अरे देवा मी काही सुखी नाही
नवरा आहे मुलं आहेत
घरदार भरलेलं आहे
तरीही मन रमत नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
अंधेरीला प्लॅट आहे पाली हिलला बंगला आहे
सजवलेला एसी बेडरूम आहे
वॉटरबेडशिवाय मला झोप येतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
नोकर आहे चाकर आहे
स्वयंपाकासाठी मावशी आहे
नावाला भाजीची फोडणी मी देई
अरे देवा मी काही सुखी नाही ||
टिव्ही आहे डिव्हीडी आहे
झालंच तर मल्टीफ्लेक्स मुव्ही आहे
तरीही करमणूक कशी नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
पिझ्झा आहे बर्गर आहे
फाईव्ह स्टार डिनर आहे
तरी आजकाल चांगलचुंगल मी खातच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
तर्हेतर्हेचे कपडे आहे निरनिराळे ड्रेस आहे
ब्युटीपार्लरची मेंबर आहे
तरी फॅशन पुरी होतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
एक दोन नाही तीन नाही
चार चार चाकी गाड्या आहेत
कोणत्या गाडीत बसावं कळतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
देव आहे देवी आहे
आध्यात्मिक संत आहे
तरी कोणा बुवा महाराज भजू समजतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
अर्धा पेला भरलेला अर्धा रिकामा आहे
आहे ती परिस्थिती काय वाईट आहे
तुला पदरचे सुख उमगत नाही
अरे पाषाणा तू दु:खी नाही ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०७/२०१०
प्रतिक्रिया
24 Jul 2010 - 8:11 pm | मीनल
अरे देवा मी काही सुख नाही
च्या ऐवजी
अरे देवा,हे काही सुख नाही
कसं वाटतंय?
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
24 Jul 2010 - 9:57 pm | पाषाणभेद
अरे गलती झाली ताई. मी ड्राफ्ट मध्ये 'अरे देवा मी काही सुखी नाही' असेच लिहीले होते. नंतर सुरवातीच्या ओळीत सुख झाले अन ते सुख सगळीकडे पसरले. अन त्या सुखात मी वाहवत गेलो अन ही चुक झाली बघा.
बाकी तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे "अरे देवा,हे काही सुख नाही " हे ही परफेक्टच आहे.
तुमच्यासारखे शिक्षक असतांना चुकार मुलं चुका करतील काय?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
24 Jul 2010 - 10:15 pm | मीनल
तुमच्यासारखे शिक्षक असतांना चुकार मुलं चुका करतील काय?
तरी केलीच की चूक!
काय म्हणावं तरी काय आता?
अरे देवा, माझे काही खरे नाही.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
25 Jul 2010 - 10:08 am | तिमा
अरे देवा, हे काही सुख नाही
कारण....
ट्रॅक्टरमधे डिझेलच नाही
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
25 Jul 2010 - 10:18 am | पाषाणभेद
आता तुमी हात लावून टाकी नीट हालवली नाय आन मंग डिझल संपल तवा तुमाला जाग आली व्हय? आता पंपाव जावा बिगीबिगी.
26 Jul 2010 - 2:58 am | पारुबाई
एक दिवस शान्त पणे विचार करा कि काय घडले किन्वा काय मिळाले कि तुम्हि सुखी होणार आहात.