ती चिडली तेव्हा भीषण, भांड्यांचा निनाद होता
वेगात फ़िरवले लाटणे, तो नवरा चुकवित होता
तरी घावही त्याच्या भाळी, येऊन थबकले होते
टरटरून जणु फुगलेला, फ़ुग्गा मग दिसला होता
ती बाई होती म्हणुनी, घळघळुनी उलटी रडली
त्या वेळी गप्प बसोनी, तो टेंगुळ दाबित होता
अन क्षणात गमले त्याला, संपली जेवणे त्याची
पोळीवर धुरकट जेव्हा, आंबील घास तो घेता
हे अन्न असे चिवडुनी , तो मुळी बिथरला नाही
खपलीत टेंगुळाच्याही, स्वातंत्र्य चौघडा होता
प्रतिक्रिया
15 May 2010 - 7:35 am | विकास
सॉलीड!
हे अनुभवाचे बोल असावेत का? :?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
15 May 2010 - 7:23 pm | अनिल हटेला
=))
=))
=))
स्सह्ही !!!!!!!!!!!!
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
15 May 2010 - 7:41 am | अरुण मनोहर
;)
15 May 2010 - 7:54 am | निरन्जन वहालेकर
व्वा ! क्या बात है बॉस ! लाजबाब ! ! !
15 May 2010 - 9:33 am | मदनबाण
झकास्स्स... ;)
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
15 May 2010 - 6:12 pm | शुचि
आवडली
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
15 May 2010 - 7:15 pm | मीनल
:)) क्लासिक आहे.
मी चिडेन तेव्हा भांड्यांचा निनाद,वेगात लाटणे फ़िरवणे करून पहायला हवे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
15 May 2010 - 7:39 pm | टारझन
=)) =)) =)) हाऊ फणि
15 May 2010 - 8:30 pm | स्पंदना
:B मागच्या कवितेचा (दुश)परिणाम दिसतोय .
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
16 May 2010 - 1:05 am | sur_nair
खोकल्याच्या उफाळीने कवी 'ग्रेस' हैराण झाले आहेत अशी बातमी कुठेशी वाचली......
16 May 2010 - 1:18 pm | बेसनलाडू
(अननुभवी)बेसनलाडू