सायना नेहवालचे अभिनंदन

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in जनातलं, मनातलं
28 Jun 2010 - 9:35 am

सायना नेहवालने इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ओपन (पैकी शेवटच्या दोन मागच्या एकाच आठवड्यात) अशा सलग तीन सुपर सीरीज जिंकून भारताची मान उंचावली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. खुट्ट झालं तरी त्या सवंग सानिया मिर्झाला प्रसिद्धी देणारी भारतीय माध्यमे गुणी, सिन्सिअर आणि मेहनती सायनाला देखील सध्या बर्‍यापैकी स्पेस देत आहेत हे पाहून आनंद होतो आहे. कालची मॅच ज्यांना पाहायला मिळाली ते भाग्यवान. आपले जे. पी. मॉर्गन सायनावर कधी लिहिणार याची वाट पाहतो आहे.

- बॅडमिंटनप्रेमी अप्पा

क्रीडाअभिनंदन

प्रतिक्रिया

सहज's picture

28 Jun 2010 - 9:41 am | सहज

अमोल केळकर's picture

28 Jun 2010 - 10:00 am | अमोल केळकर

भारताच्या नव्या स्टार खेळाडूचे अभिनंदन =D>
आता कुठल्या जहिरातीत ती दिसणार ? ;)

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

Dipankar's picture

28 Jun 2010 - 10:06 am | Dipankar

अभिनंदन

येत्या ऑलिपिक मधे सुवर्णपदकाची आशा धरुया

अन्या दातार's picture

28 Jun 2010 - 12:26 pm | अन्या दातार

>>आता कुठल्या जहिरातीत ती दिसणार ?

शक्यता कमीच आहे. कारण तिचे गुरु पी. गोपीचंदसुद्धा कधीच दिसले नाहीत कुठल्याही जाहिरातीत. (ऑल इंग्लंड टूर्नामेंट जिंकल्यानंतरही)
आणि तिनेही काही जाहिरातींच्या ऑफर्स नाकारल्याचे वाचनात आले होते.

राघव's picture

28 Jun 2010 - 9:53 pm | राघव

गोपीचंद यांनी वैयक्तिक दृष्ट्या पटत नसल्यामु़ळे कोक का पेप्सीची जाहिरात करण्याचे नाकारले होते ते वाचनात आलेले आठवले.

राघव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2010 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या गुणी खेळाडूचे अभिनंदन.

अदिती

समंजस's picture

28 Jun 2010 - 10:37 am | समंजस

सायना नेहवालचे अभिनंदन =D>

[खंत एकच, हवी तेव्हढी प्रसिद्घी अर्थातच अजूनतरी तीला मिळताना दिसून येत नाहीय :( बर्‍याचदा तीचं नाव सानिया असंच लिहून येतं]

सागर's picture

28 Jun 2010 - 11:22 am | सागर

सायना नेहवालचे अभिनंदन.

जागतिक दर्जाचे क्रमांक २ चे मानांकन मिळवणारी ती भारताची पहिलीच महिला बॅडमिंटनपटू असावी. लवकरच ती जगातील क्रमांक १ ची खेळाडू होईन यात शंका नाही.
सायना नेहवालच्या पुढील यशासाठी शुभेच्छा आणि ऑलंपिक आणि वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप या २ महत्त्वाच्या टूर्नामेंट्स साठी शुभेच्छा :)

तिमा's picture

28 Jun 2010 - 5:17 pm | तिमा

सायना ही गुणी खेळाडु तर आहेच पण ती सानिया सारखी सवंग लोकप्रियतेच्या मागे कधीच लागली नाही.
सायनाची जिद्द जगातली नं १ होण्याची आहे, पहिल्याच फेरीत बाद होऊनही चमकेशगिरी करण्याची नाही.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

अप्पा जोगळेकर's picture

28 Jun 2010 - 6:23 pm | अप्पा जोगळेकर

माझा अंदाज असा आहे की ही मुलगी बॅडमिंटनमधली सचिन तेंडुलकर होईल. तीच सिन्सिअ‍ॅरिटी, तसंच टेम्परामेंट, खेळातली नजाकतही तशीच आणि प्रतिस्पर्धी कोण आहे ह्याची तमा न बाळगता खेळण्याची तीच बेडर वृत्ती. विजेत्याचा थाट म्हणतात तो हाच.

ramjya's picture

28 Jun 2010 - 6:28 pm | ramjya

अभिनंदन

प्रकाश पदुकोणनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावणारी ही एक खेळाडू आहे असे दिसते.
विश्वेविजेतेपेदाला लवकरच तिने गवसणी घालावी अशा शुभेच्छा! :)
दमसास, चापल्य, लवचिकपणा, चिवटपणा अशा अनेक गोष्टींची कसोटी बघणारा एक उत्तम खेळ आहे बॅडमिंटन.

(योनेक्सप्रेमी)चतुरंग

राघव's picture

28 Jun 2010 - 10:03 pm | राघव

दमसास, चापल्य, लवचिकपणा, चिवटपणा अशा अनेक गोष्टींची कसोटी बघणारा एक उत्तम खेळ आहे बॅडमिंटन.
अगदी अगदी!! ज्यानं तीन पावलांत कोर्ट कव्हर करण्याची प्रॅक्टीस केलेली आहे त्यालाच ते "नीट"पणे समजेल!! #:S

जाता जाता उगाच बॅडमिंटनमधल्या काही पोचलेल्या भारतीय दिग्गजांची [नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोण, गोपीचंद अन् आता साईना नेहवाल..] आठवण आली, पण काळांतली गॅप बघून चुटापुट लागली :(

(देवरस गुरुजींचा शिष्य) राघव

विसोबा खेचर's picture

28 Jun 2010 - 10:00 pm | विसोबा खेचर

खुट्ट झालं तरी त्या सवंग सानिया मिर्झाला प्रसिद्धी देणारी भारतीय माध्यमे

माझ्या मते त्यामागे सानिया मिर्झा ही दिसतेही खूपच चित्ताकर्षक आणि आव्हानात्मक..हे एक कारण असावं! ;)

असो.

सायनाचं अभिनंदन आणि शुभेच्छा!

आपला,
(सानियाचा चाहता) तात्या.

टारझन's picture

28 Jun 2010 - 10:14 pm | टारझन

माझ्या मते त्यामागे सानिया मिर्झा ही दिसतेही खूपच चित्ताकर्षक आणि आव्हानात्मक..

=)) उद्या म्हणाल राखी सावंत आणि कष्मिरा शाह पण चित्ताकर्षक आणि आव्हाणात्मक दिसते =)) =)) =))
श्श्श्या !! असो !!

( सोफिया चौधरी ला कॉफी डेट वर न्यायची स्वप्ने पाहाणारा) टार्‍या स्वप्नंकर

शिल्पा ब's picture

28 Jun 2010 - 10:13 pm | शिल्पा ब

सायनाचे हार्दिक अभिनंदन !!!

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

29 Jun 2010 - 12:25 am | भडकमकर मास्तर

सायना या अत्यंत मेहनती अणि गुणी खेळाडूचे अभिनंदन...
आज एन्डीटीवीवरती तिची मुलाखत पुन्हा पाहिली...
( तिच्या वडिलांनी अनेक कर्जं काढून आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट्सला तिला नेले होते आणि तीसुद्धा परितोषिके मिळवून त्याचे चीज करत असे... लहान असताना स्टेडियमकडे जतायेता केलेल्या बस प्रवासात थकून तिला झोप लागत असे आणि तिची महागडी रॅकेट कधी हरवत असे.... घरून बोलणी खावी लगायची पण नवीन रॅकेटही दिली जायची..)