गुलाबाला पाणी घातलं तेव्हा कळालं
गुलाब तर केव्हाच जळुन गेलेला
आता नेहमीच हसायचं असं ठरवलं तेव्हा कळालं
माझं हसणंच रुसुन निघुन गेलेलं
मित्राची माफी मागायची ठरवलं तेव्हा कळालं
तो तर या जगातुनच निघुन गेलेला
जिच्यासाठी सगळं सोडायचं ठरवलं तेव्हा कळालं
तीच मला सोडुन निघुन गेलेली
मला जपणारे कोण, समजलं तेव्हा कळालं
प्रेमाचे दोन शब्द बोलणारे आयुष्यातुन निघुन गेलेले
आता तरी रडावं असं ठरवलं तेव्हा कळालं
अश्रु सुद्धा माझ्याशी रुसुन बसलेले
शेवटचा पर्याय म्हणुन मरायचं ठरवलं तेव्हा कळालं
मृत्युदेवी माझ्याकडे पाठ फिरवुन हसत चाललेली
डिस्क्लेमरः (गैरसमज नकोत म्हणुन): कवितेतुन एवढच सांगण्याचा उद्देश आहे की वेळ निघुन गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेत निर्णय घेउन मोकळे व्हावे, नंतर कशातही राम नसतो :)
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
28 May 2010 - 3:53 am | मदनबाण
मित्राची माफी मागायची ठरवलं तेव्हा कळालं
तो तर या जगातुनच निघुन गेलेला
:(
कविता आवडली...
मदनबाण.....
Jealousy is nothing more than a fear of abandonment.
28 May 2010 - 6:59 am | टारझन
हे काय बे राक्या ?
- (पोळलं तेव्हा...) कांदामोळा
28 May 2010 - 10:20 am | फटू
एकदम अचाट कविता...
मुक्त छंदात कविता पाडणार्यांचीही बोलती बंद व्हावी अशी ;)
ह. घ्या.
- फटू
28 May 2010 - 11:19 am | राघव
सटकलंय काय रे गोट्या? :-?
राघव