..पाऊस मोठा अस्सा यावा..

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
9 Jun 2010 - 4:12 pm

पाऊस मोठा अस्सा यावा!
----------------------------------
खोटा पैसा खरा व्हावा..
पाऊस मोठा अस्सा यावा.
चिंबलेल्या पाण्यातुन मग..
लटका तुझा गुस्सा न्यावा.

सोसाट्याचे वारे वहावे..
धूळ पाने उडवित जावे..
तुला पदरात लपेटून मग.
वार्यालाही अडवित जावे..

स्वप्न सुंदर असे पडावे..
रागावलेली तू..खुशीत यावस..
रात्र बेचैन होताना मग..
मला अलगद कुशीत घ्यावस.

थंडी अशी कडक पडावी..
घट्ट तुझी मिठ्ठी व्हावी..
खट्याळ तुझ्या डोळ्यात पाहुन..
मग कामावरही सुट्टी घ्यावी..

-- योगेश जोशी

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

9 Jun 2010 - 4:18 pm | मदनबाण

वा...
कविता आवडली... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2010 - 5:36 pm | परिकथेतील राजकुमार

बाणा लेका कविता आवडली का मिठी आवडली ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मदनबाण's picture

9 Jun 2010 - 6:02 pm | मदनबाण

ख्या ख्या ख्या...खी खी खी... :D
कविते मधील भाव आवडले !!! ;)
कविता तर आवडलीच पण मिठी न-आवडणारा अरसिकच !!! ;)
अजुन... (टारू मोड ऑन) त्या मिठीचा अणुभव णाही !!! ;)
बाकी परा...तुझ्या कॅफेत कोण तरी फटाकडी येत असावी सध्या... ;)

(रसिकलाल)... ;)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2010 - 6:07 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

'सध्या' ह्या शब्दाचा तिव्र निषेध रे !! आपल्याकडे 'राबता' असतो ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

चिरोटा's picture

9 Jun 2010 - 5:01 pm | चिरोटा

मस्त कविता.
(ही कविता वाचत असतानाच इकडे गडगडाटासह पाउस चालु झालाय.)
P = NP

कानडाऊ योगेशु's picture

9 Jun 2010 - 5:29 pm | कानडाऊ योगेशु

इकडे म्हणजे बेंगलोर मध्येच ना..!
सॉरी भेंडीभाऊ तुमच्या एकाही खरडीला उत्तर देऊ शकलो नाही.
अजुनही मला खरडवहीत लिहिण्याची सुविधा दिली गेली नाही आहे.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

चिरोटा's picture

9 Jun 2010 - 5:30 pm | चिरोटा

हो.बेंगळूरमध्येच. :)
P = NP

अमोल केळकर's picture

9 Jun 2010 - 5:09 pm | अमोल केळकर

पावसाची मस्त कविता

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पक्या's picture

9 Jun 2010 - 9:35 pm | पक्या

छान कविता.
-जय महाराष्ट्र , जय मराठी !

शुचि's picture

9 Jun 2010 - 9:37 pm | शुचि

तुमच्या सगळ्याच कविता फार मस्त असतात.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पांथस्थ's picture

9 Jun 2010 - 11:04 pm | पांथस्थ

च्यामारी सरळ सरळ सांगाना तिचा राग घालवायचा आहे, तिला मिठी मारायची आहे, तिच्या पदरात लपायचे आहे आणि हे सगळं करायला ऑफिसला दांडी मारायची आहे.

त्यासाठी कवितेचा खटाटोप करुन त्या पावसाला इथे खेचुन आणला, तिथे शेतकरी खोळंबले आहेत.

जे मनात आलं ते करुन टाकायचं, अरे हाय काय अन् नाय काय?

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

दत्ता काळे's picture

10 Jun 2010 - 11:31 am | दत्ता काळे

कविता आवडली.
उलट पैश्याला खोटे ठरवा (म्हणजेच ऑफिसला दांडी मारा,) मग पावसाची मजा मनमुराद लुटता येईल. होय कि नाही ?

फ्रॅक्चर बंड्या's picture

10 Jun 2010 - 4:04 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच

चिंबलेल्या पाण्यातुन मग..
लटका तुझा गुस्सा न्यावा.

binarybandya™

स्पंदना's picture

10 Jun 2010 - 5:19 pm | स्पंदना

छान , आवडली.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

कानडाऊ योगेशु's picture

11 Jun 2010 - 12:15 pm | कानडाऊ योगेशु

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.!

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

अस्मी's picture

11 Jun 2010 - 2:33 pm | अस्मी

मस्तच :)

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

पाषाणभेद's picture

12 Jun 2010 - 4:02 am | पाषाणभेद

कविच्या कल्पनेशी सहमत. कल्पना एकदम झकास.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2010 - 3:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता..!

-दिलीप बिरुटे