जिंगल्स ते सिनेमा

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
7 May 2010 - 10:08 am

चला म्हणल आज डीएसके गप्पांना जाउ यात. डीएसकेंना मराठी मध्यमवर्ग-उच्चमध्यमवर्गाची नाडी अचुक सापडलीय म्हणुनच ते गेली १०-११ वर्ष सांस्कृतिक गप्पांचा महोत्सव करतात. चकटफु असल्याने आम्ही अर्थातच गेलो होतो. या वेळी सगीतकार अशोक पत्की यांच्याशी गप्पांनी पहिले पुष्प गुंफले."जिंगल्स ते सिनेमा' या गप्पांच्या कार्यक्रमात पत्की यांच्याशी राजेश दामले आणि मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला. वयाच्या पाच वर्षापासुन बॆंडवाल्यांचे आकर्षण असलेल्या अशोक पत्कींना आपल्यातील सुप्त गुणांची चाहुल लागली. नशीबाची व मित्रांची साथ मिळून तशा भीडस्त स्वभावाच्या पत्कींना आपल्या गुणांचे मार्केटिंग करताना झालेली गोची दिलखुलासपणे मांडली. ते योगायोगानेच संगित कार झाले.
पत्की म्हणाले, " गिरगाव येथे आमच्या घराशेजारीच सुधीर फडके हे "पेइंग गेस्ट' म्हणून राहत असत. आई दळण आणायला जाताना मला त्यांच्याकडे सोडायची. त्या वेळी त्यांच्या संगीताचे संस्कार माझ्यावर झाले. "सुमन कल्याणपूर यांचा पेटीवाला' ही माझी ओळख झाली. पुढे जितेंद्र अभिषेकी यांच्या सहवासात मला खूप शिकायला मिळाले. चित्रपट संगीत, नाट्य संगीत, मालिकांची टायटल सॉंग्ज, जिंगल यांसह "मोरूची मावशी', "ब्रह्मचारी' या नाटकांनी मला नाव दिले.''
"नाविका रे वारा वाहे रे" हे त्यांच पहिल गाण."केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर', अल्बम मधील स्वप्नील बांदोडकर चे "राधा ही बावरी', मोरुच्या मावशीतले "टांग टिंग टिंगा', "तू सप्तसूर माझे' यांसह विविध मालिकांची शीर्षकगीते आणि जिंगल अशा सादरीकरणातून कार्यक्रम खुलत गेला.गीतकार म्हणुन यश सांगताना त्यांनी डमी शब्दाला त्याचे श्रेय दिले. चाल समजुन सांगताता डाड डडा डा डा डा अशा शब्दांचा आधार संगीत काराला घ्यावा लागतो त्याला च जरा सुश्राव्य करताना त्यांच्यातील गीतकार जागा झाला. राधा ही बावरी ची नीर्मिती अशीच झाली. स्वप्नील बांदोडकरने आग्रह केला म्हणुन चक्क उर्दु पद्धतीने शब्द कागदावर मांडुन यमक जुळवत गीत तयार झाले.नंतर ते प्रवीण दवणेंकडुन तपासले आणि कुठलाही बदल न करता हे गीत तयार झाले.
चाल आधी कि शब्द आधी यावर ते म्हणाले दोन्ही प्रकारात ते काम करतात. चाल आधी या प्रकाराचे काही फायदे आहेत.
विविध कलाकारांबरोबर काम करताना आलेले अनुभव सांगताना पत्की म्हणाले, ""कलाकाराने केवळ पैशांसाठी काम करू नये. पैसे येतात आणि जातात, पण स्वतःला छान वाटते आणि आनंद मिळतो म्हणून आपण काम केले तर त्याचे समाधान चिरकाल राहते.'' कदाचित त्यांच्या चाळीस वर्षांच्या यशस्वी प्रवासाचे हेच गमक असावे.
सारेगम सारख्या संगीत स्पर्धात फायदा म्हणजे चंद्रपुर सारख्या ठिकाणच्या कलाकारांना देखील संधि मिळते. पण वाहिन्या या कलाकारांना २ वर्षे बांधुन घेतात.त्यांचा बहर ओसरल्यावर सोडुन देतात. रोहित राउत साठी त्यांनी झीला संपर्क केला होता. सुरवातीला टाळाटाळ केल्यावर नंतर करार असल्याचे सांगुन दिले नाही.
गप्पांच्या अखेरच्या भागात त्यांनी "वादळवाट', "मानसी' या मालिकांच्या शीर्षकगीतांबरोबरच १० ,२०, ३० सेकंदाच्या व एक मिनिटाच्या कालतुकड्यातील "झंडू बाम', "धारा' आणि "मिले सूर मेरा तुम्हारा' या जिंगलही सादर केल्या. जाहिरातीतील अर्थकारणात या कालतुकड्यांना फार मह्त्व असते.

सजन नयन नीत धार बरसती या भैरवीने शेवट झाला.आम्हाला संगीतातले ओ का ठो कळत नसलेल्यांना सुद्धा हा कार्यक्रम आम्हाला आनंद देउन गेला. दुचाकीवरुन घरी जाता जाता आमच्याही तोंडात ही भैरवी गुणगुणत होती.
अशोक पत्कींच्या संकेतस्थळाला जरुर भेट द्या.

संगीतबातमीमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

8 May 2010 - 1:41 am | शुचि

पत्कींच्या वाटचालीचा घेतलेला आढावा आवडला.

>>भीडस्त स्वभावाच्या पत्कींना आपल्या गुणांचे मार्केटिंग करताना झालेली गोची दिलखुलासपणे मांडला>>
असं होत असेल खरं भीडस्त व्यक्तींच्या बाबतीत. बरीच शिकस्त करावी लागत असेल ज्याला इंग्रजीत "स्टेपींग आउट ऑफ क्म्फर्ट झोन" म्हनतात तशा प्रकारची.

>>"कलाकाराने केवळ पैशांसाठी काम करू नये. पैसे येतात आणि जातात, पण स्वतःला छान वाटते आणि आनंद मिळतो म्हणून आपण काम केले तर त्याचे समाधान चिरकाल राहते.'' >> वाक्य खूप आवडलं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मदनबाण's picture

8 May 2010 - 9:24 am | मदनबाण

पकाका असेच वेगवेगळ्या कार्यक्रमांना जात रहा आणि हिथं वॄतांत लिहीत रहा... :)
वॄतांत आवडला... :)

मदनबाण.....

Life is God's novel. Let him write it.
ISAAC BASHEVIS SINGER

डॉ.श्रीराम दिवटे's picture

8 May 2010 - 9:30 am | डॉ.श्रीराम दिवटे

संगीतमय दुनियेचा हा वॄतांत आवडला..

चित्रा's picture

8 May 2010 - 10:24 pm | चित्रा

वृत्तांत (का वृत्तान्त) आवडला. भिडस्त स्वभावाच्या माणसाने जाहिरातीच्या क्षेत्रात काम करणे म्हणजे अवघडच झाले असेल. पण पत्कींनी छाप उमटवली.

अवांतर -मागे अ‍ॅलेक पदमसीबद्दल अशा जिंगल्स आणि जाहिरातींबद्दल बरेच ऐकले होते. तेव्हा असे लोक फार कमी मिळत म्हणून की काय होते त्यांची खूप चर्चा होई, आता बरेच तरूण-तरूणी वेगवेगळ्या जाहिराती/मॉडेलिंगच्या क्षेत्रात जात असतात त्यामुळे त्यांच्या बातम्या होत नसाव्यात.