एक अनुभव...
माझ्या बहीणीच्या एक मैत्रीणीची या वर्षी MBA साठी पुण्यातील एका प्रथितयश कॉलेजमधे निवड झाली. त्या कॉलेजमधे पुढील admission process साठी ती गेली असता तिथे तिला फी ७२०००/- सांगितली गेली, त्यानुसार दुसर्या दिवशी ती फी भरण्यास गेली असता तिला अचानक ७४०००/- भरावे लागतील असे कॉलेजने सांगितले.. तिने त्यावेळेस सोबत ७२०००/- आहेत असे सांगितले तेंव्हा कॉलेजने ऊरलेले २०००/- नंतर येऊन जमा करा असे म्हटले.. त्यानुसार तिने ७२०००/- त्याचदिवशी भरले, पण तिला पोचपावती फक्त ६७०००/- ची देण्यात आली. बाकी रकमेच्या पावतीबाबत विचारणा केली असता कॉलेजने उडवाऊडवीची ऊत्तरे देवून उरलेल्या रकमेची पावती देण्यास स्पष्ट नकार दिला, प्रवेश घ्यायचा असेल तर घ्या असेही दटावले..
सरळ सरळ कळतेय कि कॉलेज व्यवस्थापन (किंवा तेथील लोक.. व्यवस्थापनाच्या नकळत?) ७०००/- रुपये प्रत्येक विद्यार्थ्यामागे अक्षरशः खातेय आणि मला हि माहीती समजल्यानंतर याविरुद्ध आवाज उठवायचा आहे.. मी माझ्या परिने जे शक्य आहे ते करिनच, पण कोण्या मिपाकराला याबाबत नक्कि काय करायचे याची शास्रीय माहिती असल्यास मार्गदर्शन करावे...
प्रतिक्रिया
2 Aug 2010 - 1:40 pm | परिकथेतील राजकुमार
सुहास ह्या मिपा सदस्याशी संपर्क साधा.
2 Aug 2010 - 1:52 pm | महाबळ
MBA कॉलेज जर AICTE कडून मान्यताप्राप्त असेल तर तुम्ही इथे जाऊन आपले मत नोन्दवु शकता...
http://www.aicte-india.org/
तुम्हाला तिथे अधिक माहिती मिळू शकेल
2 Aug 2010 - 7:28 pm | पाषाणभेद
देणगी रकमेची पावती द्यायलाच हवी. नसतील देत तर फौजदारी खटला दाखल होवू शकतो. पण तुम्ही रक्कम देवून टाकलेली आहे. पुरावा राहिलेला नाही. व्यवस्थापनाशी चर्चा करून कमीतकमी तुमची रक्कम तरी तुम्ही परत मागू शकता.
2 Aug 2010 - 9:52 pm | शिल्पा ब
हि तर सरळ सरळ चोरीच आहे....पण इतर ठीकांचीही चौकशी करावी नाहीतर इथून पैसे मागून घेतले (आणि त्यांनी दिले ) आणि दुसर्या कालेजात सुद्धा हीच तऱ्हा असेल तर मग काय करणार? तरी पण आवाज नक्कीच उठवता येईल...