२७ ऑगस्ट २०१०

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
4 Jun 2010 - 10:15 am

एका पुढे ढकललेल्या इ पत्रातून ही माहिती मिळाली आहे. २७ ऑगस्ट २०१० ला मंगळ हा पृथ्वीच्या अतीशय जवळ येणार आहे. त्यादिवशी पहाटे १२.३० वा ( म्हणजे बहुतेक २६ ऑगस्ट ला रात्री) चंद्र आणि मंगळ आकाशात खूप जवळ दिसतील. मंगळाचा आकार एवढा मोठा असेल की जणू दोन चंद्र आकाशात आहेत असा भास होईल.

खगोल शास्त्रज्ञ ( जाणकार ) यावर अधिक भाष्य करु शकतील.

पावसाळ्याच्या या दिवसात आकाश निरभ्र रहाण्याची शक्यता कमी असताना बघु या हा निसर्गाचा अनोखा अविष्कार आपल्याला पहायला मिळतो का ते?

अमोल केळकर
---------------------------------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

जीवनमानमाध्यमवेध

प्रतिक्रिया

Manoj Katwe's picture

4 Jun 2010 - 10:29 am | Manoj Katwe

मला तरि हे खर वाटत नाहि.
http://earthsky.org/astronomy-essentials/will-mars-appear-as-large-as-a-...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 10:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या लिंकवर उत्तम माहिती दिली आहे.

गेली किती वर्ष हे इमेल फिरतं आहे आता आठवावंच लागेल. उत्साही लोकांसाठी गणितः
चंद्राचा व्यास ~ ३४७४ किमी
चंद्राचं आपल्यापासूनचं अंतर ~ ३,८४,००० किमी.
मंगळाचा व्यास ~ ६७९२ किमी

तर आपल्या आकाशात मंगळ चंद्राएवढा मोठा दिसण्यासाठी आपल्यापासून किती अंतरावर असला पाहिजे?
मंगळ चंद्राएवढा दिसण्यासाठी मंगळ आपल्यापासून साधारण ७ लाख किमी अंतरावर आला पाहिजे. मंगळाचं आपल्यापासूनचं अंतर १० ते ३७ कोटी किमी एवढं बदलत असतं. यातलं कमीतकमी अंतर, १० कोटी पकडलं तरीही मंगळ, चंद्राच्या एक दशांश आकारापेक्षाही लहान दिसेल.

अदिती

या माहीतीबद्दल धन्यवाद. तसेही वरील बातमीवर निव्वळ (आत्ता पर्यंत माध्यमांमध्ये बराच गवगवा झाला असता या )कॉमनसेन्स लॉजिक म्हणून विश्वास बसला नव्ह्ता पण गणितमुळे आता नक्कीच नाही.

बाकी याचा फायदा घेऊन अजून एखादा ज्योतिष्यविषयक लेख टाकला नाही म्हणजे मिळवली. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मी ऋचा's picture

4 Jun 2010 - 10:37 am | मी ऋचा

या सगळ्या चमत्कारी खगोलीय घटना पावसाळ्यातच का येतात.. उन्हाळ्यात जेव्हा आकाश निरभ्र असतं तेव्ह काही घडत नाही.. [(

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

आंबोळी's picture

4 Jun 2010 - 12:03 pm | आंबोळी

या सगळ्या चमत्कारी खगोलीय घटना पावसाळ्यातच का येतात.. उन्हाळ्यात जेव्हा आकाश निरभ्र असतं तेव्ह काही घडत नाही..

सहमत आहे.... सर्व खगोलाचा (आणि त्याकडे दुर्बिणीतून डोळे लाउन बसलेल्या व आम्हाला गणिते घालून हैराण करणार्‍यांचा) णिषेध!

आंबोळी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 12:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्नाच्या खाली पांढर्‍यावर पांढरं करून उत्तरही दिलेलं आहे! मी दुर्बिणीकडे पहात नाही ... दुर्बिणीतून पहाते! ;-)

अदिती

आंबोळी's picture

4 Jun 2010 - 12:16 pm | आंबोळी

प्रश्नाच्या खाली पांढर्‍यावर पांढरं करून उत्तरही दिलेलं आहे!

न पाहिल्याबद्दल क्षमस्व....

मी दुर्बिणीकडे पहात नाही ... दुर्बिणीतून पहाते!
अस हाय होय... मला वाटले तुम्ही दुर्बिणीतून पाहता...वरती तरी मी तसच लिहिलय...

आंबोळी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 12:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> अस हाय होय... मला वाटले तुम्ही दुर्बिणीतून पाहता...वरती तरी मी तसच लिहिलय... <<
मग मी पण समक्श्व! वयाप्रमाणे आत डोळे साथ नाही देत!!

अदिती

राजेश घासकडवी's picture

4 Jun 2010 - 1:25 pm | राजेश घासकडवी

दुर्बिणीशिवाय दिसत नाही बहुतेक. :)

आणि तीसुद्धा मैलभर लांब रुंद, र्‍येडो ल्हरींची वगैरे...यवढे मोठे अँटिन्ये की सगळ्या भारताला श्याटेलाईट टीव्ही फुक्काट मिळू शकेल... त्यावर कसला तरी म्याप बघत बसायचं! हे विज्ञानवादी काय करत बसतील नेम न्हाय. मुक्काट्याने मर्‍हाटी सायटी काढायच्या सोडून...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 1:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्याटेलाईट टीव्हीवर शेवटी तुम्ही पहाणार काय तर परदेशी सौंस्क्रुतीचा नंगानाचच ना? मग त्यापेक्षा आम्ही म्यापं काढली तर काय हो गेलं तुमचं, गुर्जी?

(म्याप बघणारी नव्हे, म्याप बनवणारी) ॥अदिती॥ - चारकाड्या

आंबोळी's picture

4 Jun 2010 - 1:58 pm | आंबोळी

(म्याप बघणारी नव्हे, म्याप बनवणारी)
तुम्हाला म्यापं काढणारी म्हणायचय का?

आंबोळी

राजेश घासकडवी's picture

4 Jun 2010 - 3:15 pm | राजेश घासकडवी

श्याटेलाईट टीव्हीवर शेवटी तुम्ही पहाणार काय तर परदेशी सौंस्क्रुतीचा नंगानाचच ना?

आम्ही आमची माती आमची माणसं, ज्ञानदीप वगैरे कार्यक्रम बघणार. आणि नंगानाचच बघायचा असेल तर तो आपल्याच सौंस्क्रुतीचा बघणं केव्हाही श्रेयस्कर.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 3:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आंबोळी: म्यापं "काढणं" हा माझा आवडता दुय्यम उद्योग आहे! पोटापाण्यासाठी मी म्यापं "बनवते"!

गुर्जी: मग त्यासाठी डीश कशाला हवी आहे तुम्हाला? चारकाड्या* आडव्या उभ्या करून लावा, 'आमची माती आमची माणसं', 'ज्ञानदीप' वगैरे बघायला तेवढे पुरे!

अदिती

*हे यागी अँटेनाचे वर्णन आहे, तरीही ॥उगाच॥ कोणाला गोष्टी अंगावर ओढवून घ्यायची असेल तर माझी ना नाही!