प्रतिक्षा ? ? ?
निद्रेच्या अधिनस्तहि उगडेच असतात नेत्र,
परतीच्या प्रतिक्षेत तुझ्या.
न जाणो मिटले ते अन…..
अवतरली तू अवचित…….. .? ? ? ?
आजही स्मरतात ते दिवस .......
धुंद ! धुंद ! !
पुनवेच्या चांदण्यांत,
मोकळ्या केशसंभारांत,
निरागस उभी तू.
मला वाटले,
चंद्रमाच झाला लुप्त धरणीवर,
काळ्या मेघाआड.
पुन्हा बहरला तोच वसंत,
तारकांची धुंद बरसात,
आसमंती तोच मंद वारा,
? ? ? ?
निरर्थक,
तुजवीण ........
तुझ्या आठवणीच्या वाती,
अजूनही तेवती उरी,
आसवांच्या दीपांनी,
नयनांच्या ज्योती घेऊन
या देहीं पुन्हा भेटावीस तू एकदा
ना तरी सरणावरहि
राहतील नेत्र पुन्हा उघडेच माझे
तुझ्या परतीच्या वाटेवर
प्रतिक्षा करीत ! ! !
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
19 May 2010 - 7:14 pm | sur_nair
तुमच्या कवितेत मृत्यू, सरण वगैरे नेहमी येतात असे जाणवले.
19 May 2010 - 7:15 pm | शुचि
होय असेच म्हणते.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
19 May 2010 - 8:19 pm | स्पंदना
असेल ही तस ! ...पण त्यामुळे कवीता कुठे उणी नाही होत.
कुणाला एव्हढ "मिस" करताय? विरह वेदना अगदी प्रकर्षाने जाणवते.
:|
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
20 May 2010 - 9:53 am | निरन्जन वहालेकर
श्रीमान सुरेशजी, शुचि, तसेच अपर्णा ताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद व आभार !
मृत्यू , विरह, ह्याशिवायहि कविता मिपा वर दिल्या आहेतच
पण हाही आयुष्याचा एक भाग असतोच ना? कविता लिहिली तरी प्रत्येक कवितेचा व्यक्तिगत जीवनाशी काही संबंध असतोच असे नाही
पण निस्सीम प्रेमातील असफलता, विरह, व मृत्यू याचा विचार केला व " जे न देखे रवी ....... सुचले ते लिहिले.
पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार ! ! !
सस्नेह
निरंजन .
20 May 2010 - 12:38 pm | राघव
जन्म-मृत्यूचा एक वेगळा विचारही होऊ शकेल.
मी प्रयत्न करतो. बघू जमतंय का ते. :)
राघव
20 May 2010 - 2:07 pm | निरन्जन वहालेकर
नक्कीच जमेल ! ! ! व वाचायला आनन्द होइल.
वाट पाहतो !
20 May 2010 - 9:57 am | फटू
अगदी सक्काळी सक्काळी अशी कविता वाचायला नको होती.
असो. कविता छान झाली आहे.
तुझ्या आठवणीच्या वाती,
अजूनही तेवती उरी,
आसवांच्या दीपांनी,
नयनांच्या ज्योती घेऊन
हे छानच !
- फटू
20 May 2010 - 9:00 pm | पक्या
छान कविता...आवडली.
>>चंद्रमाच झाला लुप्त धरणीवर,
>>काळ्या मेघाआड.
इथे लुप्त ऐवजी प्रकट या अर्थी शब्द हवाय का? आणि लुप्त हवा असेल तर धरणी ऐवजी आकाश हवे का?
जय महाराष्ट्र , जय मराठी !
21 May 2010 - 8:01 am | निरन्जन वहालेकर
प्रतिक्रियेसाठी मनस्वी आभार ! ! !
तिचा मुखचंद्रमा केशसंभारामुळे दिसेनासा झाला म्हणून "लुप्त" असे म्हटले आहे.
सस्नेह
निरंजन