आमची प्रेरणा पुन्हा एकदा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा
हा दारूच्या 'फुल'पात्रांचा दोष असावा
पेगलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा
कधीतरी दारूची भाषा तिला कळावी
कधीतरी मज पेग तिने ही मग मागावा
ग्लास-क्वार्टर ह्या दोन्हीही मापामध्ये
पीण्याचा सारांश कसा सांगा बसवावा
किती पेग मी पिऊन झाले तरी न मजला
कधीच हा तळ या पिंपाचा ना लागावा
उगाच चर्चा पील्यावर केली माझ्याशी
चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा
उद्या सकाळी उतार्यास ही घ्यावी थोडी
मेंदूमधला मुंग्यांचा दंगा थांबावा
आज गटारी मुहुर्त उत्तम आहे "केश्या"
एक आयडीया, घरीच गुत्ता उघडावा
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 6:17 pm | अविनाशकुलकर्णी
वाचुन टाईट झालो अखेर हा निष्कर्ष निघावा
7 Aug 2010 - 8:10 pm | अविनाश ओगले
कधीतरी दारूची भाषा तिला कळावी
कधीतरी मज पेग तिने ही मग मागावा
'पेग' पेक्षा 'मग' मोठा असतो ना? मग कशाला? आधीच मागू दे!