हे फोटोज आहेत माझ्या घराच्याइथले आणि माझ्या गावातले - मालघरमधले :) म्हणजेच कोकणातले..
चिपळूणपासून १३ km वर असलेलं माझं हे छोटंसं गाव चिपळूणहून गुहागरला जायच्या रस्त्यावर आहे.
ही आमची नदी...तांबी नदी आणि धरण :)
बागेत खूप फुलपाखरे असतात. चिपळूणमधील एक पक्षीनिरीक्षकांनी इथल्या फोटोंच प्रदर्शनही भरवलं होतं :)
कांचन
लालबूंद जास्वंद :)
हा आमच्या घरचा अननस..अस्सा गोड असतो म्हणून सांगू... :)
कापा फणस :)
बांधकाम चालू असलेलं गावातील राममंदिर
पेरणी / लावणीच्या प्रतीक्षेत असलेली भाताची शेतं
तांबी नदी...रामपूर डोंगराचा परिसर
- अस्मिता
प्रतिक्रिया
14 Jun 2010 - 5:23 pm | महेश हतोळकर
मस्त आहे परीसर. जायला पाहिजे एकदा!
14 Jun 2010 - 5:28 pm | वेताळ
एकदम झ्याक फोटो आणि तुमचा गाव आहे.
वेताळ
14 Jun 2010 - 5:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झ्याक फोटो आणि तुमचा गावही झ्याक आहे.
- दिलीप बिरुटे
15 Jun 2010 - 12:09 pm | सहज
झ्याक फोटो आणि तुमचा गावही झ्याक आहे.
14 Jun 2010 - 5:28 pm | मेघवेडा
सुंदर सुंदर! चिपळूणपासून १३ किमी म्हणजे मार्गताम्हनेच्या बरंच अलिकडे झालं ना..?
14 Jun 2010 - 6:18 pm | अस्मी
बरोबर...रामपूरच्या अलीकडे
ए तुला मार्गताम्हने महितिये?
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
14 Jun 2010 - 5:29 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त मस्त मस्त ! ! !
बिपिन कार्यकर्ते
14 Jun 2010 - 5:30 pm | गणपा
धुंद करणारा परिसर आहे.
:)
अननस (झाडाला लागलेल) पहिल्यांदाच पाहिल.
14 Jun 2010 - 5:57 pm | स्वतन्त्र
मी हि अननस झाडाला लागलेला पहिल्यांचाच पहिला !
गाव मस्त आहे!
14 Jun 2010 - 5:59 pm | यशोधरा
शेवटून दुसरा आणि राममंदिराचा फोटो खूप आवडला.
14 Jun 2010 - 6:05 pm | मस्त कलंदर
मस्त आहे हो गांव नि परिसर दोन्हीही!!!
मी पण झाडाला लागलेलं अननस पहिल्यांदाच पाहिलं!!! :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
14 Jun 2010 - 6:22 pm | दत्ता काळे
मस्त आहे हो गांव नि परिसर दोन्हीही!!!
- मी ही असेच म्हणतो.
14 Jun 2010 - 6:26 pm | अस्मी
मी याचसाठी हा फोटो काढला होता...माझ्या मैत्रिणींना पण तेच बघायचं होतं.
हा अननस तयार होऊन कापल्यानंतर जे वरचं वाड (म्हणजे ती उभी पानं) आहे ते परत लावलं ना की नवीन झाड तयार होतं :)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
14 Jun 2010 - 6:28 pm | श्रीराजे
मस्त परिसर आहे..
मी ही अननस झाडाला लागलेला पहिल्यांदाच पाहिला.
14 Jun 2010 - 9:21 pm | मुक्तसुनीत
असेच म्हणतो. उत्त्तम लेख.
14 Jun 2010 - 7:22 pm | अरुंधती
मस्त फोटोज आणि निसर्गाचे वरदान लाभलेला रम्य परिसर! :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
14 Jun 2010 - 9:13 pm | स्वाती दिनेश
फोटो मस्तच..
स्वाती
14 Jun 2010 - 9:26 pm | चतुरंग
खूप वर्षांनी अननस झाडाला लागलेला पुन्हा पाहिला! (आधी मला वाटते गोव्याला पाहिले होते.)
(खुद के साथ बाता: रंगा, "अननस सोलण्याची कला" असा एखादा लेख टाकावा का? :?)
चतुरंग
14 Jun 2010 - 9:35 pm | आशिष सुर्वे
मधुमती तै,
तुमी गाववाल्या निगालात वो!
म्या कडवईचा बर्र का.. चिपलून वरून ३५ कि.मी.
एन.एच. १७ वर 'तुरळ' गावच्या फाट्यावरून फकस्त २.५ कि.मी आत..
छान फ्वोटो तै.. निसर्ग बगूनश्यान डोले भरून पावले बर्र का.. एकदम गावाला गेल्यागत वाटलं!!
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
16 Jun 2010 - 2:21 pm | अस्मी
:)
- अस्मिता
15 Jun 2010 - 2:05 am | संदीप चित्रे
यायला पाहिजे एकदा :)
15 Jun 2010 - 10:12 am | अस्मी
नक्की या.... :)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
15 Jun 2010 - 4:39 am | डॉ.श्रीराम दिवटे
कोकण झिँदाबाद!
उत्तम छायाचित्रण.
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
15 Jun 2010 - 5:00 am | पाषाणभेद
अजून फोटो पाहिजे होते. मजा आली. बाकी झाडावरचा फणस बर्याचदा बघीतलेला आहे.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
15 Jun 2010 - 12:08 pm | शानबा५१२
झाडावरचा फणस पाहीला आहे??आणी तो पण ब-याचदा?? फारच दांडगा अनुभव आहे हो तुमचा!! अजुन असेच काय काय पाहील आहे ते लिहा.......जस झाडावर पिकलेला आंबा वगैरे.
8}
लेखासंबंधीत :
मी चिपळुण पासुन ५-७ कीमीवर असलेल्या टेरवचा,पण आमच्या इथे नदी नावाच काही नाही.
हे पाहण्यासाठी दुर्बिण वापरण अपेक्षित आहे का?
नाही,फोटोत कुठे दीसत नाहे म्हणुन विचारल.
शेवटुन दुसरा फोटो सर्वात छान!
16 Jun 2010 - 2:22 pm | अस्मी
पुढच्या वेळेस नक्की :)
- अस्मिता
16 Jun 2010 - 2:30 pm | धमाल मुलगा
साला, कोकणात कुठंही आडवाटेनं शिरावं आणि क्लिकक्लिकाट करावा..डोळे गारगार करणारे फोटो यायलाच पाहिजेत असा नियमच दिसतोय निसर्गाचा!
मस्तच फोटो! आणी गावही बहुतेक एकदम निवांत आणि शांत असणार! निसर्गच सांगतोय फोटोमधुन.
16 Jun 2010 - 4:10 pm | भडकमकर मास्तर
मस्त फोटो..
अवांतर : मी चिपळूणच्या ईशान्येला साधारण चार पाचशे किलोमीटरवर राहतो आणि झाडाला लागलेली जास्वन्दी फार दिवसांनी पहायला मिळाली आज :)
16 Jun 2010 - 10:52 pm | शानबा५१२
:D :D :D :D :D
झाड नाही,रोपट वाटत ते,
चुकी काढायची म्हटली तर ती कशातुन पण निघते बरोबर?
- भंडग(सांगलीची)कर मास्तर
16 Jun 2010 - 4:26 pm | मितभाषी
फोटु छान. :)
मी चिपळूणच्या ईशान्येला साधारण चार पाचशे किलोमीटरवर राहतो आणि झाडाला लागलेली जास्वन्दी फार दिवसांनी पहायला मिळाली आज.
>>>>>>
गुर्जी लै भारी टोला. =)) =))
अवांतर : झाडाला अननस न पाहणारे येडे कधी मिपा णि घर सोडुन गेलेले दिसत नाहीत. :D =))
16 Jun 2010 - 6:31 pm | chintamani1969
मस्त आले आहेत फोटू मला पण शेवटून दुसरा फोटू आवडला
16 Jun 2010 - 7:12 pm | रेवती
आईग्ग!!
मस्त फोटू!
छे, जायलाच हवं कोकणात!
कोकणरेल्वेमुळे कोणता फरक पडलाय?
रेवती
16 Jun 2010 - 9:15 pm | पिवळा डांबिस
कोकणरेल्वेमुळे कोणता फरक पडलाय?
पूर्वीसारखं एष्टी थांबवून रानात जावं लागत नाय...
आता कोकणरेल्वेच्या डब्यातच बाथरूम असतेय!!!!
:)
16 Jun 2010 - 10:11 pm | मेघवेडा
=)) =))
काका, __/\__!!
एक नंबर उत्तर!
16 Jun 2010 - 10:55 pm | शानबा५१२
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
लय डांबीस हाव बा तुम्ही!!
हे गाडीत बसताना,वेळ आली तर 'जायची' सोय आहे ना हेच् बघतात पहील्,म्हणून ह्यांना फक्त एकच बदल आठवला.......
लय भारी प्रतिसाद पि.डा.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
16 Jun 2010 - 9:59 pm | विसोबा खेचर
वा!