परीक्षा असत्या तर...... एक भयनिबंध!!!

प्रमोद काळे's picture
प्रमोद काळे in जनातलं, मनातलं
14 May 2010 - 7:37 pm

दि. १३/०४/२०३५, पुणे, आजचा होमवर्क : मराठी: निबंध लिहा : विषय : परीक्षा असत्या तर......

आज सरांनी हा भंगार विषय निबंध लिहायला म्हणून दिला. मुळात निबंध लिहायचाच का हेच आम्हाला कळत नाही. त्याही पेक्षा मुळात च्यायला लिहायचंच का ? वर्गात या,काय ते बोला आणि घंटा वाजल्यावर जा की..... आम्हाला काय हवं ते आम्ही घेऊ. बाकीचं सोडून देऊ. मुळात भाषा ही काय शिकायची गोष्ट आहे ? आता सायन्स, गणित, कॉम्प्यूटर वगैरे ठीक आहे. पण भाषा ! बोललेलं समजलं समोरच्याला की बास.... त्यात ते काय.... व्याकरण हवंय कोणाला ? पण सरकारला काय समजत नाय असं पप्पा म्हणतातच ना.... इंग्लिश, हिंदी, मराठी आणि शिवाय एक जागतिक भाषा..... एवढ्या भाषा शिकायच्या म्हणजे आमचा चोंद्याच ! पण करणार काय! कॉलेजात जायचा रस्ता अजूनही शाळेतूनच जातो ना....
तर सांगत होतो आजच्या होमवर्क विषयी. सरांनी हा विषय सांगितला तर आम्हाला कोणालाच हे काय ते कळे ना. विचारलं तर म्हणाले घरी आईबाबांना विचारा. आता पुन्हा चोंद्या! आई बाबा भेटतायत कोणाला इथे? त्यांचे जॉब्ज, हॉबी क्लब्ज आणि पार्ट्यातून वेळ मिळणार कधी, आणि आम्ही हे त्यांना विचारणार कधी!
पण गंमतच झाली. मॉम आज चक्क लवकर घरी आली!!!.... तिचं डोकं दुखत होतं म्हणे. आता अशावेळी शहाण्या मुलाने आईला इतक्या गंभीर विषयावर काही विचारू नये. पण आम्ही कुठे शहाणे आहोत! आणि मुळात हा विषय एवढा गंभीर असेल असं मला वाटलंच नव्हतं. त्यामुळे आईने घरात पाऊल टाकल्या टाकल्या मी भुणभुण सुरू केली...... आई, निबंध लिहायचाय.... प्लीज हेल्प मी....
आई म्हणाली नेटवरून घे ना बबा काय हवंते.... त्या थावजंड कॉम्पोजिशन्स साइटवर मिळेल हवं ते.... मला पडू दे जरा....
मी म्हणालो आई, इतकं सोप्पं असतं तर कोणाला हौस आहे तुला विचारायची.... पण सरांनी सांगितलंय आईबाबांना विचारा या विषयी.... म्हणून मग.....
होक्का ! त्यांचं काय जातंय आईबाबांना विचारा म्हणायला...स्वत:ची कामं करायला नकोत....नवबाराव्या वेतन आयोगाचे बेनिफिट्स तेवढे घ्यायला हवेत......
आई, असं तू म्हणालीस असं सांगू सरांना ?
हो. खुश्शाल सांग. काय करणार आहेत ते ? आता परीक्षा नाहीत की काही नाही..... (क्र्मशः....)

इतिहासविरंगुळा

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

14 May 2010 - 8:21 pm | योगी९००

बापरे...

किती मोठ्ठा लेख..!!!...बराच वेळ लागला असेल तुम्हाला लिहायला...माझ्या मोबाईल वर हा लेख download होऊन त्याने (म्हणजे माझ्या मोबाईलने) मला मराठीत वाचून दाखवला..जवळ जवळ २०-२५ मि. लागली याला..एवढ्या वेळात माझी नॉर्वेहून अमेरिकेत जाऊन भाजी सुद्धा घेऊन झाली..

आता परतीच्या प्रवासात काय ऐकावे हेच विचार करतोय्..बहुधा टारझन, कोदा, विशाल कुलकर्णी यांचे छोटे छोटे लेख ऐकावे लागतील..

खादाडमाऊ
१३/०४/२०३५,

प्रमोद काळे's picture

6 Jun 2010 - 12:38 am | प्रमोद काळे

व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे शरीर सारे म्हणते पाज!

क्षमा करा खादाडभाऊ. खरं तर लिहायचे आहेच. पण म्ध्यंतरी माझा कॉम्प्यूटर बिघडला. नेटची माती झाली होती. शिवाय कामही खूप वाढले. त्यामुळे पुढे काही लिहिणे जमले नाही. आता परिस्थिती आवाक्यात आली आहे. आता लिहितो. बाय द वे, नॉर्वेतून भाजी काय आणली ? तिकडे स्वस्ताई खूप आहे की तुमचेच मळे वगैरे...?
ही गंमत. पण लिहायचे आहेच. हा विषय खरंच खूप गंभीर आहे. आणि एक शिक्षक म्हणून मला तो अधिकच जवळचा आणि भयावह वाटतो आहे.

संदीप चित्रे's picture

14 May 2010 - 9:23 pm | संदीप चित्रे

>> मुळात निबंध लिहायचाच का हेच आम्हाला कळत नाही. त्याही पेक्षा मुळात च्यायला लिहायचंच का ?

>> आता सायन्स, गणित, कॉम्प्यूटर वगैरे ठीक आहे. पण भाषा ! बोललेलं समजलं समोरच्याला की बास.... त्यात ते काय.... व्याकरण हवंय कोणाला ?

शब्द थोडेफार इकडे-तिकडे पण मी प्रत्यक्ष ह्या अर्थाची वाक्यं ऐकली आहेत !
'पुस्तकं बिस्तकं वाचायची कशाला?' हे ही ऐकलं आहे !!

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com