Ph.d मुंबई/पुणे,माहीती हवी आहे.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
4 Aug 2010 - 12:59 pm

'अनुभवींनी मदत करावी' हा लेख लिहला होता.त्याबद्दल एवढच सांगतो की मी त्या रात्री सांगितल्याप्रमाणे धुडगुस घातलाच!!
नाही,नकार नाही आला,एक वेगळे कारण होतं.आणि त्याच्या दुस-या दीवशीही लय म्हण्जी लय पिली.आनंदात व दु:खातही.आनंद Ph.d करायला मिळणार ह्याचा व दु:ख first class ५ मार्कांसाठी गेल्याचं!
अजुन एक कारण होत्,ते जास्त खाजगी आहे.........असो.

मला पुणे व मुंबई university ची Ph.d ला प्रवेश मिळवण्याची प्रक्रीया,प्रवेश परीक्षेत येणा-या प्रश्नांचे स्वरुप्,त्या परीक्षेसाठी अवश्यक पुस्तके व इतर सर्व अटी वगैरे माहीती करायच्या आहेत.

इथले बरेचसे पुण्याचे/मुंबईचे आहेत व माहीतीगार आहेत,त्यांनी मार्गदर्शन करावे.

Thank you in advance!

शिक्षणसल्ला

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

4 Aug 2010 - 1:01 pm | शानबा५१२

Sorry,sorry माझा विषय Organic chemistry आहे.आणि मी आता M.Sc पुर्ण केली.

आता पी एच डी साठी एंट्रन्स आहे. मी पण माहिती जमवत आहे. सर्व विषयांसाठी अनिवार्य असा अभ्यासक्रम हा एक पेपर आहे. बाकी आपापल्या विषयाशी संबंधित. ( माझा विषय सायकॉलॉजी )

टिळक विद्यापीठात चौकशी करा... तिथल्या विद्वानांना (आउट्डेटेड असली तरी) चांगली माहिती असते.

कुणी प्रा.वाडॉ. माहित असतील तर मदत करा की राव शानबाला..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2010 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या औरंगाबाद येथील डॉ.बा.आ.म.विद्यापीठात पीएच.डी.साठी पूर्वपरीक्षा घेतली जाते. पहिला पेपर हा चाळीस गुणांचा असतो त्यात वीस गुण पडले तरच त्याला दुसरा पेपर देता येतो. दुसरा पेपर साठ गुणांचा असतो. त्यात तीस गुण आवश्यक असतात. आमच्या विद्यापीठातील 'पेट' चे अभ्यासक्रम असे आहेत. आपल्या विषयाचीही तिथे माहिती दिली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये काहीतरी संशोधन करा. आजकाल चांगले दिवस आहेत त्याला.

शानबा५१२'s picture

4 Aug 2010 - 3:19 pm | शानबा५१२

Organometallic आवडत्,कारण उपयोगी आहे.

तु बोललास ती शाखा physical बदलांवर जास्त व रासायनिक बदलांवर कमी अवलंबुन आहे अस मला वाटत्,म्हणुन त्याच आकर्षण कमी आहे.

इन्द्र्राज पवार's picture

4 Aug 2010 - 3:28 pm | इन्द्र्राज पवार

"नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये काहीतरी संशोधन करा. आजकाल चांगले दिवस आहेत त्याला."

मान्य. पण श्री.शानबा हे ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे पदव्युत्तर विद्यार्थी आहेत त्यामुळे "नॅनोटेक्नॉलॉजी" ला जाण्याची त्यांची इच्छा असल्यास त्यांना पुनश्च बी.एस्सी.च्या गुणावरून पुढील वाटचाल करावी लागेल. स्थिती अशी आहे ~~

At present, no reputed institute in India is offering courses in Nanotechnology at the graduation level. Eligibility criteria for doing Post Graduation in Nanotechnology is Bachelor's degree with a minimum of 50% marks in Physics, Chemistry, Mathematics and Life Sciences and with PCM (Physics, Chemistry and Mathematics) as subsidiary subjects.

आता त्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्याने पुन्हा तो प्रोसेस करावा असे त्यांना कदाचित वाटणार नाही, त्यामुळे पीएच.डी. चे ध्येय हाच चांगला राजमार्ग आहे. मुंबई आणि पुणे या विद्यापीठांच्या साईट्सवर त्यांना या संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळू शकेल असे वाटते.

श्री.शानबा यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
इन्द्रा

सल्ला ठीक आहे. प्रेमकाव्य कसे?

शानबा५१२'s picture

4 Aug 2010 - 7:24 pm | शानबा५१२

ह्या विषयावर आमच प्रेमच आहे तस्,अगदी खरं!

चित्रा's picture

4 Aug 2010 - 7:33 pm | चित्रा

खोडकरपणा काबूत ठेवावा, हा सल्ला.
प्रेमकाव्याचे शिक्षण करायला वेळ लागत नाही.

धन्यवाद.

शानबा५१२'s picture

4 Aug 2010 - 7:45 pm | शानबा५१२

खोडकरपणा काबूत ठेवावा, हा सल्ला.

'
मी खोडकरपणा करतो हा गैरसमज आहे,मला सर्वच चुकीच समजतात.तुम्हीही चुकीच समजलात.
असो,बाकी प्रेम वगैरे बाबतीत आपल्याला कधी लाल शेराही नाही भेटला,नेहमी नापास!