काही दारात बारात, थोडे वेळात चुकले,
माझ्या मनात होते, का तु झोपुन घेतले?..
रात्री जागवल्या साधु, राज-हरणाला पीत
आर्त विनवण्या केल्या जोगियाच्या प्रहरात
भल्या पहाटेला मस्तक तुझ्या चरणी झुकले
काळजात कोमेजले मुक्या मागण्यांचे नि:श्वास
तरि नकाराचा तुझ्या नाही केला ग दुस्वास
घोरण्याच्या सुरांत तुझ्या, माझ्या मागणीला जपले
मल्हाराच्या लडिवाळ, सरी आळवल्या कानात,
आळविले दाराचे सूर, ठेवुन आशा ग मनात
तुझ्या भुपाळाच्या ताना, वाटे निमीत्त हुकले.
अखेरच्या प्रहरात रानी, लाज माझी राख
ऐक जीण्यातुन घुमे, रामु दुधवाल्याची हाक
दयाघना, मरो आता; शोधु मार्ग ते एकले..
प्रतिक्रिया
30 May 2010 - 8:34 pm | शैलेन्द्र
लिंक कशी टाकायची? :-?