महागाई

मृण्मयी दीक्षित's picture
मृण्मयी दीक्षित in जनातलं, मनातलं
5 Aug 2010 - 8:37 pm

महागाई......

महागाई केवढी वाढलेय न, २०० रुपये कधी खर्च झाले माहीत नाही. सकाळी कामाला निघाले. ऑटोत बसले १५ रु, परत मालाडहून ऑटो २५ रु दुपारी कॅफेटेरीयात लंच घेतला [ वेज ] - ५८ रु. इवनिंग टी १५ रु, परत जाताना ऑटोचा एकूण खर्च ४० येताना एक ब्रेड २०/- दुध २७/- लिटर.

७ वर्षांपूर्वी

ब्रेड - १०/-
दुध - १५/- लिटर
घर ते स्टेशन ऑटो - ४/- बस - ३/-
विजेचे बिल, केबलचे बिल, कडधान्य, फळे सर्व आताच्या तुलनेत स्वस्त होत

लिहिण्याचे कारण म्हणजे काहींचे ठीक आहे पण ज्यांचा पगार ६ ते ७ हजार आहे. त्यांचे कसे होत असेल. अर्थात आपण लिहिण्याशिवाय व त्यावर प्रतिक्रिया देण्याशिवाय बाकी काही करू शकत नाही.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

5 Aug 2010 - 10:02 pm | नावातकायआहे

ज्याच्या कड पैशेच नाय तो

ऑटोत बसले १५ रु,
चालत नाय तर बसनी जायल

परत मालाडहून ऑटो २५ रु
वरिल प्रमाने

दुपारी कॅफेटेरीयात लंच घेतला [ वेज ] - ५८ रु.
राईस प्लेट नाय तर घरन डबा आनेल

इवनिंग टी १५ रु,
टपरिवर चा पेल

परत जाताना ऑटोचा एकूण खर्च ४०
परत चालत नाय तर बसनी

पैशे हायत म्हनुन जातात ज्याच्याकड नाय तो रडत खडत का व्हयना भागवतोय

एक्दा फक्त २० रुपये आनि घरन डबा घेउन जावा बघा आपसुक भागतय आनि' त्यांना' कस वाटत आसल ते बि कळल

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2010 - 10:19 pm | पिवळा डांबिस

अभिप्राय आवडला!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Aug 2010 - 1:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आवडले. लय भारी !!!

सुनील's picture

5 Aug 2010 - 10:21 pm | सुनील

अहो मृण्मयीतै, सात वर्षांपूर्वीच्या खर्चाचा हिशोब लावताना सात वर्षांपूर्वीचे उत्पन्नदेखिल धरता ना?

म्हणजे, महागाई वाढली नाही असे नाही, पण लेख "बॅलन्स्ड" हवा!

बरखा's picture

5 Aug 2010 - 10:42 pm | बरखा

तुमचा ह लेख वाचुन मला एक गोष्ट आठवली.
माझी काकु तशी कनजुष् .महागाई वाढली,म्हणुण तिच्या काम वालिने
पगार वाढुन मागितला,तर मझ्या काकुने तिला दिलेले हे उत्तर
"महागाई आम्हाला वाढलि,तुला कसली आली महागाई,
भान्डि आमचि ;साबन आमचा ;पाणि आमच,ह्या सगळ्याचे पैसे पन आम्ही देतो;
मग सगळ आमच वापरल्या वर
तुला आणखिन पगार का द्याय चा."
पण खरच अश्या लोकान बद्दल कोण विचार करत?

शिल्पा ब's picture

5 Aug 2010 - 10:49 pm | शिल्पा ब

सारखं आटो ने काय जायचं? एवढी चांगली बेस्ट बससेवा आहे तिचा लाभ घ्या...शेअर आटो करा...चहाच प्यायचा तर कटिंग घ्या..
लंचसाठी घरून डबा न्या...मग कशाला एवढे पैसे लागताहेत?

आम्ही सांगितलेले उपाय करून परत एक लेख लिहून सकल जणांना शहाणे करून सोडा.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Aug 2010 - 9:15 am | llपुण्याचे पेशवेll

सारखं आटो ने काय जायचं? एवढी चांगली बेस्ट बससेवा आहे तिचा लाभ घ्या...शेअर आटो करा...चहाच प्यायचा तर कटिंग घ्या..
झालंच तर सायकल वापरा. म्हणजे फिटनेस क्लब सारखा एक अजून महागडा खर्च वाचेल. स्टेशनजवळ राहणारा मित्र-मैत्रीण बघा. सायकल ने जायचं त्याच्या घराखाली सायकल लावायची. किमान २ वेळचा रिक्षाचा खर्च वाचेल.

उपास's picture

5 Aug 2010 - 11:51 pm | उपास

बघा किती महागाई आहे बाहेर, सगळ्यांनाच महागाई.. स्त्रिया आणि पुरुष भेदाभेद नाही त्यात, म्हणूनच घरी स्वयंपाक यायलाच हवा दोघांनाही ! :)

सहज's picture

6 Aug 2010 - 8:21 am | सहज

<प्रकाशकाका मोड>

मध्यमवर्गाच्या ह्या महागाईचा इथेइथे हिशोब लावायचा प्रयत्न केला होता.

< / प्रकाशकाका मोड>

महागाई वाढली आहेच.. आणि याची जाणीव लेखिकेला झाली ईतकेच.. महागाईची 'झळ' मात्र त्यांना बसलेली नाही हे स्पष्ट आहे..

नितिन थत्ते's picture

6 Aug 2010 - 2:04 pm | नितिन थत्ते

>>महागाईची 'झळ' मात्र त्यांना बसलेली नाही हे स्पष्ट

त्यांच्या प्रोफाईलप्रमाणे उपमहाप्रबंधक आहेत. झळ कशाला बसेल?

मदनबाण's picture

6 Aug 2010 - 11:09 am | मदनबाण
मराठमोळा's picture

6 Aug 2010 - 2:24 pm | मराठमोळा

>>लिहिण्याचे कारण म्हणजे काहींचे ठीक आहे पण ज्यांचा पगार ६ ते ७ हजार आहे. त्यांचे कसे होत असेल

६ ते ७ हजार? दीड ते दोन हजार पगार असलेले लोकंही आहेत मुंबैत.
एक उदाहरण, परेलमधे एका चाळीतली एक सिंगल रुम, भाडे ४ हजार रुपये माणसे २०. काही रात्रपाळी करणारे तर काही दिवसा, रात्री १० लोकं आणि दिवसा १० त्या रुममधे झोपतात. स्वयंपाक घरातच बनवतात (शक्यतो स्वस्त तांदळाचा भात आणी कधी कधी भाजी.) कामावर जाण्यासाठी बसचा/लोकलचा पास वापरतात. सदरे दोनच. तेच धुवुन पुन्हा पुन्हा वापरायचे.

महिन्याकाठी टोटल खर्च = एक हजार ते बाराशे प्रत्येकी. उरलेले पैसे मनी ऑर्डर ने गावी आई,वडील, भावंडे बायका मुले यांच्यासाठी पाठवतात.

आता बोला.