दू s s s s र किनारा !
असेही दिवस होते बिलोरी.
गोड हसायची तू गालांतल्या गालांत,
अन गुलाब फुलायचे माझ्या मनात.
होऊन प्राजक्त बरसायची
तू माझ्या स्पंदनांत
अन मीहि आकंठ न्हायचा
प्रेमसागरांत !
पण अखेर सागरच तो
अथांग ! ! !
भरती,
ओहोटी,
लाटा,
अन असंख्य तरंगांना
सहज कवेंत सामावणारा !
सामावत गेलो अथांगांत त्याच्या,
ओहोटी, ओहोटीला.
दुरावत गेला तुझा किनारा,
नव नव्या लाटांच्या उधाणात.
प्रचंड भरतीच्या लाटांनी
फेकले पुन्हा किनाऱ्याकडे.
खूप दू s s s र सरकलेला किनारा,
अन मी एकटा ! एकटा ! !
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
10 May 2010 - 5:44 pm | शुचि
सुंदर आणि करुण!!
करुण म्हणून सुंदर!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||