प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
30 May 2010 - 2:33 pm

प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव

वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत.

विविध प्रकाशकांच्या कहाण्या व लेखकांची व्यथा वाचून मी खरोखर सुदैवी असे म्हणायला हवे. कारण मला भेटलेले प्रकाशक व वितरक खरोखर सचोटीची वागणून देणारे मिळाले आहेत.
नाडीग्रंथांवरील पहिले पुस्तक सप्टेंबर १९९४ ला पुण्यात दै.सकाळच्या छापखान्यात मी माझ्या हिमतीवर छापले नंतर पुण्यातील संदेश एजन्सीचे खरे यांच्या सौजन्याने कोणताही लेखी वा तोंडी करार न होता त्याच्या कडून ४५०० (साडेचार हजार)प्रतींचे वितरण झाले. उरलेल्या ५०० प्रती मी तांबरम मद्रासला नेल्या होत्या. त्याही कालांतराने आपला वार्ताहरवाल्या श्री. मुरलीधर शिंगोट्यांच्या तर्फे विकल्या गेल्या. त्याचे पैसे त्यांनी काही महिन्यात देऊन सौदा पुर्ण केला.
नवल असे की श्री. खरे नियतकालिकाचे वितरण करतात. पुस्तकाचे वितरण करत नाहीत. नाडीग्रंथ हा विषय पुर्णपणे अनोळखी. मी लेखक म्हणून शून्य माहितीचा. मराठीवाचक पुस्तके दुकानात विकत घ्यायला वाटवाकडी करून जात नाहीत. किंमतीकडे पाहून हात आखडता घेतला जातो. अशा परिस्थितीत ते पुस्तक अत्यंत माफक किंमतीचे असणे व सहज जाताजाता हाती यावे यासाठी नियतकालिकाच्या आकारात तयार करून वाचकांनी प्रवासात वा फावल्य़ावेळात वाचायला मिळावे असा विचार करून १२ रुपयांचे, साप्ताहिकाच्या आकाराचे बनवले होते. ते तसे बनावे असा मला आभासही झाला होता त्याची कहाणी मी पुर्वीच लिहिली आहे.
नाडी ग्रंथांचे वैशिष्ठ्य असे की ज्याला ते पहायची प्रेरणा होते तो जातोच अन्यथा कितीही ठरवले वा मनवले तरी जाणे होणार नाही वा पट्टी सापडणार नाही. असो.
नंतर माझे हिंदीतील पुस्तक ९६च्या नवीदिल्लीच्या पुस्तक मेळाव्यात सहज फिरता फिरता डायमंड पॉकेट बुक्सच्या नरेंद्र वर्मांनी 'चायकी चुस्की लेते लेते' सहज हो म्हटले व त्या नंतर मी श्रीनगरहून स्र्किप्ट पाठवून ते पुस्तक तयार झाले. त्यानंतर त्या पुस्तकाच्या पुढील आवृत्यांचे मानधनाचे पैसै मी न मागता वेळेवर मिळत गेले. नंतर त्यांच्या विचारणेवरून इंग्रजीतील पुस्तक तयार झाले. त्यात नवी ७० पानांची भर घालून नवी आवृत्ती त्यांनी ऑक्टोबर २००९ ला दिमाखात प्रसिद्ध केली.
तमिळमधील नाडीवरील पुस्तकाचे वितरण चेन्नईच्या मे. गिरी ट्रेडींग एजन्सीने केले. त्यावेळी काही कामाने मी हवाईदलाच्या युनिफॉर्म मधे होतो. श्री. गिरी मला त्या वेषात पाहून म्हणाले, 'मीही पुर्वी हवाईदलात होतो याचा मला अभिमान आहे. तुमच्यासारख्या हवाईदलातील अधिकारी गैरतमिळाने तमिळ भाषेत पुस्तक काढले आहे याचा मला आनंद आहे. तुमचे तमिळ मधील पुस्तक वितरित करायलाच नव्हे तर यापुढे आणखी काही तमिळमधे लिहाल तर मी जरूर माझ्या प्रकाशनातर्फे व्यवस्था करीन.'
या पुस्तकाचे तमिळ रुपांतर करणाऱ्या श्री.गोपाळरावांनी एक ही पैसा न घेता महर्षींची सेवा म्हणून सुंदर भाषांतर अत्यंत अल्पकाळात करून दिले.
कन्नड भाषेत बंगलोरच्या संयुक्त कर्नाटक पेपरग्रुपतर्फे कर्मवीरा नावाच्या साप्ताहिकात माझे १७ लेख २००४मधे छापुन आले होते. त्यांना रुपांतराची परवानगी देऊन मी खरेतर विसरून गेलो होतो. गेल्या वर्षी काही जुनी कागदपत्रे चाळता सर्व आठवले. त्या नंतर बंगलोरला प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्यांच्या बदललेल्या मॅनेजमेंटने क्षमा मागून मला हातोहात मानधनाचा चेक दिला.
एक फोन आला. "मी नाडी ग्रंथांचा अनुभव घेऊन आले आहे. त्यानंतर मला आपले मराठी पुस्तक वाचायला मिळाले. आपली परवानगी असेल तर आपल्या पुस्तकाचे गुजराथीत भाषांतर करायला मला आवडेल." त्या होत्या अहमदाबादेच्या सौ मेधा दिवेकर. मी आनंदाने होकार होताच महर्षींच्या कामाला लागल्या. रुपांतराच्या मानधनाचे त्यांनी नावच काढू दिले नाही. बडोद्याचे निलेशभाईं त्रिवेदीनी प्रकाशनाचा खर्च उचलला. पुस्तक ऑक्टोबरच्या १४ तारखेला नाडी ग्रंथावरील दुसऱ्या अधिवेशनात प्रकाशित झाले. मात्र त्याआधी सौ. मेधाताई दिवेकर न्युझीलंडला नातलगांकडे गेल्या त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट अद्याप झालेली नाही. पण तेथील वास्तव्यात माझ्या हिंदी पुस्तकाचे गुजराथीत भाषांतराचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
माझ्या अंधार छाया कादंबरीची तर फारच मजा. रेल्वेच्या प्रवासात एकांनी मनोकामना प्रकाशकांचे नाव सुचवले. मी पत्रांनी संपर्क करता, 'दहा हजार व हस्तलिखित पाठवावे लागेल. छापल्यावर १० प्रती देऊ' असा आदेश दिला. मी हस्तलिखित पाठवले पण दहा हजार पाठवायला असमर्थता दर्शवली. काय झाले कोणास ठाऊक त्यांनी ती कादंबरी विना पैसे घेता छापली. 'कोण हे मनोकामनाचे प्रकाशक आनंद हांडे?' पहायला मी आवर्जून इस्लामपुरला गेलो होतो. तेंव्हा भेट झाली नाही. पण १० प्रतींचे बंडल मिळाले. त्यानंतर २५ वर्षे झाली तरी प्रकाशक आनंद हाडे यांची प्रत्यक्ष भेट अद्याप झालेली नाही!
आणि सध्याचे माझे प्रकाशक नितीन प्रकाशनचे श्री. नितीन गोगटे यांची सचोटी व व्यवसायिकता अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. लेखी करार करून प्रत्येक आवृत्तीचे मानधनाचे पैसे चेकने देणे, पुस्तक विक्रीचा चोख हिशोब दाखवणे आदि ते करतातच पण त्यांची लेखकांशी सन्मानपुर्वक वागणूक डोळ्यात भरते. त्यांचे श्री काळे व अन्य सहकारी तितक्याच आस्थेने व सन्मानाने वागवतात.
आज माझ्या पुस्तकांच्या शेकडो प्रती खपतात. दिल्लीकडे हिंदीत माझ्या पुस्तकाची चोरी करून पुस्तके छापली गेली. पण अजूनही महर्षींच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत पार पडले आहे.

अर्थव्यवहारअनुभव

प्रतिक्रिया

टारझन's picture

30 May 2010 - 2:56 pm | टारझन

णाडी प्रणाली वापरून सांगितलेले हे अनोखे किस्से वाचुन मी प्रचंड प्रभावित झालो. मला आता ही नाडीपट्टी वगैरे भानगड काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता लागून राहिली आहे. महर्षीप्रकोपाविषयी मला भीती वाटायला लागली आहे. कारण तुम्ही सांगितलेल्या नाडीभविष्यानुसार, माझी नाडी त्याच नाडीकेंद्री असणार आहे. महर्षी-सप्तर्षी-ब्रम्हर्षी-देवर्षी यांची तत्वं काय व त्यांच्या या चौहेरी णाडीखेचीचा काय परिणाम होतो ते समजावून सांगितलं तर बरं होईल. या साठमारीतून बचावण्यासाठी काही णाड्या सोडुन वगैरे करून फायदा होईल का?

एक शंका. आपण सौ मेधा दिवेकर यांनी नाडि ग्रंथ छापल्याचं सांगितलं आहे. जर हे मानधन व प्रकाशन खर्चा शिवाय देखील छापुन आलं असेल, तर तो अगदी जणतेला लुबाडण्यासाठी किंवा भोंदुगिरीसाठी देखील राहात नसेल. मग ते नाडीकेंद्रांवाले मोठ्या वर्गण्या घेऊन एकमेकां विरुद्ध कशी कार्य करतात? का मानधन थोडं कमीजास्त असलं तर चालतं? आणि खरं तर मानधनाऐवजी वर्गणी च नको का?

- पजामेश नाडीसोडवी

पाषाणभेद's picture

30 May 2010 - 7:48 pm | पाषाणभेद

१) नाडीमहर्षी एक असतात की अनेक?
२) नाडीमहर्षी म्हणजे जे नाडीपट्टी पाहून भविष्य सांगतात ते ना?
३) ते एकाच गावात असतात की अनेक? (अंतर महत्वाचे)
४) नाडीमहर्षी म्हणजे कोणी एकच मार्गदर्शन करणारा गुरू (प्रिसिंपॉल कसे एक असतात) असे महान योगी वैगेरे असतात/आहेत/ होते का?

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शशिकांत ओक's picture

30 May 2010 - 8:06 pm | शशिकांत ओक

पाषाण भेद व अन्य मित्र हो,
आपण विचारलेत म्हणून खालील लिंकवरून आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
नाडी ग्रंथ भविष्य 2008 Edn Marathi :
http://www.scribd.com/doc/9915903/-

Naadi Predictions 2006 Edn. English:
http://books.google.com/books?id=r0GTvPgBaYkC&lpg=PP1&pg=PA2#v=onepage&q...

नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

पाषाणभेद's picture

1 Jun 2010 - 9:51 am | पाषाणभेद

सर तुमच्या भाषेतले उत्तरे द्या ना? एका शब्दातले उत्तरे आहेत ते. हो किंवा नाही ते.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शिल्पा ब's picture

30 May 2010 - 9:55 pm | शिल्पा ब

नाडी ग्रंथांचे वैशिष्ठ्य असे की ज्याला ते पहायची प्रेरणा होते तो जातोच अन्यथा कितीही ठरवले वा मनवले तरी जाणे होणार नाही वा पट्टी सापडणार नाही. असो.

जर पट्टी असेल तर सापडेल ना? आणि असेल तर गेले किंवा नेले तरी सापडायला काय अडचण आहे?

आजच्या जगात जिथे कृत्रिमपणे DNA रोपण करण्याचा यशस्वी प्रयोग झाला तिथे नाडीवर विश्वास? आणि त्यावर जी भाषा आहे तिचा अभ्यास झाला आहे का मोडीप्रमाणे ? आणि ज्या कोणी या नाड्या काढल्या त्यांना सर्वसामान्य लोकांपेक्षा मोठमोठ्या राजकारणी, उद्योगपती इ. लोकांच्याच नाड्या का नाही काढता आला? आमच्या नाड्यात काय असणार? वर्षानुवर्षे सकाळी उठले, न्याहारी केली, दुपारी जेवले आणि रात्री टीवी बघून झोपले याव्यतिरिक्त काय असणार? नाही म्हणायला मध्येमध्ये शाळा , कालेज आणि एखादी नोकरी केली तेव्हढेच...

आणि खरेच काही असेल तर या नाड्या बघून भविष्यातील युद्ध, ते घडविणारे लोक शोधून टाळता येईल...झालेच तर माओवाद्यांच्या नाड्या शोधून त्यांच्या नाड्या सोडता येतील...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मिसळभोक्ता's picture

1 Jun 2010 - 8:15 am | मिसळभोक्ता

मेजर (की ल्युटिनंट) ओकांचे अभिनंदन.

प्रकाशक ही हरामखोर जमात ओकांना वश झाली, म्हणून.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

हा समज कमी होण्यासाठी तुमच्या धाग्याचा उपयोग झाला.तुम्हाला जसे प्रकाशक मिळाले तसेच सर्वांना मिळोत.
तुमचे लेखन विषय हा सुध्दा महत्वाचा मुद्दा आहेच.
नाडी ग्रंथ ,तोडगे आणि उपाय, लक्ष्मीप्राप्ती , वास्तू या विषयावरची पुस्तके हातोहात खपतात.उदा :शरद वेलणकरांची पुस्तके.
मध्यंतरी एका प्रकाशकाची भेट झाली .त्यांनी मधु मंगेश कर्णिकांचा कथासंग्रह प्रकाशित केला होता.संग्रह फायदा होण्याइतपत खपला नाही.मग ते त्यांच्या मूळ कार्याकडे वळले. रांगोळीची पुस्तके,अंकलिप्या, गुरुवारची व्रते वगैरे.
एफ.एच. बुरहाणपूरवाला ,पाववाला स्ट्रीट , मुंबई -३ हे सगळ्यात यशस्वी प्रकाशकांपैकी एक आहेत.
तुमच्या कार्याचे अवमूल्यन मी करतो आहे असा समज करून घेऊ नये.पण लोकप्रिय विषयावरची पुस्तके धंद्यासाठी हमखास नफा प्राप्तीची असतात.
आतापर्यंतचे तुमचे सर्व लेख वाचले. कुतुहुलापोटी अगस्ती नाडी ग्रंथवाचणाराकडे गेलो होतो पण माझी पट्टी सापडली नाही.
असे दोनदा झाल्यावर हा आपल्या साठी नव्हे असे म्हणत मी नाडीशी फरकत घेतली.
अवांतर :१९६२/६५ साली तुम्ही युध्दभूमीवर होतात का ?ते अनुभव एकदा लिहाच.

चतुरंग's picture

2 Jun 2010 - 8:08 pm | चतुरंग

हे मागे एकदा ओककाकांना मी सुचवले होते.
युद्धस्य कथा रम्या! :)

चतुरंग

मी-सौरभ's picture

2 Jun 2010 - 7:28 pm | मी-सौरभ

>>>अवांतर :१९६२/६५ साली तुम्ही युध्दभूमीवर होतात का ?ते अनुभव एकदा लिहाच.

फक्त अवांतर साठी..

-----
सौरभ :)

वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत.

प्रकर्षांने नोंद करावीशी वाटते मिसळपाव.कॉम संस्थळाची.(नव्या माहितीची भर घालून वाचकांसाठी धागा सादर)

विविध प्रकाशकांच्या कहाण्या व लेखकांची व्यथा वाचून मी खरोखर सुदैवी असे म्हणायला हवे. कारण मला भेटलेले प्रकाशक व वितरक खरोखर सचोटीची वागणून देणारे मिळाले आहेत.
मराठीत नाडीग्रंथांवरील पहिले पुस्तक सप्टेंबर १९९४ ला पुण्यात दै.सकाळच्या छापखान्यात मी माझ्या हिमतीवर छापले नंतर पुण्यातील संदेश एजन्सीचे खरे यांच्या सौजन्याने कोणताही लेखी वा तोंडी करार न होता त्याच्या कडून ४५०० (साडेचार हजार)प्रतींचे वितरण झाले. उरलेल्या ५०० प्रती मी तांबरम मद्रासला नेल्या होत्या. त्याही कालांतराने आपला वार्ताहरवाल्या श्री. मुरलीधर शिंगोट्यांच्या तर्फे विकल्या गेल्या. त्याचे पैसे त्यांनी काही महिन्यात देऊन सौदा पुर्ण केला.
नवल असे की श्री. खरे नियतकालिकाचे वितरण करतात. पुस्तकाचे वितरण करत नाहीत. नाडीग्रंथ हा विषय पुर्णपणे अनोळखी. मी लेखक म्हणून शून्य माहितीचा. मराठीवाचक पुस्तके दुकानात विकत घ्यायला वाटवाकडी करून जात नाहीत. किंमतीकडे पाहून हात आखडता घेतला जातो. अशा परिस्थितीत ते पुस्तक अत्यंत माफक किंमतीचे असणे व सहज जाताजाता हाती यावे यासाठी नियतकालिकाच्या आकारात तयार करून वाचकांनी प्रवासात वा फावल्य़ावेळात वाचायला मिळावे असा विचार करून १२ रुपयांचे, साप्ताहिकाच्या आकाराचे बनवले होते. ते तसे बनावे असा मला आभासही झाला होता त्याची कहाणी मी पुर्वीच लिहिली आहे.
नाडी ग्रंथांचे वैशिष्ठ्य असे की ज्याला ते पहायची प्रेरणा होते तो जातोच अन्यथा कितीही ठरवले वा मनवले तरी जाणे होणार नाही वा पट्टी सापडणार नाही. असो.

ग्रहांकित ज्योतिषांच्या वर्तुळातील एक प्रतिष्ठेचे नितकालिक. त्यात लेख छापून येणे मानाचे मानले जाते. एकदा मी दादा ऊर्फ चंद्रकांत शेवाळे यांच्या तांबड्या जोगेश्वरीजवळच्या कार्यालयात पोहोचलो. त्यांची ओळख ना पाळख पण त्या पहिल्या भेटीत सूर जुळले. नाडी ग्रंथांची ओळख महाराष्ट्रातील अनुभवी आणि चोखदळ वाचकांच्या समोर आणायला ग्रहांकितला प्रथम श्रेय मी देतो. दर वर्षीच्या दिवाळी अंकात माझे लेख आवर्जून ते प्रकाशित करत असत. नाडी ग्रंथांवर संपूर्ण दिवाळी अंक २०१२ मधे सादर केला गेला. त्याला सर्वोत्कृष्ठ जोतिषविषयक मानाचे पारितोषक मिळाले होते. (आता तो ईबुक रूपात उपलब्ध आहे)ऑटो रायटिंग सारख्या गूढविद्या (ऑकल्ट सायन्स) विषयावर लांबलचक लेख प्रकाशित झाल्यावर स्वलेखन हा प्रकार काय आहे? तो प्रत्येकाला शिकता येईल का ? भूते किंवा अज्ञात शक्तींचा प्रादुर्भाव स्वलेखन करणाऱ्यावर पडतो का? वगैरे विवेचन त्यातून केले गेले होते. या विषयावर वेगळे ईबुक आहे.

नंतर माझे हिंदीतील पुस्तक ९६च्या नवीदिल्लीच्या पुस्तक मेळाव्यात सहज फिरता फिरता डायमंड पॉकेट बुक्सच्या नरेंद्र वर्मांनी 'चायकी चुस्की लेते लेते' सहज हो म्हटले व त्या नंतर मी श्रीनगरहून स्र्किप्ट पाठवून ते पुस्तक तयार झाले. त्यानंतर त्या पुस्तकाच्या पुढील आवृत्यांचे मानधनाचे पैसै मी न मागता वेळेवर मिळत गेले. नंतर त्यांच्या विचारणेवरून इंग्रजीतील पुस्तक तयार झाले. त्यात ऑक्टोबर २००९ ला नवीन ७० पानांची व २०२१ मधे ५० पानांची भर घालून हिन्दी आणि इंग्रजीत दिमाखात प्रसिद्ध केली.
तमिळमधील नाडीवरील पुस्तकाचे वितरण चेन्नईच्या मे. गिरी ट्रेडींग एजन्सीने केले. त्यावेळी काही कामाने मी हवाईदलाच्या युनिफॉर्म मधे होतो. श्री. गिरी मला त्या वेषात पाहून म्हणाले, 'मीही पुर्वी हवाईदलात होतो याचा मला अभिमान आहे. तुमच्यासारख्या हवाईदलातील अधिकारी गैरतमिळाने तमिळ भाषेत पुस्तक काढले आहे याचा मला आनंद आहे. तुमचे तमिळ मधील पुस्तक वितरित करायलाच नव्हे तर यापुढे आणखी काही तमिळमधे लिहाल तर मी जरूर माझ्या प्रकाशनातर्फे व्यवस्था करीन.'
या पुस्तकाचे तमिळ रुपांतर करणाऱ्या श्री.गोपाळरावांनी एक ही पैसा न घेता महर्षींची सेवा म्हणून सुंदर भाषांतर अत्यंत अल्पकाळात करून दिले.
कन्नड भाषेत बंगलोरच्या संयुक्त कर्नाटक पेपरग्रुपतर्फे कर्मवीरा नावाच्या साप्ताहिकात माझे १७ लेख २००४मधे छापुन आले होते. त्यांना रुपांतराची परवानगी देऊन मी खरेतर विसरून गेलो होतो. गेल्या वर्षी काही जुनी कागदपत्रे चाळता सर्व आठवले. त्या नंतर बंगलोरला प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्यांच्या बदललेल्या मॅनेजमेंटने क्षमा मागून मला हातोहात मानधनाचा चेक दिला.
गुजराथी जाणकार विदुषी सौ. मेधा दिवेकर...
एक फोन आला. "मी नाडी ग्रंथांचा अनुभव घेऊन आले आहे. त्यानंतर मला आपले मराठीती छोटे खानी पुस्तक वाचायला मिळाले. आपली परवानगी असेल तर आपल्या पुस्तकाचे गुजराथीत भाषांतर करायला मला आवडेल."
त्या होत्या अहमदाबादेत स्थायिक सौ मेधा दिवेकर. गुजराथी भाषेवरील प्रभुत्वातून त्यांनी कै. डॉ. प. वि. वर्तकांची पुस्तके गुजराथीत अनुवादित केली होती. अशी विदुषी आपणहून भाषांतर करायला परवानगी मागते आहे याचे समाधान वाटून मी आनंदाने होकार देताच त्या महर्षींच्या कामाला लागल्या. रुपांतराच्या मानधनाचे त्यांनी नावच काढू दिले नाही.
बडोद्याचे निलेशभाईं त्रिवेदीनी प्रकाशनाचा खर्च उचलला. पुस्तक सन २००९, ऑक्टोबरच्या १४ तारखेला नाडी ग्रंथावरील दुसऱ्या अधिवेशनात प्रकाशित झाले. मात्र त्याआधी सौ. मेधाताई दिवेकर न्युझीलंडला नातलगांकडे गेल्या म्हणून त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नाही...(सध्या ते पुस्तक बुकगंगा.कॉमवर ईबुक रूपात उपलब्ध आहे.)
...
आश्चर्य असे की त्या नंतर बरेच वर्षांनी पुज्य चितळे बाबांच्या घरी त्यांच्या नातलग म्हणून मला भेटल्या. त्यावेळी त्यांच्या मागणीवरून मी त्यांना इंग्रजीतील नाडी प्रेडिक्शन्स - ए माईंड बॉगलिंग मिरॅकल – (२००९ आवृत्ती) पुस्तक हातात दिले. त्या पुर्ण २६० पानांच्या आवृत्तीचे गुजरातीत भाषांतर करून त्या न्यूझीलंडहून पाठवत आणि सुरत मधील दैनिक सामना म्हणून गुजराथी पेपर मधून ते आठवड्याच्या लेखमालेत प्रसिद्ध होत राहिले. ते लेखनकार्य संपवून झाले अन कॅन्सरच्या प्रदीर्घ व्याधीने त्यांची प्राण ज्योत मालवली...
महर्षींचे महान कार्य गुजराथीतील वाचकांना वाचायला मिळावे म्हणून ते कार्य पुर्ण होईतोवर त्यांनी मला जीवनदान दिले असे त्या शेवटी शेवटी फोनवरून बोलताना म्हणाल्या.

मनोकामनाचे आनंद हांडे
प्रत्यक्षात कधीच न भेटलेले प्रकाशक.
माझ्या अंधार छाया कादंबरीची तर फारच मजा. रेल्वेच्या प्रवासात एकांनी मनोकामना प्रकाशकांचे नाव सुचवले. मी पत्रांनी संपर्क करता, 'दहा हजार व हस्तलिखित पाठवावे लागेल. छापल्यावर १० प्रती देऊ' असा आदेश दिला. मी हस्तलिखित पाठवले पण दहा हजार पाठवायला असमर्थता दर्शवली. काय झाले कोणास ठाऊक त्यांनी ती कादंबरी विना पैसे घेता छापली. 'कोण हे मनोकामनाचे प्रकाशक आनंद हांडे?' पहायला मी आवर्जून इस्लामपुरला गेलो होतो. तेंव्हा भेट झाली नाही. पण १० प्रतींचे बंडल मिळाले. त्यानंतर २५ वर्षे झाली तरी प्रकाशक आनंद हाडे यांची प्रत्यक्ष भेट अद्याप झालेली नाही! आता अंधारछाया ही कादंबरी ईबुक रूपात वेळोवेळी बुक गंगा, ई साहित्य, अहमदाबादच्या मातृभारती कडून प्रकाशिक झाली आहे. याच मातृभारतीने एका स्पर्धेत माझ्या हवाईदलातील आठवणी आणि प्रेरणा दायी लेखांसाठी २५ हजाराचे प्रथम पारितोषक दिले. जयपुरच्या नामांकित ज्योतिष संस्थेने माझा २०हजार व गौरवपत्र देऊन सत्कार केला होता.
नितीन प्रकाशनचे श्री. नितीन गोगटे यांची सचोटी व व्यवसायिकता अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. लेखी करार करून प्रत्येक आवृत्तीचे मानधनाचे पैसे चेकने देणे, पुस्तक विक्रीचा चोख हिशोब दाखवणे आदि ते करतातच पण त्यांची लेखकांशी सन्मानपुर्वक वागणूक डोळ्यात भरते. त्यांचे श्री स्नेही काळे व अन्य सहकारी तितक्याच आस्थेने व सन्मानाने वागवतात.
आज माझ्या पुस्तकांच्या शेकडो प्रती खपतात. दिल्लीकडे हिंदीत माझ्या पुस्तकाची चोरी करून पुस्तके छापली गेली. पण अजूनही महर्षींच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत पार पडले आहे.
सध्या मी एकाच वेळी लेखक, प्रकाशक आणि वितरक अशा ३ भूमिकात ई पुस्तके सादर करत आहे. साधारण रोज एक पुस्तक जावे अशी अपेक्षा करून सुरवात केली. अनेक प्रतिष्ठित सामाजिक माध्यामांतून पुस्तकांचे जाहिरात व वितरण मोफत होत असल्याने लिहायला आणि सादर करायला हुरुप येतो.
या शिवाय प्रकर्षांने नोंद करावीशी वाटते ती मिसळपाव.कॉम या संस्थळाची. नाडी भविष्य हा विषय आणि माझ्यावर जबरदस्त ट्रोलिंग केले गेले तरीही त्या वरील माझे लेखन सतत होत राहिले. ट्रोल करणारे गायब झाले. अंनिससारख्या संस्थांनी विषय टाळून देण्याचे धोरण केले. नाडी पट्ट्मधील लेखनाचा डेटा बँक म्हणून साठा करून तो याविषयावर अभ्यासूंना संशोधन करायला मोफत मिळावा म्हणून सध्या उपक्रम हाती घेतला आहे.