प्रेमपत्र पहिले तिचे ,
सर्व काहीं सांगत होते.
आतुरलेल्या भावनांना ,
शब्द्फुलांनी सजवले होते.
सजवलेला प्रत्येक शब्द ,
फुलाप्रमाणे भासत होता .
अवखळ तिच्या नखरयापरी,
मनामध्ये ठसत होता .
पत्र जेंव्हा वाचुन झाले ,
आनंदाला उधाण आले .
तिच्या मधुर प्रेम वर्षावाने,
मनात प्रेमचांदणे खुलले .
पत्र तिला लिहिण्यासाठी ,
हात माझे सळसळले .
पेन घेतला , कागद घेतला ,
मग मला जाणवले .
पत्र तिला लिहीण्यापुर्वीच ,
शब्द सारे थिजुन गेले .
सुरवात , शेवट तिचीच घेतली ,
मजकुर फक्त माझा होता .
" आय लव यू "
पण तो सुध्दा तिच्या पत्रात ,
दिमाखात झळकत होता .