गादीखाली ढेकुणान्ची

अडगळ's picture
अडगळ in जे न देखे रवी...
3 May 2010 - 1:50 am

प्राजु यांची क्षमा मागुन ,
मूळ कविता
http://www.misalpav.com/node/2111

गादीखाली ढेकुणान्ची , तुरूतुरू हालचाल ,
कानी कपाळी ढेकूण , झोप पळाली समूळ |

चिरडता ढेकूणाला , जळे नाकातील केस,
खाज जरा मन्दावते , तोच डसला खवीस|

अश्या चपळ ढेकुणा , शोधण्याची धडपड ,
दडे फटीत जाऊन , झाला नजरेच्या आड|

निथळली रांग सारी , शहारला देह सारा ,
जरा उचलता गादी , कृष्णविश्वाचा पसारा |

ओघळले पटापटा , जणु मसुराची डाळ,
हलाहलाचे हे थेंब , काळ्या ठिणग्यांचा जाळ |

आसमंती फवारला , केरोसिनचा फवारा
ओले ढेकुण मरती , क्षण विजयाचा आला |

छातिवरी परि एक , जणु ऐकि माझे श्वास ,
माझे रक्त त्याच्या ठायी , कसा करु त्याचा घात ?

खाजवतो क्षणभर , आली करुणा दाटोनि,
ह्या विश्वाच्या पलंगी , आम्हा ढेकुणांच्या खाणी||

विडंबन

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

3 May 2010 - 3:06 am | राजेश घासकडवी

याला विडंबन म्हणू नये असं वाटतं. 'मूळ' कवितेपेक्षा ही खूपच सुंदर आहे. शेवटच्या दोन कडव्यांमुळे कवितेचा दर्जा एकदम उंचावला... कृष्णविश्वाचा पसारा, काळ्या ठिणग्यांचा जाळ व विश्वाच्या पलंगी एकदम छप्परफाड.

राजेश

टुकुल's picture

3 May 2010 - 3:41 pm | टुकुल

हेच म्हणतो..

--टुकुल

भूंगा's picture

3 May 2010 - 8:54 am | भूंगा

श्री. अडगळ
जरा स्प्ष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व.
ही कविता आपण नक्कीच आपल्या स्वानुभवावरून लिहिलीअसणार(आपल्या आडनावांमुळे तसे मला वाटले.)
कवितेची हीच एक खासियत त्यात कुठेतरी कवी त्याच्या मनात खदखद्णारे एखादे नागडे सत्य सहज सांगून जातो.
भुंगा

वेताळ's picture

3 May 2010 - 10:23 am | वेताळ

आवडली.

वेताळ

बरखा's picture

3 May 2010 - 11:41 am | बरखा

ओघळ्ले पटापटा,जणु मसुराची डाळ.
डोळ्या समोर चित्र उभे राहीले.छान....

धमाल मुलगा's picture

3 May 2010 - 4:23 pm | धमाल मुलगा

च्यायला...चार पाच वर्षांखाली ब्याचलर म्हणुन रहात होतो तेव्हा फ्लॅटमध्ये मरणाचे ढेकुण झाले होते ती भयानक आठवण ताजी झाली. :(

परिस्थिती, कवितेतल्यापेक्षाही गंभीर होती. पहाटे चार वाजता हापिसातुन घरी आलो की एक भिंत किमान शंभरदिडशे ढेकणांनी भरलेली असायची..मग सुरु व्हायचा तो बेगॉनचा धडाका.....दहा पंधरा मिनिटं ह्यातच गेल्यावर..पुढे झोपेची सगळी काशी झालेली...म्हणुन मग उजाडेपर्यंत पत्ते कुटत बसायचं..... :D

विजुभाऊ's picture

10 May 2010 - 6:19 pm | विजुभाऊ

जै ...........शन्वार पेठ, कस्बा पेठ.. पुणे दोन
( स. पेठेत ढेकूण फारसे नस्तात म्हणे हॅ हॅ हॅ)

शानबा५१२'s picture

3 May 2010 - 4:28 pm | शानबा५१२

छातिवरी परि एक , जणु ऐकि माझे श्वास ,
माझे रक्त त्याच्या ठायी , कसा करु त्याचा घात ?

:D

*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.

ऋषिकेश's picture

3 May 2010 - 5:23 pm | ऋषिकेश

काय बोलणार!! अप्रतिम !!!!
भारतात कधीही दिसलेदुद्धा नाहिता पण त्या अमेरिकेत गेल्यावर मात्र ह्या ढेकणांनी असाच छळला होता..

फारच भारी कविता *(हे विडंबन नसून स्वतंत्र व अधिक चांगली कविता आहे ह्या राजेश ह्यांच्या विचारांशी सहमत)
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 May 2010 - 5:32 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! जबरी कविता आहे.

छातिवरी परि एक , जणु ऐकि माझे श्वास ,
माझे रक्त त्याच्या ठायी , कसा करु त्याचा घात ?

अगदी स्टॉकहोम / हेलसिंकी सिन्ड्रोमच म्हणायचा की...

बिपिन कार्यकर्ते

मदनबाण's picture

10 May 2010 - 7:22 pm | मदनबाण

शॉलिट्ट्ट्ट्ट्ट... :D

मदनबाण.....

"When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams."
Dr Seuss

नरेश_'s picture

10 May 2010 - 8:40 pm | नरेश_

छातिवरी परि एक , जणु ऐकि माझे श्वास ,
माझे रक्त त्याच्या ठायी , कसा करु त्याचा घात ?

बोलूनचालून रक्ताची नाती ना? तोडू म्हणता तुटत नाहीत ;)

इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)

नरेश_'s picture

10 May 2010 - 8:45 pm | नरेश_

गादीखाली ढेकुणान्ची अडगळ असे चुकून वाचले.
ह.घ्या.

इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)

शुचि's picture

11 May 2010 - 1:21 am | शुचि

मसुराची उसळ नाही हो खाववणार : (
पण कविता खूप ईनोदी बर्का : )

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||