पुस्तक परिक्षण: "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" आणि त्या पुस्तकाच्या पुढच्या मालिका..

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
4 Aug 2010 - 8:19 pm

नुकतेच "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" चे मराठी भाषांतर विकत घेतले आणि आताच वाचून संपवले.
(संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली)
हे एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत रॉबिन शर्मा. दक्षिण अमेरिकेतील "शर्मा लिडरशीप इंटरनॅशनल " चे चालक, मालक, संस्थापक. त्यांची व्याख्याने जगभर होतात-व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे धडे याबद्दल.
आणखी माहिती रॉबिनशर्मा डॉट कॉम वर वर मिळेलच.
या लेखाचा मूळ उद्देश्य म्हणजे या पुस्तकाबद्दल मला आलेले अनुभव-
बाजारात व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे तसे अनेक पुस्तके येतच असतात. प्रत्येक पुस्तक बेस्ट्सेलर असल्याचा दावा करत असते.
या सगळ्यात आणखी हे एक पुस्तक?
नाही.
पण यात खूप वेगळेपण आहे.
मुख्य म्हणजे भारतीय वंशाचा लेखक.
दुसरे म्हणजे यात व्यक्तीमत्त्व विकास साधण्यासाठी ज्या पद्धती संगितल्या आहेत त्यांचे क्रेडीट लेखकाने प्रथमच योग्य त्याच व्यक्तींना दिले आहे. त्या व्यक्ती आहेत हजारो वर्षांपूर्वीचे भारतातील (किंवा पूर्वेकडील असे आपण म्हणू शकतो) साधू आणि योगी.
त्यांचेच शास्त्र आपण विसरत चाललो होतो, पण परदेशातील लेखक तेच पण वेगळ्या शब्दांत मांडून पुस्तक लिहितात.
(उदा- ओरिसन स्वेट मार्डेन, नॉर्मन विन्सेंट वगैरे.
शिव खेरांनी ही बर्‍यापैकी लिहिले आहे पण थोडे किचकट आनी नियमांच्या स्वरुपात.)
पण रॉबिन ने ते सगळे क्रेडीट पूर्वेकडच्या लोकांना देण्याचे धाडस प्रथमच करून दाखवले आहे.
या सगळ्या गोष्टी पुस्तकात एका सुरस, अद्भुत काल्पनीक कथेच्या रूपात दिल्या आहेत. जी अगदी खरीखुरी वाटते.
या काल्पनीक कथेत आणखी एक दंतकथा आहे ज्यात प्रतीके म्हणून निसर्गातील व व्यवहारातील काही साध्या वस्तू/गोष्टी वापरल्या आहेत. कशा? ते अगदी वाचून अनुभवण्यासाठीच आहे.
यानंतरची याच मालिकेतली खाली दिलेली पुस्तके ही मी वाचली आहेत.
"द ग्रेटनेस गाईड- १०१ वेज टू रीच नेक्स्ट लेव्हल" हे इंग्लिशमधून तर, "हू वील क्राय व्हेन यू डाय " चे मराठीत भाषांतर मी वाचलेले आहे.
ही दोन्ही पुस्तके ही अप्रतिम आहेत. संग्रही असावीत अशीच आहेत....
मला वाटते सर्व मिसळपावकर मंडळींनी ती वाचावीत असे मला वाटते.

कलावाङ्मयसाहित्यिकप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाभाषांतर

प्रतिक्रिया

सूर्यपुत्र's picture

4 Aug 2010 - 8:53 pm | सूर्यपुत्र

मूळ लेखकाची परवानगी घेतली गेली आहे का????

चित्रा's picture

4 Aug 2010 - 9:31 pm | चित्रा

मुद्दा कदाचित योग्य असेल, पण भाषांतराची परवानगी घेतली आहे का नाही, हे ठरवण्याचे काम निमिष सोनार यांचे बहुतेक नसावे. तुम्हाला जे प्रश्न पडले आहेत ते थेट श्री. शर्मा यांच्याशी संपर्क साधून निराकरण करून घेता येतील असे वाटते. तुम्हाला श्री. सोनार यांच्याविषयी जे प्रश्न आहेत ते त्यांच्याशी थेट संपर्क साधून विचारता येतील असेही वाटते.

सोनार यांनी मराठीकरण कोणी केले आहे त्याबद्दल लेख पूर्ण करण्याच्या दृष्टीने माहिती द्यावी असे मात्र सुचवत आहे.

सूर्यपुत्र's picture

4 Aug 2010 - 9:44 pm | सूर्यपुत्र

धन्यवाद.
बाय द वे, मी हे पुस्तक वर्षांपूर्वीच वाचले आहे..... छान हैत...

खूप ऐकून आहे या पुस्तकाबद्दल.

मिहिर's picture

4 Aug 2010 - 10:05 pm | मिहिर

निम्मेच वाचले. नंतर कंटाळा येऊ लागला व तेचतेच पुन्हापुन्हा येतय असे वाटू लागले. त्यामुळे पूर्ण केले नाही. त्यापेक्षा शिव खेरांची पुस्तके बरी वाटली मला.

मराठमोळा's picture

4 Aug 2010 - 10:36 pm | मराठमोळा

>>निम्मेच वाचले. नंतर कंटाळा येऊ लागला व तेचतेच पुन्हापुन्हा येतय असे वाटू लागले
सहमत आहे.
मी तर निम्मे सुद्धा वाचु नाही शकलो. यापेक्षा "स्वामी परमहंस योगानंद यांचे Autobiography of a Yogi
" कैक पटीने चांगले वाटते.

उपास's picture

5 Aug 2010 - 2:16 am | उपास

पुस्तक फार पूर्वीच वाचले होते, ह्या पुस्तकाच्या नावातला 'सोल्ड' हा शब्द तितकासा पटला नाही.. 'डोनेट' किंवा 'गेव्ह अप' का म्हणू शकला नाही लेखक? म्हणजे सर्वसंगपरित्याग हा मुळातच कुठेतरी राहून गेलाय असं वाटलं, जो ह्या पुस्तकातल्या ढाच्याशी नक्कीच विसंगत वाटला.. तरीही एकूणात पुस्तक ठीक वाटले.
अवांतरः ह्याच साच्यातले जी.के. प्रधानांचे 'साद देति हिमशिखरे' हे अनुवादित (मूळ इंग्रजी : Towards ihe Silver Crest of Himalayas) पुस्तक वाचले, खूप्पच आवडले.. आणि Autobiography of a Yogi तर ऑल टाईम ग्रेटच. असो!

नगरीनिरंजन's picture

5 Aug 2010 - 9:10 am | नगरीनिरंजन

एग्झॅक्टली हाच प्रश्न मला पडला. 'सोल्ड' का? त्यामुळे पुस्तक घेतले नाही आणि वाचले पण नाही. तसाही मला उपदेशपर पुस्तकांचा जरा रागच आहे.

निखिल देशपांडे's picture

4 Aug 2010 - 11:06 pm | निखिल देशपांडे

या पुस्तकाशी संबंध नसलेले पण "आय बॉट मॉक्स फेरारी" नावाचे एक पुस्तक वाचले होते.
कोणी वाचले आहे का??

दत्ता काळे's picture

4 Aug 2010 - 11:13 pm | दत्ता काळे

अवांतरः ह्याच साच्यातले ग.प्र.प्रधानांचे 'साद देति हिमशिखरे' हे अनुवादित (मूळ इंग्रजी : Towards ihe Silver Crest of Himalayas) पुस्तक वाचले, खूप्पच आवडले.. असो!

.. हे पुस्तक कै. ग.प्र. प्रधानांचे आहे ? , मला हे 'प्रधान' वेगळेच आहेत असे वाटते.

मिहिर's picture

4 Aug 2010 - 11:38 pm | मिहिर

मलापण तसेच वाटते. ते बहुधा जी. के. प्रधान आहेत.

उपास's picture

5 Aug 2010 - 2:17 am | उपास

सॉरी.. जी.के. प्रधानांचेच आहे ते, चुकीची दुरुस्ती केली आहे. जी.के.प्रधानांवर अत्र्यांनी सूर्यास्त मध्ये लेख लिहिला होता, मिळाला तर बघतो.

ऋषिकेश's picture

4 Aug 2010 - 11:17 pm | ऋषिकेश

चांगला परिचय
पुस्तक परिचय पुस्तकविश्ववरही (http://www.pustakvishwa.com/) द्यावेत जेणेकरून भविष्यात पुस्तकावरून परिचय शोधताना सोपे जाईल ही विनंती

बंडल पुस्तक आहे. मी कोणालाही शिफारस केली नाही/ करणार नाही.
यापेक्षा कितीतरी अधिक चांगली पुस्तके याच्या आधीपासून उपलब्ध आहेत.

निमिष सोनार's picture

5 Aug 2010 - 8:09 am | निमिष सोनार

मराठी अनुवाद सौ. मालती प्रमोद जोशी यांनी केलेला आहे. अर्थातच परवानगी घेवून. जयको पब्लिशिंग हाऊस.

आत्मशून्य's picture

6 Aug 2010 - 2:52 am | आत्मशून्य

अथवा सन्यासी ज्याने भौतीक गोष्टी त्यागल्या , अथवा माणसाने संन्याशी आसे बनावे, असे नाव असते तर किती लोकानी ते वाच्ले असते ? म्हने फेरारी विकली ? दान करायची होती फ़ूकट सोडायची होती आम्हि सांगितले काय विका म्हणून, पण विकली सांगितले की फ़ायदा कमावल्याचा भाव निर्माण होतो आणि पूस्तकाला गिर्हाइक पण भेटत . आमचे ज्ञान आम्हालाच विका .... बाकी ति गोष्ट लामा लोकांची आहे , वाचायला छान वाटते पण implementation शक्य नाहि .

आहो lottery कींवा inheritance शीवाय जिवनातली पैशांची धडपड संपूष्टात येणार आहे काय ?देहाला आराम आणि चित्ताला द्यावा लागणारा वेळ सापडनार काय ?

मराठीमधे ज्ञानेश्वरी आहे भागवत आहे ते तूम्ही नाहि बघणार, शेवटी फ़ेरारीच भाव खाणार. लाज वाटली पाहिजे ....ह्यांचे काय जाते उपदेष करायला ? एक दिवस 5start hotel च्या बाहेर सेमिनार द्या मग बघू किती गोष्टींचा त्याग घडतो लेखका कडून ....

त्या मॉन्क ने संपत्ती विकली नसती तर भारतात हिंडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याला पैसे कोणी पुरवले असते?
आणि पुस्तकाचे शिर्षक तसे ठेवले असावे कारण त्या आकर्षक शिर्षकामुळे का होईना, लोक पुस्तक विकत घेवून चांगल्या गोष्टी वाचतात तर खरे ना!

आपल्याकडचे ज्ञानेश्वरी, गीता वगैरे ग्रंथ आपल्याला जगायचे कसे ते शिकवतात यात वादच नाही.
प्रत्येक भारतीयाकडे ती पुस्तके असावीतच. ती माझ्याकडेही आहेत. त्या पुस्तकांच्या लोकप्रियतेबद्दल आणि उपयुक्ततेबद्दल वादच नाही.
हे पुस्तक परकिय आहे म्हणून मी त्याची स्तुती केली नसून त्या लेखकाने या सगळ्या ज्ञानाचे क्रेडीट भारतीयांना दिले आहे याचे कौतुक वाटले, अभिमान वाटला.
आणि ते ज्ञान काल्पनिक प्रतिकात्मक स्वरूपात दिल्याने ते लक्षात ठेवायलाही सोपे जाते.
एवढेच!!
पुस्तक छान आहेच.
त्यामुळे इतर पुस्तके छान नाहीत असे मी म्हणत नाही...