आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल कोणत्या चिमटीत मी त्याला धरू कोणत्या मापात मी पेला भरू?आमचे होईल मग फुलपाखरूआमची होणार वाताहत अतालागली दारू जशी ही ओसरूरोज मी तेव्हाच गुत्ता सोडतोलागता ती बारबाला आवरूसोडती घरला बरोबर सोबतीलागते अमुचे जसे माथे फिरूलडखडाया लागला पाया किती!बिल भरू ? की हा अधी गल्ला धरू ?प्यायली इतकी अता मग मी कसेप्यायलो नक्की किती पेले स्मरू?---------कलम १ -----------------खूप नक्षीदार आहे बाटलीही उद्या पाण्यास आता वापरूपेग भरण्या वेळ दवडाया नकोबाटली उघडू, तिचे पेले करूबायकोने नेत्र आहे रोखले(सांग मी पुढचा कसा पेला भरू?)ही विदेशी आणि देशी हातभट्टीबोल "केश्या" ही भरू की ती भरू१. देशी किंवा विदेशी मदिरेत बेवड्याला जेव्हा झिंगायचे असते (चार किंवा त्यापेक्षा जास्त पेग) , तेव्हा त्या पेगाच्या वर किंवा मध्ये किंवा दोन क्वार्टरच्या नंतर तिथे हाफ़ असे मोजून पुढील पेये ही एकत्रितपणे ओतावीत, असा बेवडांचा निर्देश असतो. मराठी विडंबनात ही पद्धत राबवायची असल्यास मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर मला प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ दोन वस्तू मिसळणे असाही आहे. (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र श्री. चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )
प्रतिक्रिया
19 Jul 2010 - 8:44 am | उदय
अफलातून लिहिले आहे.
साष्टांग दंडवत. :))
19 Jul 2010 - 9:52 am | अमोल केळकर
आठवड्याची मस्त सुरवात :)
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
19 Jul 2010 - 10:19 am | आंबोळी
हा शनिवार / रविवार चा उतारा मस्तच....
विकारंभ छान झाला!
आंबोळी
19 Jul 2010 - 6:29 pm | श्रावण मोडक
तळटीप भारीच. त्यातही मार्गदर्शनाबाबतचा मजकूर खासच!
19 Jul 2010 - 8:27 pm | चतुरंग
विडंबन चांगले झाले असले तरी खास असे म्हणणार नाही कारण हा केसुंचा हातखंडा विषय आहे..
चतुरंग
19 Jul 2010 - 9:04 pm | ब्रिटिश
कदी बसाच दादुस ?
पन मापात पाप नको. क बोल्तो ?
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
19 Jul 2010 - 9:37 pm | लिखाळ
टाळ्या टाळ्या !
फार भारी..
फुलपाखरू , बारबाला, माथे फिरू हे तर फारच आवडले :)
-- लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.
19 Jul 2010 - 10:07 pm | मिसळभोक्ता
"स्मरू" जरा खटकते. जरा सोपा, बोली भाषेतला, बेवड्यांना कळण्यासारखा शब्द वापरता येईल काय ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
20 Jul 2010 - 3:29 am | केशवसुमार
आम्ही पाहिलेले बेवडे ह्या पेक्षा जडजड शब्द बोलतात..
(अनुभवी भोई)केशवसुमार
स्मरू त्यातल्या त्यात मुळ यमकाच्या जवळाचे आहे म्हणून वापरले
(त्यातल्या त्यात्)केशवसुमार
तुमच्या विनंती नुसार बेवड्याला समजेल असे अजून एक कडव घ्या..
मुळ यमक तसेच ठेवून
(पर्यायी)केशवसुमार
प्यायलो इतक्या जणीच्या मुळे मी / प्यायलो इतक्या तर्हेचे ब्रँड मी
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?
20 Jul 2010 - 3:36 am | मुक्तसुनीत
कठीण कठीण शब्द नको असतील तर...
प्यायली इतकी अता मग मी कधी
डीयूआय चार्जेस ऐकोनि मरू?
20 Jul 2010 - 11:20 am | पिवळा डांबिस
डीयूआय चार्जेस ऐकोनि मरू?
त्येंच्याकडं ऑटोभान आसतंय.....
आनि मर्सिडीसचं इंजानबी असतंय...
मग भां** बा***,
डीयूआय आसंलच ह्ये कशावरून?
:)
आप्ला,
हानिकेनदास