अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
7 Jun 2010 - 8:29 pm

अल कायदाचे तीन नंचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!

मी २३ जून २००९ साली लिहिलेला अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांची माहिती देणारा लेख लिहिला होता.

http://www.misalpav.com/node/8315

गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी आलेल्या वृत्ताप्रमाणे द्रोणाचार्यांच्या हातून त्यांची अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील प्रदेशात हत्या करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्याचे कुटुंबीयही मारले गेल्याचे वृत्त आहे. (अमेरिकेच्या वैमानिकविरहित विमानांना-Drones ना-मी गमतीने 'द्रोणाचार्य' म्हणतो!)

तालीबान संघटनेच्या पाकिस्तानवरील भावी विजयानंतर त्यांची अण्वस्त्रे अल कायदाच्या हाती पडतील अशी आशा तालीबान/अल कायदा या संघटनांना आहे व ती अण्वस्त्रें अमेरिकेवर डागण्याचा इरादा याझीद यांनी जाहीर केला होता. पण नेम धरायच्या सरावासाठी (Target practice) आधीची कांहीं अस्त्रे भारतावर डागली जातील कीं काय अशी एक भीती माझ्या मनात आहेच!

त्यांच्या मृत्यूबद्दलची व इतर माहिती खालील दुव्यावर वाचायला मिळेल.

http://www.longwarjournal.org/archives/2010/05/top_al_qaeda_leader_1.php

केवळ माझ्या जुन्या लेखाचा Follow-up म्हणून हा माहितीवजा लेख मी इथे पोस्ट केलेला आहे.

धन्यवाद

सुधीर काळे

राजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

हुप्प्या's picture

7 Jun 2010 - 9:43 pm | हुप्प्या

अल कायदासारख्य शांतताप्रेमी आणि सहिष्णूतेचा संदेश देणार्‍या संघटनेच्या ह्या धुरीणाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. अल्लाह त्याला स्वर्गात सर्वोच्च स्थान देवो.

लवकरच ह्या परोपकारी संघटनेत निर्माण झालेली कधीही भरून न निघणारी पोकळी तितक्याच तोडीचा महात्मा भरून काढो अशी सदिच्छा.

आणि असले कृष्णकृत्य घडवणार्‍या त्या द्रोणांचा नायनाट होवो.

टारझन's picture

7 Jun 2010 - 9:58 pm | टारझन

मिपा च्या लाडक्या काकांचे लाडके "मुस्ताफा अबुल-याझीद" ह्यांच्या दु:खद निधणा बद्दल आज मी दु:ख व्यक्त करतो , आणि आज जेवणबंदी ची घोषणा करतो ... ए कोण आहे रे तिकडे .. माझी ही जेवण संपवलेली ताटं घेउन जा ... आता मी काहीही खाणार नाही

- सुत्की ट

Pain's picture

7 Jun 2010 - 10:56 pm | Pain

द्रोणाचार्य =)) =))

शिल्पा ब's picture

7 Jun 2010 - 11:11 pm | शिल्पा ब

आरं द्येवा !!! आसं कसं झालं!!! आता मी काय करू? कुनी रे मारील ? तळपाट हुईल रं त्याचं !!!

फर्जान

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

विकास's picture

7 Jun 2010 - 11:42 pm | विकास

पै.मुस्ताफा अबुल-याझीद यांची अमेरिकेने फसवणूक केली? ;)

:''( :''( :''( :''( :''( :''(

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुधीर काळे's picture

8 Jun 2010 - 12:33 pm | सुधीर काळे

घोsssssssर फसवणूक!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण सहावे: http://tinyurl.com/288lzeh
आधीच्या प्रकरणांचे दुवे लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

विनायक प्रभू's picture

7 Jun 2010 - 11:45 pm | विनायक प्रभू

तश्रीफ वर बोट ठेउन २३ मिनिटे मौन पाळतो.

इंटरनेटस्नेही's picture

7 Jun 2010 - 11:53 pm | इंटरनेटस्नेही

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

हुप्प्या's picture

8 Jun 2010 - 3:59 am | हुप्प्या

मुस्ताफाचाचा गेला. तसा गेली कित्येक वर्षे तो वाँटेड होताच म्हणा. सुटला बिचारा.
चाचाला जग अनेक नावाने ओळखायचे. पण उंटावरून शेळ्या हाकणारा, खजूर तोडून देणारा अरब शेतकरी ते अतिरेकी जगताचा अनभिषिक्त ३ नंबरचा माणूस असा प्रवास करणारा मुस्ताफाचाचा शेवटपर्यंत मुस्तफाचाचाच राहिला. जेव्हा भेटेल तेव्हा पाच वेळा नमाझ पढतोस ना ***च्या अशी प्रेमळ विचारणा केली जायची. मी अस्सल पद्धतीने दाढी वाढवत नसल्याने "भो**** कधी अक्कल येणार तुम्हाला?" असेही विचारायचा. पण आतून मोठा प्रेमळ होता.
त्याला पंचावन्न बायका होत्या. १३ वर्षाच्या आयेशापासून ते ५० वर्षाच्या झेबुन्निसापर्यंत माझ्या ५५ चाच्या होत्या. वरवर पाहिले तर वाटेल् त्यांच्यात भांडाभांडी असायची. द्वेष, मत्सर, चहाडखोरी सगळे चालायचे. पण आतून प्रेमाचा एक निर्झर खळखळ वहात होता.
पाकिस्तानच्या डोंगराळ भागात तो रहात होता. सुरवातीला अमेरिकन गाड्या वापरुन राजेरोस जाता यायचे पण गेल्या अनेक वर्षात तिकडे जाणे अवघड बनले होते. चाचाला अनेकदा त्याची गुहा बदलायला लागायची. मग ह्या आधी अमक्या वस्तीवर जा तिथे पत्ता विचारा. मग दुसर्‍या मग तिसर्‍या अशी सर्कस करून मग चाचाच्या घरी जायचो. पण दरवर्षीची ईदची मेजवानी चाचाच्या घरीच व्हायची. पंचावन्न बायकांनी मिळून पकवलेला खाना खाण्यात काय मजा होती ते तुम्हाला कळायचे नाही.
पण आता सगळे संपले. त्याची ती प्रेरणादायी भाषणे, ट्रेनिंग कँप जिथे डझनावारी लढवय्ये रोज तयार होत असत. सगळे संपले. आता मी एक ४७ च्या गोळ्या कुणाला नेऊन देऊ? कोण माझ्यावाटेकडे डोळे लावून बसेल? कोण माझ्या सफाचट दाढीला शिव्यांची लाखोली वाहेल? आता अल जझिराकडे देण्याकरता माझ्याकडे व्हिडियो कॅसेट कोण देईल?

---भतिजा सैद-अल-हरामी

अमेरिकन सैन्याच्या हातात पडलेल्या एका डायरीतील काही पानांचा हा स्वैर अनुवाद.

ज्ञानेश...'s picture

8 Jun 2010 - 3:50 pm | ज्ञानेश...

उंटावरून शेळ्या हाकणारा
=))

पंचावन्न बायकांनी मिळून पकवलेला खाना
=)) =))

सैद-अल-हरामी
=)) =)) =))

मस्तच.

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jun 2010 - 3:55 pm | llपुण्याचे पेशवेll

हुप्प्याजी नेहेमीचे 'आयुष्य समृद्ध' वाली वाक्यं टाकायची राहीली काय? ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

आंबोळी's picture

8 Jun 2010 - 4:10 pm | आंबोळी

हुप्प्याजी नेहेमीचे 'आयुष्य समृद्ध' वाली वाक्यं टाकायची राहीली काय?

आणि ते "न मागता दिली , न सांगता ...."
आंबोळी

हुप्प्या's picture

9 Jun 2010 - 2:52 am | हुप्प्या

च्यामारी त्या डायरीतील काही पाने गहाळ झाली बहुतेक. पुढच्या चाच्याच्या वेळी नक्की. ;-)

पाषाणभेद's picture

9 Jun 2010 - 7:57 am | पाषाणभेद

वा छानच आहे तुमची कथा.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शुचि's picture

8 Jun 2010 - 4:59 am | शुचि

बाकीच्या नेत्यांचे बी पटापट नंबर लाव रं द्येवा!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मी_ओंकार's picture

8 Jun 2010 - 2:51 pm | मी_ओंकार

कंदील कुणी लावला?

आंबोळी's picture

8 Jun 2010 - 2:53 pm | आंबोळी

भावपूर्ण श्रद्धांजली!

आंबोळी

अवलिया's picture

8 Jun 2010 - 2:58 pm | अवलिया

अल कायदाचे तीन नंचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!

याच्या ऐवजी

अल कायदाचा तीन नंचा नेता मुस्ताफा अबुल-याझीद मृत!

असे चालले असते

पण कदाचित सुधीर काळ्यांना त्याच्याबद्दल आदर प्रेम असावा असे दिसते. असो. एकेकाची आपली आपली आवड, प्रेम, इत्यादी.

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jun 2010 - 3:04 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे. मलाही कालवश अशी शब्दरचना थोडीशी खटकली, पण काळेसाहेबांनी ते उपरोधाने लिहिले असावे असे वाटून घेतले मी.

बिपिन कार्यकर्ते

मेघवेडा's picture

8 Jun 2010 - 5:34 pm | मेघवेडा

सहमत आहे.

कशाला आदर इतका?

माझ्या http://www.misalpav.com/node/8315 या मूळ लेखाखालील एका प्रतिसादाला उत्तर देतांना मी एकेरी उल्लेख न करण्याचे कारण दिले आहे ते वाचावे!
दुसरे म्हणजे शत्रू असले तरी ते एक कार्यक्षम नेते होते. म्हणूनच मी 'फसवणूक' या माझ्या मालिकेतही कुणाचाही एकेरी उल्लेख करण्याचे मी टाळले आहे.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण सहावे: http://tinyurl.com/288lzeh
आधीच्या प्रकरणांचे दुवे लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

अवलिया's picture

8 Jun 2010 - 4:36 pm | अवलिया

छान !

आम्ही शत्रु आणि अतिरेकी दुष्ट प्रवृत्ती यात भेद करतो तो कसा चुकीचा आहे हे नीटपणे समजावुन सांगितल्याबद्दल आभार.

--अवलिया

पुष्करिणी's picture

8 Jun 2010 - 4:03 pm | पुष्करिणी

द्रोणाचार्यांना एकच विनंती,
पै. मुस्तफाचाचाला स्वर्गात एकटं एकटं वाटू नये म्हणून त्यांच्या सगळ्या कबिल्याचीही लौकरात लौकर तिकडे जाण्याची काहीतरी सोय बघा...

अवांतरः पायरेट्स ना मराठीत चाचे का म्हणतात?
पुष्करिणी

II विकास II's picture

8 Jun 2010 - 4:06 pm | II विकास II

चाचा लोक पैसे (आणि सत्ता) हडप करतात म्हणुन ;)

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

II विकास II's picture

8 Jun 2010 - 4:07 pm | II विकास II

भावपुर्ण श्रंध्दाजली.
ड्रोनचार्याची चांगली कामगिरी.
ड्रोनाचार्य छोटे असले तरी काम मोठे करतात.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.