न लिहिलेल्या खरडी

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
7 May 2010 - 10:09 am

प्रास्ताविकः खरडवह्या व त्यांचा वापर याविषयी नव्याने काही लिहिण्याची गरज नाही. पण खाली दिलेल्या खरडी कोणीही कुठेही लिहिलेल्या नाहीत. या खरडींचे लेखक प्रत्यक्षात अस्तित्वात असले तरी हे लिखाण पूर्णतः काल्पनिक आहे. खरड लिहिणार्‍याच्या नावाचे फक्त आद्याक्षर लिहिले आहे. ती खरड कुणी कुणाच्या खरडवहीत लिहिली असेल ते ज्याने त्याने ठरवायचे आहे. 'ता' म्हणजे 'ताकभात' समजा वा 'ताडी' समजा. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना.
सदर लेखन गंभीरपणे घेण्यास सक्त मनाई आहे. तसा प्रयत्न करणारे परिणामास 'खुद जिम्मेदार' राहातील याची कृपया नोंद घ्यावी. प्रास्ताविक संपले.
टा: ओ काका, तुमचं लक्ष कुठं आहे? या प्राजुने आपल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं किती आयडी उघडे केलेत बघा की. मिसळभोक्ता म्हणजे सर्किट, नाना चेंगट म्हणजे अवलिया, केशवसुमार म्हणजे अनिरुद्ध अभ्यंकर... काय चाललंय काय आं? असंच चालू राहिलं तर उद्या राजेश घासकडबी, वसंत सुधाकर लिमये, अक्षय पुर्णपात्रे, धम्मकलाडू या सगळ्यांचे चेहरे उघडे पडतील की! तुम्ही संपादक मंडळी काय संपादन करता का हजामती?
रा. घा.: नमस्कार. तुमच्या खरडवहीत माझ्या आयडीबद्दल खोडसाळपणाने लिहिलेला मजकूर वाचला. माझा एकमेव आयडी राजेश घासकडबी हाच आहे. माझ्यावर डूख धरुन असणार्‍या लोकांनी असले काहीबाही लिहावे हे मिसळपावच्या परंपरेला शोभणारे नाही. कृपया अशा खोडसाळ सदस्यांना समज द्यावी.
टा: ओ काका, आम्ही अशा समजांना फाट्यावर मारतो . आणि खोडसाळ कुणाला म्हणता? खोडसाळ हा कुणाचा आयडी आहे सांगू का?
भ.मा: शरदिनीतै, तुझी अर्थगर्भ कविता फार दिवसात वाचली नाही. तुझ्या आणि प्राजुच्या कविता हे मिपाचं भूषण आहे.
शः दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. कृपया प्राजु आणि माझा उल्लेख एकाच वाक्यात करु नये. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी. मनात आणलं असतं तर असे चारपाच कवितासंग्रह मी अकलूज, येडेनिपाणी , गडमुडशिंगी , जत अशा गावांत प्रकाशित केले असते. मुद्दाम खरड लिहिल्याबद्दल आभार, पण पुन्हा प्रतिसाद देताना हे ध्यानात ठेवावे.
मु: तात्या, तुझ्या संकेतस्थळावर शुद्धलेखनाचे एवढे काही नाही असे तू म्हणतोस. (तुझ्या भाषेत फाट्यावर मारतोस) पण सर्व उर्जा बलसंवर्धनात व्यय झाल्याने बुद्धीमांद्य आलेले वळू इथे सगळ्यालाच हरताळ फासत आहेत. या सगळ्याला तुझीही फूस असावी असा माझा कयास आहे. एका कानामात्रेने, एका अक्षराने, र्‍ह्स्वदीर्घाने काय फरक पडतो हे मी तुला सांगायला नको. 'धरावे' चे 'मारावे' होते. 'चिरदाह' चे 'चीरदाह' होते. 'सगेसोयरे' चे 'गेसोयरे' होते. तू याला कुठे तरी आवर घालावास एवढेच मला सुचवावेसे वाटते.
वि: आपले सर्व संपादकीय अधिकार काही काळापुरते काढून घेण्यात येत आहेत. संपूर्ण लोकशाही तत्वांवर चाललेल्या या संकेतस्थळावर फायनल शब्द माझाच आहे, हे ध्यानात ठेवावे.
बि: अशी कशी गं तू?
प्रि: मी आहे तशी आहे. कुणीतरी आल्यागेल्यांची टवाळी करावी, हे मला तरी सहन होणार नाही. आंतरजालावर प्रसिद्ध लोकांच्यावर चिखलफेक करायची हल्ली फॅशनच आली आहे. आणि माझ्यापेक्षा प्रसिद्ध आंतरजालावर कुणीच नाही, हे मलाही ठाऊक आहे. सारखे मलाच टार्गेट करतात मेले.
मिभो: सुकांना त्यांच्या लेखांपेक्षा आपण सध्या कुठे आहोत, काय करत आहोत हे सांगण्यात अधिक रस आहे, असे दिसते. क्याथे प्यासिफिकच्या इकॉनॉमी क्लासमध्ये असलेले झुरळही बराच प्रवास करते म्हणावे!
ला: ताई, कित्ती गोड, कित्ती गोड गं तुझ्या कविता! 'गुण्गुणू मी कशी, रंग मेंदीचे पुन्हा, जावळावरी तुझ्या, आज प्रीतीच्या खुणा' डोळे भरुन आले गं! कसं कसं सुचतं गं तुला हे?
वि: डॉक्टरसाहेब, माझ्या लेखाला तुमच्या दुसर्‍या आयडीकडून एकही प्रतिसाद नाही. आपलं काय ठरलंय? तरी माझ्या लिखाणात मी चेकॉव्हबिकॉव्ह सगळे टाकले आहेत
प्रा: माफ करा हां भाऊ. अहो, जरा नेटवर उर्दू शायरीचा शोध घेत होतो. मायला या उपक्रमावर शायरीशिवाय प्रतिसाद देणं मुश्किल होऊन बसलं आहे बॉ!
इंपः माफ करा हां सायेब. मी नवीन असल्यामुळे जरा अडचण येते. या एकदा कोल्लापुरला आमच्या. मस्तपैकी तांबडा-पांढरा पिऊ!
ऋ: तुमच्या या प्रतिसादावरुन हे आठवले!
जे: अहो, मी कसला ग्रेट? बरं आता तुम्ही म्हणताय, त आहे मी ग्रेट. बस? एकदा ग्रांट रोड स्टेशनवर रमेश भाटकर दिसला तर चटकन जाऊन त्याचे पाय धरले. 'काय, काय..' म्हणत खिसा सावरत मागे सरला. म्हटलं, कसाही दिसोस बाबा, स्नेहलजींचा मुलगा आहेस तू....
श्रामो: बाणेदारपणा वगैरे काही नाही. बांधिलकीही नाही. माझे लिखाण मी एकापेक्षा अधिक संकेतस्थळांवर एकाच वेळी टाकतोही. जिथे क्लास तिथे प्रतिसाद कमी, जिथे मास तिथे जास्त असे तू म्हणतोस. ते तर मलाही ठाऊक आहे.
प्रः 'रोशनी' च्या अलीकडच्या भागाने मला माझे जुने मत बदलावेसे वाटू लागले आहे.
साबा: भटाबामणांच्या इतर संकेतस्थळांसारखे हे स्थळ नसावे असे वाटते. हिंदुस्थान जिंदाबाद!
चि: माझे प्रतिसाद कंटाळवाणे न होता रंजक व्हावेत यासाठी माझ्या 'जनुकात' काही बदल घडवून आणता येणे शक्य आहे काय?
धः विकासरावांना विचारा. रटाळ प्रतिसाद हे खाते आजन्म त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
प्रदे: पांचाळे आजारी पडण्याचा आणि माझा त्यांच्या गजलांना चाली लावण्याचा काही संबंध नाही. उगीच वडाची साल पिंपळाला चिकटवत जाऊ नका.
चः आंद्याला म्हटलं होतं, सिसिलियन डिफेन्स वापरु नको. नाही ऐकलं त्यानं. म्हटलं, मर...
प्रा: भारत, त्यातल्या त्यात महाराष्ट्र, त्यातल्या त्यात कोल्हापूर म्हटलं की मला भरुन येतं. रंकाळा, अंबाबाईचं देऊळ, त्या कुस्त्या, तो उसाचा रस, ती काकवी... मग मी वॉलमार्टमध्ये शॉपिंगला जाते.

हे ठिकाणविनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

7 May 2010 - 10:17 am | जयंत कुलकर्णी

:-) :-) :D :D =))

बेसनलाडू's picture

7 May 2010 - 10:29 am | बेसनलाडू

काही खरडी वाचून "टंग-इन-चिक" स्वरूपाचे तर काही वाचून ठ्ठो करून हसलो. संगणकावर उडालेले ओटमिलचे काही शिंतोडे सुकायच्या नि पुसायच्या आधी हा प्रतिसाद टंकला तरच खरडींना न्याय दिल्यासारखे होईल, असे वाटून लगेच प्रतिसाद देत आहे.
(तत्पर)बेसनलाडू

सन्जोप राव's picture

7 May 2010 - 1:46 pm | सन्जोप राव

खात खात संगणक वापरणे यामुळे कीबोर्डवर टॉयलेट सीटपेक्षा अधिक जीवाणू असतात असे आजच वाचले....
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है

Nile's picture

7 May 2010 - 10:37 am | Nile

कुछ जम्या नहीं!

हाण च्यामारी म्हणावे तर दणके काही तितके दमदार नाहीत. हा हा हा करुन सभ्य हसावं तर तितकी सटलीटी नाही.

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 May 2010 - 1:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही काही ठिकाणी सटल्टी वाटली ..

अदिती

विजुभाऊ's picture

7 May 2010 - 8:04 pm | विजुभाऊ

सहमत...
जरा पत्ता चुकलाय
लेखनाचा प्रकार विडंबन या प्रकारात मोडतो म्हणावे की स्वतन्त्र चिंतन म्हणावे. त्यानुसार चिंतनास योग्य अथवा विडंबनास योग्य असा ठेवून वाचावे लागते. दोन्ही प्रकारे वाचून पाहिले
चिंतन म्हण्न वाचले तेंव्हा ते एक "मुद्दा हरलेले आणि हरवलेले विडंबन "वाटले.
विडंबन म्हणून वाचले तेंव्हा ते पत्ता चुकलेले ललीत वाटले.
गद्य म्हणून वाचले तर लय चुकलेले पण अर्थगर्भपूर्ण मुक्त पद्य वाटले
लेखाकाचा सर्व प्रकारच्या साहित्याशी गाढा परिचय असावा असे वाटते....
पण सरमिसळ झाल्यामुळे श्रीखंडात मटणाचा रश्श्याचा ठसकेबाज पणा , भेळेचा नटखटपणा , बिर्यानीचा रुबाब , शिकरणाचा साधेपणा , सत्यनारायणाच्या शिर्‍याचा सात्वीकपणा , लसणाच्या चटणीचा ठसकेबाजपणा मिक्स झाल्यासारखे वाटले.

विंजिनेर's picture

7 May 2010 - 1:29 pm | विंजिनेर

लोकप्रिय सदस्यांचा आंतरजालीय वावारातला वावर हा एक नित्य चिंतनाचा चविष्ट विषय असूनसुद्धा वरील लेख लवकर प्रसवण्याच्या घाईत बिघडला आहे असे वाटते.. पण मागल्या खेपेपेक्षा बरीच सुधारणा आहे.
असो. पुढील प्रयत्नांस शुभेच्छा.

वेताळ's picture

7 May 2010 - 10:52 am | वेताळ

=))
वि: आपले सर्व संपादकीय अधिकार काही काळापुरते काढून घेण्यात येत आहेत. संपूर्ण लोकशाही तत्वांवर चाललेल्या या संकेतस्थळावर फायनल शब्द माझाच आहे, हे ध्यानात ठेवावे.

पंधरा दिवसातुन एकदा तरी कुठे हि खरद वाचायला मिळतेच. :D
मस्तच लिहलय संजोपराव तुम्ही.
वेताळ

चिरोटा's picture

7 May 2010 - 11:08 am | चिरोटा

भारी!!
खरडवही तपासण्याकरिता काही क्रॉलर वगैरे उपलब्ध आहे का? नाहीतर मीच एक बनवतो!
भेंडी
P = NP

टारझन's picture

7 May 2010 - 11:20 am | टारझन

=)) =)) =))

पण, डिस्केमर्स ने भरपुर अपेक्षा वाढवल्या होत्या ;)

बाकी अजुन काही क्यारॅक्टर्स "अपेक्षित" होती =))

राघ: हल्ली आमचा लाईमलाईट कमी झालाय. कवितांचे क्लासेस काही चालले नाही , बिजणेस फ्लॉप गेला. लोकं तोंडावर कौतुक करून (आणि मागुन काड्या सारुन) गेली.. काय करु सल्ला द्या
शओ : तुमच्या नाडीला * लागला आहे. आणि तो अंमळ वाळला आहे , त्यामुळे नीट वाचता येत नाही तुम्ही घाटपांड्यांचा सल्ला घ्या.
प्रघा : आहो , तुमचे अकलेचे तारे पाहुन पुर्ण अंतरजाल कृतकृत्य झालंय , तुमचे तारे आम्ही काय बघणार ? आमच्याच्यान काही होणार नाही. जपाण्यांकडे जा.
यु : जगदंब जगदंब , जर "एका हाडळीची प्रतिमा" तुमच्या मागे लागली असती तर ठीक , मी माझी चड्डी देखील पणाला लावली असती , पण हा प्रश्ण खवीसांचा असल्याने आम्ही त्यांना सपोर्ट करू . तुम्ही मेनका गांधींकडे का नाही जात ? त्यांना नक्की तुमची दया येईल

- खोदेश खरडवही
(अजुन वेळ मिळाला तर अजुन लिहीन...)

Dhananjay Borgaonkar's picture

7 May 2010 - 2:03 pm | Dhananjay Borgaonkar

जगदंब जगदंब , जर "एका हाडळीची प्रतिमा" तुमच्या मागे लागली असती तर ठीक , मी माझी चड्डी देखील पणाला लावली असती

:D :D :)) :)) =)) =))

नावातकायआहे's picture

7 May 2010 - 2:12 pm | नावातकायआहे

>>मिभो: सुकांना त्यांच्या लेखांपेक्षा आपण सध्या कुठे आहोत, काय करत आहोत हे सांगण्यात अधिक रस आहे, असे दिसते. क्याथे प्यासिफिकच्या इकॉनॉमी क्लासमध्ये असलेले झुरळही बराच प्रवास करते म्हणावे! =)) =)) =)) =))

नितिन थत्ते's picture

7 May 2010 - 2:36 pm | नितिन थत्ते

जे म्हणजे कोण ते कळले नाही

नितिन थत्ते

इन्द्र्राज पवार's picture

7 May 2010 - 2:38 pm | इन्द्र्राज पवार

लै झकास लिख्ते भैसाब तुम ! हमरे कोल्हापुरकेच लग्ते हो बराबर ! हमारे ह्यँ कट्ट्या कट्ट्यापे रात कु सबी लोगा एस्याच बाता बोलत्यात और हसहसको टांगा (अपनी नही, दुसर्‍या की...) खेच्त्यात ! लयी मज्जा आतीया...क्या बोलनेका ! मैं आज शामकूच हमारे यहँ के सभी भाई लोगों को बोल्ता हुँ ...नेट पे ऐसा ऐसा कुच कुच चकोट किसीने लिख्या है कर के !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

बिपिन कार्यकर्ते's picture

7 May 2010 - 2:42 pm | बिपिन कार्यकर्ते

रावसाहेब... लेखाच्या आयड्येची कल्पना चांगली आहे. काही काही फटके एकदम पर्फेक्ट बसले आहेत. :)

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

7 May 2010 - 3:54 pm | घाटावरचे भट

सहमत!!

चित्रा's picture

7 May 2010 - 4:45 pm | चित्रा

चि.- आंतरजालावर वावरताना गेंड्याची कातडी हवी असे च. म्हणतात ते काही खोटे नाही. पण जनुकीय बदलांनी हे शक्य होईल का?

रासा - तुम्हा 'मद्दड', 'निर्बुद्ध' लोकांना काय समजते जनुकीय बदलांमधले? आणि हवेत कशाला जनुकीय बदल? ती कातडी कशी तयार करायची ते आमच्यावर सोडा - दर महिन्यात दोन खरडी, दोन लेख असे टाकू की ते वाचून कातडी हमखास दहा दिवसांत गेंड्याचीच झाली पाहिजे.

-----
चि. (मनातल्या मनात खरड- कोणाला करावी बरे?)* हा प्रतिसाद पुरेसा रंजक आहे का?

धमाल मुलगा's picture

7 May 2010 - 6:00 pm | धमाल मुलगा

=)) =)) =)) =)) =))

मजा आहे.
पण अंमळ हात राखुन लिहिलंय का हो? "दणदण्णीत की वो" असं नाही ना म्हणता येत. :)

बाकी, इथे धम्मकलाडू आयडी कोण दोघंजण वापरत होते त्याची आमच्या गुप्तहेरखात्यानं चोख माहिती पुरवली आहे बॉ आम्हाला. ;)

प्रभो's picture

7 May 2010 - 6:24 pm | प्रभो

मजा आहे.
पण अंमळ हात राखुन लिहिलंय का हो? "दणदण्णीत की वो" असं नाही ना म्हणता येत.

शुचि's picture

7 May 2010 - 6:32 pm | शुचि

कल्पकतेला १००% गुण.
मसुदा नीट कळला नाही कारण सगळ्यांचे स्वभाव अजून तसे माहीत झाले नाहीत.
काही खरडी ज्या कळल्या त्या फार विनोदी होत्या. : )
>>
(१) प्रदे: पांचाळे आजारी पडण्याचा आणि माझा त्यांच्या गजलांना चाली लावण्याचा काही संबंध नाही. उगीच वडाची साल पिंपळाला चिकटवत जाऊ नका.
(२) मिभो: सुकांना त्यांच्या लेखांपेक्षा आपण सध्या कुठे आहोत, काय करत आहोत हे सांगण्यात अधिक रस आहे, असे दिसते. क्याथे प्यासिफिकच्या इकॉनॉमी क्लासमध्ये असलेले झुरळही बराच प्रवास करते म्हणावे!
=)) =))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

llपुण्याचे पेशवेll's picture

7 May 2010 - 6:27 pm | llपुण्याचे पेशवेll

मूळ लेख आणि प्रतिसाद २न्ही रंजक आहेत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2010 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संकेतस्थळावरील सदस्यांवर लिहिण्याचा एक चांगला प्रयत्न. म्हणजे अशा लेखनाने बरी करमणूक होते.
प्रतिसादांनी कमाल उंची गाठली नाही तरी किमान वाचनसंख्या तरी वाढते, असे माझे मत आहे.

मायला या उपक्रमावर शायरीशिवाय प्रतिसाद देणं मुश्किल होऊन बसलं आहे बॉ!

च्यायला, हे मात्र शंभर टक्के खरं आहे. उपक्रमवर २०१० वर्ष सामान्य वकूब असलेल्यांसाठी न झेपणारं संस्थळ झालं आहे. त्यासाठी 'शेरोशायरी' आणि 'न लिहिलेल्या खरडी' सारखे उपक्रम चांगलेच म्हणावे लागतील. :)

हर एक बात पे कहते हो तुम, कि तू क्या है |
तुम्ही कहो, कि ये अन्दाज़ए-गुप्त़गू क्या है ||

अवांतर : बाय द वे, संकेतस्थळाच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम कुठपर्यंत आला हो ? ;)

-दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

7 May 2010 - 9:19 pm | ऋषिकेश

:)
आहे छान पण... झणझणीत झुणक्याची अपेक्षा होती.. तिथे रूचकर पण पिठलं निघालं
जरा अजून तडका चालला असता

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

सुधीर१३७'s picture

7 May 2010 - 10:42 pm | सुधीर१३७

... =)) :D :D =))

मुक्तसुनीत's picture

7 May 2010 - 11:07 pm | मुक्तसुनीत

मु: तात्या, तुझ्या संकेतस्थळावर शुद्धलेखनाचे एवढे काही नाही असे तू म्हणतोस. (तुझ्या भाषेत फाट्यावर मारतोस) पण सर्व उर्जा बलसंवर्धनात व्यय झाल्याने बुद्धीमांद्य आलेले वळू इथे सगळ्यालाच हरताळ फासत आहेत. या सगळ्याला तुझीही फूस असावी असा माझा कयास आहे. एका कानामात्रेने, एका अक्षराने, र्‍ह्स्वदीर्घाने काय फरक पडतो हे मी तुला सांगायला नको. 'धरावे' चे 'मारावे' होते. 'चिरदाह' चे 'चीरदाह' होते. 'सगेसोयरे' चे 'गेसोयरे' होते. तू याला कुठे तरी आवर घालावास एवढेच मला सुचवावेसे वाटते.

खि खि खि ;-)

मिसळभोक्ता's picture

8 May 2010 - 2:52 am | मिसळभोक्ता

पण सर्व उर्जा बलसंवर्धनात व्यय झाल्याने बुद्धीमांद्य आलेले वळू इथे सगळ्यालाच हरताळ फासत आहेत.

हे तर लय भारी !!!

जियो !!!

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)