केले .त्यामुळे ते जे छापतात त्यात खरे काय खोटे काय काहीच समजत नाही.
मराठीत लोकसत्ता बरा असावा(कु.के. यांचे अधुन मधुन 'देशाला तारुन नेणार्‍या घराण्या' वरचे अग्रलेख सोडले तर!)
--

शानबा५१२'s picture

12 Aug 2010 - 11:48 pm | शानबा५१२

वरती प्रतिसाद दीलेल्या सर्वांचे मनापासुन आभार.
नावातकायाआहे आपण प्रतिसाद दीलात पण उपयोगी नाही वाटला.
शिल्पा ब व डॉन ह्या सदस्यांनी खुप हसवलं.
शिल्पा ब ह्यांचा एक प्रतिसाद अजुनही आठवला की हसायला येत्(प्रवासातले अनुभव की काय त्या लेखावरचा),शोधत होतो पण मिळाला नाही.
भेंडी बाजार मलाही हाच पेपर आवड्तो.

अच्छा खुप झाल.आता थोडं अतिमहत्वाच!

आज मिपावर एका सदस्याने जे मार्गदर्शन केल,त्यामुळे आयुष्यात खुप फरक पडला आहे.आता आपणास माझ्या बावळटपणावर कमेंट्स करायची संधी जन्मात कधी मिळणार नाही.
आता रसायनाचे ते आल्हाददायक सुगंध,ते डोळे सुखावणारे रसायनांचे रंग,ते मनाला वेड लावणारे बुडबुडे ह्या सर्वांचे निरीक्षण करण्यात आमची पुढची काही वर्षे जाणार.(सर्व आयुष्य गेलं तरी बेहत्तर(?)!!)
तेव्हा आता नो नॉनसेन्स!!

त्या सदस्याची परवानगी घेउन आभार प्रदर्शन करणारा लेख लिहीन्,तो पर्यंत.....
good night,sweet dreams!

आज मिपावर एका सदस्याने जे मार्गदर्शन केल,त्यामुळे आयुष्यात खुप फरक पडला आहे.आता आपणास माझ्या बावळटपणावर कमेंट्स करायची संधी जन्मात कधी मिळणार नाही.

त्या सदस्याची परवानगी घेउन आभार प्रदर्शन करणारा लेख लिहीन्,

Talk about contradiction! ;-)

पाषाणभेद's picture

13 Aug 2010 - 5:22 am | पाषाणभेद

>>> त्यात आठवड्यातुन २-४ वेळा कथा व तत्सम साहीत्य छापुन यावं ही अपेक्षा
या साठी केवळ सकाळ हेच उत्तर आहे. वाचकांचे अनुभव, उपदेशपर लेख, आरोग्याची (भिती घालणारी)डॉक्टरांची (स्पॉन्सर्ड) सदरे, मुक्तपिठासारखी पिठे आदिंची भरमार असते हल्ली.

प्रचेतस's picture

13 Aug 2010 - 9:33 am | प्रचेतस

शनिवार आणि रविवारच्या लोकसत्ता पुरवण्या खरोखरच वाचनीय असतात. तेव्हा ते २ दिवस लोकसत्ता घेत जा. स्थानिक बातम्यांसाठी सकाळ चांगलाच पण त्याबरोबरच राष्ट्रवादीपुरस्कृत बातम्या वाचणेही नशिबी येतेच.
रद्दीचे पैसे चांगले हवे असतील तर टाइम्स ऑफ इंडीया घेत चला. (शनिवार, रविवार सोडून स्वस्त मिळतो). अजूनही रद्दीसाठी विंग्रजी पेपराला जास्त भाव आहेच.

लोकसत्ता आणि टाइम्स ऑफ इंडीया हे चान्गले.

कथा शनिवारी व रविवारी लोकसत्ता चतुरन्ग, लोकरन्ग... लोकरन्ग नेह्मीच वाचनीय.. तम्बी दुराइ, केतकर, सन्जय ओक, (काकान्चा कट्टा वगळता...)

टाइम्स ऑफ इंडीया रोजचाच वाचनीय असतो... विशेष टाइम्स ऑफ इंडीयाची कोर्ट बीट उत्तम....आजच्या टाइम्स ऑफ इंडीया पान १७ वरील "हाउ टू सेव्ह द गेम्स..." हा २० कलमी योजना असणारा लेख वाचून पाहा... चान्गला आहे.
हे पत्र बर्याचदा तटस्थ वाटते(अपवाद नक्कीच आहेत).

एकूण काय वाचण्र्याने वाचत जावे... बर्या वाईटाची ओळख वाचूनच होईल नाही का?

शुभेच्छा.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Aug 2010 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार

चुकांवर हसत पांघरुण घातले आहे !

मैत्र's picture

13 Aug 2010 - 1:47 pm | मैत्र

केतकरांचे काही पूजन लेख सोडले तर लोकसत्ता बराच चांगला विशेषत: विकांताला.

मग त्याच धर्तीवर टाइम्स ऐवजी इंडियन एक्स्प्रेस वाचा. मुख्य कंटेंट शंभर पट जास्त चांगला आहे टाईम्स च्या एकांगी पुरस्कृत बातम्या, पाचकळ संदर्भ आणि रोज १-२ अर्धवस्त्रांकित फोटो. छापायला हरकत नाही पण बळंच खप वाढवायला. त्याचं नाव टॅब्लॉइड ऑफ इंडिया करायला पाहिजे.
शेखर गुप्ता आणि इतरांचे एक्स्प्रेस चे लेख खूपच उत्तम असतात. हिंदू पण आहे पण जड आहे आणि मुंबई फार कव्हर करणार नाही.
सकाळ चं नाव एक राष्ट्रवादी सकाळ केलं पाहिजे. हे पुरस्कृत बातम्यांमध्ये घोषित मुखपत्रांनासुद्धा सहज हरवतील. आणि पूर्वीचा पुरवण्यांचा दर्जा अजिबात राहिलेला नाही. त्या आयुर्वेदाचार्यांचा तर कहर चालू आहे. 'ओ सजना' नंतर त्या पुरवणीचं एकही पान गंमत / टाईम पास म्हणून सुद्धा वाचवत नाही.

भाऊ पाटील's picture

13 Aug 2010 - 2:01 pm | भाऊ पाटील

काही सुझाव- अलग विभाग
हे असच (हिंम्दीराठी)वाचायचे असेल तर मटा लावा.

हुप्प्या's picture

13 Aug 2010 - 5:04 pm | हुप्प्या

मराठी वृत्तपत्रांचा दर्जा, वैविध्य खालावते आहे असे वाटते.
टिळकांचा केसरी हा ह्या क्षेत्रातला क्रांतिकारक पेपर. नंतरही अनेक विचारी लोकांनी वृत्तपत्रे काढली. पण आता ती वैचारिक मुखपत्रे न रहाता पक्षीय बनली आहेत. सामना = शिवसेना, सकाळ = राष्ट्रवादी, लोकसत्ता = काँग्रेसी वगैरे. बहुधा वर्तमानपत्रे चालवणे हा आवाक्यातला धंदा राहिलेला नाही.

मी-सौरभ's picture

14 Aug 2010 - 4:02 pm | मी-सौरभ

तुमचं गाव कोन्त?
पुन्या मुम्बईचे असाल तर ठीक, गावात काय यील तो वाचा...

मला लोकसता आणि डी एन ए सुचवाय्ला आवडेल..

अप्पा जोगळेकर's picture

14 Aug 2010 - 4:10 pm | अप्पा जोगळेकर

चटकदार वाचायचं असेल तर सामना नं १ पेपर आहे.

अर्धवट's picture

14 Aug 2010 - 4:12 pm | अर्धवट

इन्ग्रजी- ईं एक्स्प्रेस.
मराठी - लोकसत्ता