मीटींगा

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
5 May 2010 - 12:18 pm

कार्यालयात चालणार्‍या मीटींगा हा एक फार गमतीदार प्रकार आहे. अर्थात यात विविध प्रकारची ज्ञानवाटणी सत्रे (नॉलेज-शेअरींग सेशन्स), दूरध्वनी मीटींगा (कॉल्स), एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आयोजित केलेली मेंदूवात सत्रे (म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स अर्थात मेंदूला वात आणणारी सत्रे) इत्यादी देखील ग्राह्य धरता येतात.

मला नेहमीच खूप लांबलेल्या मीटींगांमध्ये सगळ्यांना येते तशी झोप येत नाही पण कंटाळलेल्या सदस्यांचे निरीक्षण करण्यात खूप मजा वाटते. अर्थात मी देखील कंटाळलो असेल तरच! परवा पल्याडच्या (ऑनसाईट) एका ग्राहकराजाच्या (क्लायंट) बड्या व्यक्तीने पुढील प्रवासाची रुपरेखा आणि त्याबद्दलची माहिती (रोडमॅप) याबद्दल एक सत्र आयोजिले होते. कुठल्यातरी संकेतस्थळावर जाऊन मग त्याचा डेस्कटॉप बघता येणार होता आणि मग मीटींग सुरु होणार होती. आता दोन तास डोक्याला शॉट बसणार, लंचटाईम हुकणार, कॅन्टीनमध्ये काहीच शिल्लक राहणार नाही, मीटींगमध्ये मस्त झोप येणार पण झोपता नाही येणार वगैरे भाव घेऊन मंडळी दालनात दाखल होण्यास सुरुवात झाली. ठरलेल्या वेळेच्या १५ मिनिटांनंतर सगळी प्रकल्पप्रजा आली. गार-गार वातानुकुलीत दालनात ३५-४० टाळकी निरीच्छेने जमली होती. आमच्या मॅनेजरने त्याचा लॅपटॉप घेऊन त्याच्याशी कुस्ती सुरु केली. युजरनेम आणि पासवर्ड टाकून टाकून तो थकला पण त्या विशिष्ट संकेतस्थळावर जाऊन डेस्कटॉप बघण्याचे भाग्य अजून लाभत नव्हते. मॅनेजरच्या चेहर्‍यावर आधी उत्साह होता, हळू-हळू काळजी आणि मग संताप आणि नंतर 'मरू दे' असे भाव यायला लागले. त्याने बंगलुरुच्या टीमला सांगीतले की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि निवांत झाला. बर्‍याच खटपटीनंतर बंगलुरुच्या एका मॅनेजरने काहीतरी युक्ती सांगीतली आणि आमचा मॅनेजरचे यशस्वी लॉगीन (लगीन नव्हे) झाले. आनंदलेल्या प्रकल्पप्रजेच्या चेहर्‍यावरचे हसू मावळले आणि लगेच आम्लपित्त झाल्यावर जसे भाव येतात तसे भाव घेऊन मंडळी लक्षपूर्वक ऐकू लागली.

अर्धा तास उलटला असेल आणि नेहमी होते तसेच कंटाळा नावाच्या आगंतुकाने हळूच प्रवेश केला आणि आपला अंमल दाखविण्यास सुरुवात केली. मग जांभयांचे दणक्यात आगमन झाले आणि सगळे दालन जणू झोपायची तयारी करत आहे असे वातावरण निर्माण झाले. गार-गार हवा, कंटाळवाणे सेशन, पडद्यावरचे नीट दिसावे म्हणून केलेला अंधार असे झोप येण्यास उत्कृष्ट वातावरण तयार झाल्याने एका-दोघांनी हळूच आपापल्या खुर्च्या कोपर्‍यात सरकवल्या. कुणी मोबाईल काढून निरोपानिरोपीत मग्न झाले तर कुणी शुन्यात नजर लावून बसले. एक-दोन लेकरे (फ्रेशर्स) वहीत सगळे टिपून घ्यायचा प्रयत्न करत होती. मॅनेजरसमोर असे केल्याने आपल्याला फायदा होईल अशी भाबडी समजूत असावी बिचार्‍यांची. दस्तुरखुद्द मॅनेजर एक हात हनुवटीखाली घेऊन लक्षपूर्वक ऐकत असल्याचा अभिनय करण्यात मग्न होता. नंतर त्याला त्या अभिनयाचाही कंटाळा आला मग त्याने सरळ आपला मोबाईल काढला आणि त्यात डोके खुपसले. काही सराईत आपापसात हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजत होते आणि मध्येच दबक्या आवाजात हसत होते.

"...इन द नेक्स्ट रीलिज, वुई आर प्लॅनिंग टू इनक्लुड अ लॉट ऑफ न्यू फिचर्स दॅट वुड इनॅबल द युजर्स टू युज धिस प्रॉडक्ट ऑन अ‍ॅन एनटायरली डिफरंट लेवल्...इट वुड बी ए फॅण्टास्टीक युजर एक्स्पीरियन्स...सो वुई वाँट टू लेवरेज आवर अंडरस्टँडींग ऑफ..." अशी लठ्ठ कॉर्पोरेट शब्दांचा ठासून भरणा असलेली वाक्ये तो वक्ता लीलया फेकत होता. आमचा मॅनेजर मधूनच 'अनम्युट' करून 'ओके' चे तुणतुणे वाजवत होता. बाकीची प्रजा केव्हाच नैष्ठिक निद्रेत गेली होती. शेवटी कुणाला काही प्रश्न आहेत का असे विचारल्यावर एकदम शांतता पसरली. आमच्या मॅनेजरने तत्परतेने "नो क्वेश्चनस फ्रॉम पुणे टीम" असे जाहीर करून सुटकेचा निश्वास टाकला. कुणालाच काही प्रश्न पडले नसणार हे त्याने अंतर्ज्ञानाने जाणले होते बहुधा. सगळ्यांनी 'सुटलो बुवा एकदाचे' असे मनातल्या मनात म्हणत चपळाईने बाहेरची वाट धरली.

एकदा मला आमच्या प्रोजेक्टबद्दलची एक छोटी परंतु महत्वाची माहिती हवी होती. मी संबंधित व्यक्तीला एक ईमेल पाठवून ती माहिती देण्याविषयी विनंती केली. बराच वेळ उत्तर न आल्याने मी त्या व्यक्तीला फोन केला.
तो: आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली बिझी विथ द रीलीज वर्क, समीर. व्हाय डोंट यु फिक्स अ टाईम अँड सेंड अ मीटींग रिक्वेस्ट? अल्सो प्लीज कॉपी विनय (सीनियर मॅनेजर) ऑन द रिक्वेस्ट.
मी रिक्वेस्ट पाठवली आणि ठरलेल्या वेळेनुसार त्याला भेटायला गेलो.
तो: टेल मी, समीर.
मी: अ‍ॅज एक्स्प्लेन्ड इन माय ईमेल, आय नीड धिस पाथ फॉर द न्युली सपोर्टेड अप्प्लीकेशन सर्वर. आय नीड टू अपडेट द रीलीज नोट्स एकॉर्डिंगली.
तो: लेट्स गो टू अ रूम. आय विल आस्क सुनयना टू जॉईन.
आम्ही एका रूममध्ये जमतो.
तो: सुनयना, आय अंडरस्टँड धिस पाथ विल नीड टू बी चेंज्ड. कॅन यु टेल हीम द न्यू पाथ?
सुनयना: श्योर!
तो: ग्रेट! धिस सपोर्ट इज वेरी क्रुशल फॉर द न्यू क्लायंट. धिस विल हॅव अ मेजर इंपॅक्ट ऑन द सर्वर साईड काँन्फिगरेशन. अ‍ॅज यु नो, धिस विल अल्सो इंपॅक्ट द पाथ दॅट यु आर टॉकींग अबाऊट्...ब्ला...ब्ला...
मी: (मनात) हो रे बाबा, हे सगळं मला माहिती आहे; तुला तो पाथ माहित नाही ते सांग.
सुनयना: धिस इज द पाथ, समीर.
मी: थँक्स!

संध्याकाळी या हीरोने एक मोठा ईमेल विनयला पाठवला आणि त्यात मला कसा प्रॉब्लेम होता आणि त्याने तो किती आश्चर्यकारक रीतीने आणि गतीने सुनयनाच्या किरकोळ मदतीने सोडविला, त्यामुळे आपले काम किती सोपे झाले आहे वगैरे वर्णन छापून स्वतःची पाठ थोपटून घेतली. शेवटी काही प्रॉब्लेम आल्यास मला पुन्हा संपर्क करण्यात अजिबात हयगय करू नये असा धमकीवजा प्रेमळ आग्रह आणि विनंती वजा आज्ञा करून त्याने मला उपकृत करून ठेवले.

एकदा नेहमीच्या स्टेटस मीटींग मध्ये आमचा मॅनेजर (तनय) बसला होता. तो नेहमी बसलेलाच असतो. ऑनसाईट मॅनेजर (विनय) जो आमच्या मॅनेजरचा मॅनेजर आहे तो स्टेटस अपडेट घेत होता.
विनयः तनय, व्हाय धिस चेंज हॅज नॉट बीन पोर्टेड टू द न्यू रीलीज? व्हॉट शुड आय टेल द क्लायंट? धिस इज ग्रॉस नेग्लिजन्स ऑन युअर साईड.
तनयः नो विनय, आय मिन, विच चेंज आर यु टॉकिंग अबाउट?
विनयः द वन ऑन द टूल स्क्रीन. इट हॅज नॉट बीन चेंज्ड्...धिस शुड हॅव बीन कॅप्चर्ड इन द रीव्ह्यु.
तनयः नो विनय्...आय मिन येस विनय...आय विल लूक इन टू धिस इश्श्यू. व्हेन इज धिस स्क्रीन डिस्प्लेड? कॅन यु प्लीज टेल मी?
विनयः आय हॅड सेंट यु एन ईमेल अबाऊट धिस, तनय. यु डीड नॉट रीड इट ऑर व्हॉट?
तनयः येस विनय्...आय मिन्...व्हेन डीड यु सेंड धिस ईमेल, विनय?
विनयः लास्ट मॉर्निंग..चेक.
तनयः ओके, विनय. आय विल चेक.
थोडा वेळ अजून झापाझापी झाल्यावर आणि एक-दोन गोष्टींवर चर्चा झाल्यावर विनयने मोर्चा पुन्हा तनयकडे वळवला.
विनयः डीड यु गेट द ईमेल, तनय?
तनयः विच ईमेल, विनय?
विनयः ओह गॉड, अबाऊट द चेंज इन द स्क्रीन!!!!!!!
तनयः ओह दॅट वन! नो विनय, आय थॉट आय वुड चेक इट ऑफलाईन आफ्टर द कॉल...
विनयः नो, चेक इट नॉऊ.
तनयः श्योर, विनय.
थोडा वेळ झटापट केल्यावर तनय रडकुंडीला आला...
तनयः विनय, आय हॅड फॉरवर्डेड इट टू प्रणय्...आय विल कॉल हीम.
विनयः डीड यु चेक व्हॉट ही डीड अबाऊट इट?
तनयः अबाऊट व्हॉट, विनय? अबाऊट द चेंज?
विनयः लेट्स डिस्कस इट आफ्टर धिस कॉल, तनय. (बघतोच तुला, थांब!!!)
तनयः श्योर, विनय!
रीसीव्हर ठेऊन तनय आम्हाला म्हणाला:
तनयः क्या मुसीबत हैं यार...कौनसा ईमेल...कौनसा चेंज...भाड में जाने दो...चलो चाय पीने चलते हैं!!!!!

--समीर

नोकरीविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

5 May 2010 - 12:24 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ!!! तुम्ही आमच्या कुंपणीत आहात का हो? :D

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

6 May 2010 - 12:52 am | टारझन

कंपणी-कंपणीत मातीच्या मिटींगा =))

मस्त रे समीर !!

बाकी आमची "प्रोजेक्ट किक ऑफ" मीटिंग होती , त्यात आमचा बिहारी प्रोजेक्ट मॅनेजर चुकून "वी वील किक ऑफ द क्लायंट" म्हणुन गेला होता. आमच्या डिपार्टमेंट चा हेड , पासुन टारझन पर्यंत सगळेच खदाखदा हसत होतो , त्यात मी जरा विचीत्र आवाजात हसल्यानं त्या हास्यकल्लोळाला एक वेगळीच किणार लाभली ;)

- लगेच मेलपाठवी

चतुरंग's picture

6 May 2010 - 1:01 am | चतुरंग

जबरी रे!! इतकं सत्य असं सहजासहजी बोलल्यामुळे जामच मजा आली असणार!!! ;)

(लाईफ इज गुड!)चतुरंग

समीरसूर's picture

6 May 2010 - 9:52 am | समीरसूर

मजा असते मीटींगांमध्ये. एकदा मी 'वर्कराऊंड' या शब्दाऐवजी खूप वेळा 'टर्नअराऊंड' हा शब्द वापरत होतो मीटींग मध्ये आणि दर वेळेला मला एक जण 'वर्कअराऊंड' शब्द लगेच वापरून माझी चूक दुरुस्त करत होता. मी पण प्रत्येक दुरुस्तीच्या वेळेस 'येस येस्...वर्कअराऊंड..थँक्स' असे म्हणून पुढे सरकत होतो. :)

--समीर

समीरसूर's picture

6 May 2010 - 9:06 am | समीरसूर

कुंपणी? आमची पुण्यात, हिंजवडीत... :-)

धन्यवाद,
समीर

llपुण्याचे पेशवेll's picture

6 May 2010 - 11:51 am | llपुण्याचे पेशवेll

पुण्यात हिंजवडीत? आमची पण!
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

Pain's picture

5 May 2010 - 12:25 pm | Pain

हेहेहे :))

बद्दु's picture

5 May 2010 - 12:39 pm | बद्दु

वा..वा मजा आली वाचुन्..चालु द्या..

अमोल नागपूरकर's picture

5 May 2010 - 12:45 pm | अमोल नागपूरकर

meeting is an event where minutes are kept carefully but hours are lost !!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 May 2010 - 12:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त लिहीलं आहेत.

(कुंपणीबाहेरची आणि मिटींगफ्री) अदिती

श्रावण मोडक's picture

5 May 2010 - 12:56 pm | श्रावण मोडक

ग्रेट.

इंटरनेटस्नेही's picture

5 May 2010 - 1:30 pm | इंटरनेटस्नेही

व्वाव!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

रानी १३'s picture

5 May 2010 - 1:48 pm | रानी १३

भारीच!!!!!!!

कानडाऊ योगेशु's picture

5 May 2010 - 7:00 pm | कानडाऊ योगेशु

लेख फक्कड लिहिला आहे.
वाचुन जाम हसलो मी.!
तनय विनय सागा इज जस्ट टू हिलॅरियस!

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

विंजिनेर's picture

5 May 2010 - 7:18 pm | विंजिनेर

अरेरे... तनय विनय सारखे गिफ्टेट मॅन्येजर तुम्हाला लाभावे म्हणजे तुमचे नशीब भारीच की :(

समीरसूर's picture

6 May 2010 - 9:54 am | समीरसूर

विंजिनेर साहेब,

आमचे भाग्यच! फु़कट मनोरंजन, ते ही कंपनीच्या पैशात! ;-)

--समीर

चतुरंग's picture

5 May 2010 - 8:04 pm | चतुरंग

तुमची 'तविनय' कायदेभंगाची चळवळ आवडली! ;)
आम्ही फार पूर्वीच अशा एका मीटिंगचे काव्यात्म वर्णन केले होते तेही यानिमित्ताने आठवले! ;)

चतुरंग

धमाल मुलगा's picture

5 May 2010 - 8:12 pm | धमाल मुलगा

समीर, चांगलाच सूर मारलाय की द्येवा :)
एक नंबर पंचेस आहेत भौ. आवल्डं आपल्याला!

बाकी, ह्यावरुन पुन्हा एकदा 'आपला अभिजीत'च्या ग्रॅफिटीची आठवण झाली, "तुमच्याही ऑफिसात जोर कमी आणि बैठका जास्त अशीच अवस्था असते का?" :D

बाकी, अंमळ गडबडलेला असला तरी तो तनयचा स्टान्स आवडला आपल्याला :) 'भाड मे गया..चलो चाय पिने चलते है" :D

प्रियाली's picture

5 May 2010 - 9:44 pm | प्रियाली

माझ्या क्यूब शेजारी एक दिल्लीचा ऑनसाईट प्राणी बसतो. तो आमच्या प्रोजेक्टवर नाही त्यामुळे त्याच्याशी आमची फारशी ओळख नाही. तो रोज सकाळी हिंदीत कोणाला ना कोणाला झापत असतो.

माझ्या बाजूला बसणारी एक अमेरिकन तिला कंटेंट कळत नसल्याने मला एक दिवस विचारू लागली की "या माणसाचा काहीतरी जबरदस्त प्रॉब्लेम दिसतो. रोज इतके भांडण बहुधा तो आपल्या बायकोशीच करत असावा."

मी बेजार! मग तिला ऑफ शोर कसे, कोणत्या वेळात काम करते ते समजावून सांगितले. वर असेही ठोकून दिले की

"मोठमोठ्याने वार्तालाप करणे हा उत्तर भारतीयांचा गुण आहे. तो भांडतो आहे असा कृपया ग्रह करून घेऊ नकोस." ;)

पाषाणभेद's picture

6 May 2010 - 10:08 am | पाषाणभेद

बरे झाले तू 'उत्तर भारतीयांचा ' म्हटली. परस्पर काटा काढला की त्यांचा.

बाकी मिटींगा घेणार्‍यांपेक्शा मिटींगा देणारे हुशार पाहीजे तर कामे होतात अन अशी शक्यता फार कमी असते.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

राजेश घासकडवी's picture

5 May 2010 - 9:50 pm | राजेश घासकडवी

पथिकाला 'पाथ' दाखवण्यासाठी आंधळा माणूस 'सुनयनेची' मदत घेतो व स्वत:ला दूरदृष्टी असल्याची द्वाही फिरवतो ते आवडलं.

टारझन's picture

6 May 2010 - 12:58 am | टारझन

हाहाहा !! खरं आहे , अशी उरबडवी माणसं सगळीकडेच असतात =)) लोकं त्यान्ला इंग्रजीत सर (म्हराटीत गुर्जी का काय त्ये) असं तोंडदाखलं म्हणत्यात बरं =))

- पाथेश घासुनयनी

समीरसूर's picture

6 May 2010 - 9:59 am | समीरसूर

फारच सुंदर प्रतिक्रिया. आवडली. अर्थात सुनयना हे नाव ठेवण्यामागे असा माझा कुठलाही विचार नव्हता हे प्रांजळपणे कबूल करतो. ते अनावधानाने झाले आणि आपण त्यातला खुमासदार विनोद बाहेर काढला.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद!

वि. सू. नावे काल्पनिक आहेत.

--समीर

प्रभो's picture

5 May 2010 - 9:52 pm | प्रभो

लै भारी रे!!

प्राजु's picture

5 May 2010 - 10:44 pm | प्राजु

सॉल्लिड लिहिले आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

यशोधरा's picture

5 May 2010 - 11:09 pm | यशोधरा

:D झकास लिहिलय! काव आणतात मीटींगा!

अनामिक's picture

5 May 2010 - 11:20 pm | अनामिक

हा हा हा जबरदस्त!

-अनामिक

एक मीटिंग बिंगो नावाचा खेळ आहे. बिंगोसारखाच खेळायचा फक्त क्रमांकाऐवजी खास म्यानेजमेंटच्या तोंडात खेळणारे शब्द वापरायचे. जसे सिनर्जी, स्ट्रॅटेजिक फिट, प्याराडाईम, टच बेस, थिंक आउटसाईड बॉक्स, न्यू लेव्हल, टेक दॅट ऑफ लाईन, २४/७, प्रोअ‍ॅक्टिव, बॉटमलाईन, क्लायंट फोकस, विनविन, एम्पॉवर आणि तुमच्या कंपनीत रूढ झालेले अन्य बझवर्ड. तर अशा शब्दांची बिंगो कार्डे बनवून सहकार्‍यांना वाटा आणि मग खेळा बिंगो. वक्त्याचा प्रत्येक शब्द कानात तेल घालून ऐकला जाईल!
फक्त बिंगो लागल्यावर फार मोठ्ठ्याने आनंद व्यक्त करू नका नाहीतर बिंगोचे बिंग फुटायचे!

संदीप चित्रे's picture

6 May 2010 - 7:09 am | संदीप चित्रे

इज जस्ट दि पीपल अशाच अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे :)
लेख मस्तच झालाय.
व.पुं.नी लिहिल्याप्रमाणे ('अ‍ॅज यू राईट मोअर अँड मोअर पर्सनल, इट बिकम्स मोअर अँड मोअर युनिवर्सल'), सगळ्यांना हे अनुभव आपलेच वाटतायत त्यामुळे अजून मजा येतीय.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

समीरसूर's picture

6 May 2010 - 9:55 am | समीरसूर

चित्रे साहेब,

पटलं. पर्सनल इज युनिवर्सल्...ऑल्वेज!

--समीर

नीधप's picture

6 May 2010 - 10:04 am | नीधप

असं असतंय होय...
तरीच मला कळत नव्हतं प्रोड्यूसरला इतकं डिट्टेलवार समजावून देऊनही ते येडं पैसे द्यायला नाही का म्हणतंय.
ते पण तनय्,विनय कडनंच शिकलेलं दिसतंय मिटींग मिटींग खेळायला...
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

6 May 2010 - 11:32 am | नितिन थत्ते

लै भारी

मी एकदा मीटिंग झाल्यावर त्याचे इतिवृत्त बनवत होतो. मीटिंगमध्ये बसणार्‍या बहुतेकांना मीटिंग मध्ये काय ठरलं ते इतिवृत्त वाचल्याशिवाय कळत नाही. तर हे इतिवृत्त बनवत असताना बॉसचा फोन आला.
"काय करतोयस? कामात आहेस का?"
"हो, म्हणजे आवर्स ऑफ मीटिंग बनवतोय."
असे सांगून गार केला होता.

नितिन थत्ते