Mom, we are not naive

स्वाती२'s picture
स्वाती२ in जनातलं, मनातलं
30 Apr 2010 - 7:18 pm

आज राजेश घासकडवी यांचा स्त्री प्रतिमेवरील लेख वाचला आणि गेल्याच आठवड्यात घडलेला किस्सा आठवला.
माझा लेक . टीनएजर. एकिकडे शरीरात हार्मोन्सच थैमान, अपरिपक्व मेंदू, जोडिला मेडिया. दुसरीकडे मध्यमवर्गी संस्कार आणि झेप घ्यायला उत्सुक महत्वाकांक्षेचे पंख. काल परवा पर्यंत असलेली निखळ मैत्रीही काहिशी बदलू लागलेली. याच गोंधळात साधारण १३ व्या वर्षापासून त्याला हळू हळू मुलींना एक 'स्त्री' म्हणून, एक व्यक्ती म्हणून आदराने वागवणे, 'नकार' पचवणे वगैरे धडे देणे सुरु झाले. अधून मधून वाद व्हायचे पण तरी गाडी बर्‍यापैकी चालली होती.
सेकंड सेमिस्टरला माझ्या मुलाचे शाळेतील टाईमटेबल त्याच्या मित्रांपेक्षा खूपच वेगळे झाले. त्यामुळे लंचला इतर सर्व वरच्या वर्गातील मुले आणि हा एकटा ९ वीतला फ्रेशमन. सुदैवाने मित्राचा मोठा भाऊ त्याच लंच पिरियडला. याने त्याच्या पाया पडून, टेबलवरचे ट्रे उचलायच्या बोलीवर त्या टेबलवर वर्णी लावून घेतली. सगळी ज्युनिअर म्हणजे ११ वीची मुलंमुली. त्यात हे ध्यान. पण १५-२० दिवसात हा त्यांच्यात रुळला. पण हळू हळू त्याची भाषा बदलायला लागली. वाद वाढले. गेल्या आठवड्यात त्याने मलाच बावळटात काढलं.
गेल्या शनिवारी नेहमीप्रमाणे त्याच्या वायप्रेसच्या कामासाठी आम्ही इंडियानापोलिसला चाललो होतो. ही ५० मिनिटांची ड्राईव्ह माझ्यासाठी खूप मोलाची आहे. या ४५-५० मिनिटांमध्ये काय जादू आहे कुणास ठाऊक पण या प्रवासात तो खूप मोकळा, बिधास्त असतो. आम्ही खूप गप्पा मारतो. या गप्पांतून त्याचे जग दिसतं . या वेळीही अशाच गप्पा चालल्या होत्या.
बोलता बोलता तो म्हणाला, ' मॉम सॅली नी गेल्या शनिवारी टीप किती कमावली माहितेय?'
'किती?'
'६० बक्स'
'good for her. कुठे आहे कामाला?'
त्याने एका ब्रेकफास्ट चेनच नाव सांगितलं.
' she is very lucky. she is brunette,' लेकाने माहिती पुरवली.
'म्हणजे?'
'मॉम, ते फक्त brunette hire करतात. सॅलीनेच सांगितलं.'
'सॅली खूप हुषार आहे.' आपला लेक एका मुलीच्या बुद्धीमत्तेचं खुल्या मनाने कौतुक करतोय हे ऐकून मी मनातल्या मनात स्वतःला शाबासकी दिली. त्या आनंदात 'फक्त ब्रुनेट' हे शब्दही विसरले. पण दुसर्‍या क्षणी लेकाने माझा भ्रम दूर केला.
'सॅली काय करते माहितेय? She always dresses properly and makes sure she bends properly when she brings their order. She said it always works.'
'देवा!' याला माझा लेक हुषार म्हणत होता. माझ्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. माझे बोलणे तोडत लेक थंडपणे म्हणाला,' Mom, we are not naive. Everybody knows that sex sales.'

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

II विकास II's picture

30 Apr 2010 - 7:34 pm | II विकास II

प्रतिसाद सवडीने देईल. आता घाईत आहे.
बाकीच्या लोकांचे प्रतिसाद पहायला उत्सुक.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

मुक्तसुनीत's picture

30 Apr 2010 - 7:54 pm | मुक्तसुनीत

फारच रोचक अनुभव. उत्तम पद्धतीने लिहिलेला.

मुलांच्या वाढीच्या प्रत्येक मुक्कामामध्ये मुलांना जितके समजत असेल अशी आपली कल्पना असते त्यापेक्षा कितीतरी जास्त समजत असते. त्यांच्याबद्दलचा अंदाज बांधताना आपंण आपल्या वाढीची वर्षे कशी विसरतो कोण जाणे.

मात्र, १४ -१५ वर्षांच्या मुलीने (तुमचा मुलगा ९वी मधे आहे असे धरतो. त्यादृष्टीने त्याच्या मैत्रीणीच्या वयाचा अंदाज बांधला) रेस्टॉरंट मधे नोकरी करताना जाणीवपूर्वक शरीरप्रदर्शन करावे वगैरे गोष्टी वाचून जो मानसिक त्रास व्हायचा तो झालाच.

विकास's picture

30 Apr 2010 - 8:39 pm | विकास

फारच रोचक अनुभव. उत्तम पद्धतीने लिहिलेला...मात्र, १४ -१५ वर्षांच्या मुलीने (तुमचा मुलगा ९वी मधे आहे असे धरतो. त्यादृष्टीने त्याच्या मैत्रीणीच्या वयाचा अंदाज बांधला) रेस्टॉरंट मधे नोकरी करताना जाणीवपूर्वक शरीरप्रदर्शन करावे वगैरे गोष्टी वाचून जो मानसिक त्रास व्हायचा तो झालाच.

सहमत.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मेघवेडा's picture

30 Apr 2010 - 9:14 pm | मेघवेडा

>> १४ -१५ वर्षांच्या मुलीने जाणीवपूर्वक शरीरप्रदर्शन करावे वगैरे गोष्टी वाचून जो मानसिक त्रास व्हायचा तो झालाच.

आपल्याला भारतीय संस्कृतीत या सगळ्या गोष्टींची सवय नसल्याने मानसिक त्रास व्हायचाच! अमेरिका काय इंग्लंड काय ऑस्ट्रेलिया का सगळीकडे या गोष्टीं कॅज्युअली घेतल्या जातात त्याला आपण काय करणार? मी जेव्हा इथं नवीन आलो होतो तेव्हा अशा बर्‍याच गोष्टी धक्कादायक वाटल्या होत्या. पण या लोकांची मानसिकताच अशी आहे हे कळल्यावर आता काही धक्कादायक वाटत नाही.

असाच एक किस्सा सांगतो. एकदा बसमधून कुठेतरी जात होतो. चार मुली (९वी-१०वी तील असाव्यात) स्कूल युनिफॉर्ममध्ये उभ्या होत्या. सगळ्यांच्या हातात सिगरेट - मला बसलेला पहिला धक्का. शिगारेटी विझवून त्या बस मध्ये चढल्या. माझ्या पुढल्या दोन सीटवर दोघी दोघी बसल्या. मला त्यांच्या गप्पा व्यवस्थित ऐकू येत होत्या. त्यांचा चाललेला संवाद हा मला बसलेला दुसरा धक्का होता:

पः "जेस, आय अ‍ॅम टेलिंग यू.. ही इज क्रॅप.."
दु: "आय बेट ही'ज नॉट.. लूक्स सो हॉट.. शुड बी बेटर दॅन मॅट.. डेफिनिटली.. मॅट इज अ रियल लूजर.. डझण्ट इव्हन नो टू किस प्रॉपर्ली.."
पः "बट अ‍ॅल इज द वर्स्ट फक आय हॅव एक्सपीरियन्स्ड एव्हर.. इफ यू वॉण्ट अ स्टिक अ‍ॅण्ड नॉट अ रॉड देन गो अहेड..."
सगळ्या: "हॅहॅहॅ...."

तिचं ते शेवटचं वाक्य ऐकून मी अक्षरशः चक्रावून गेलो. या इतक्या लहान वयाच्या मुलींचे चर्चेचे हे विषय?? त्या दोन मिनिटांनी मला बराच विचार करण्यास प्रवृत्त केले होते. पण समाजात हीच शिकवण त्यांना मिळते, त्यांना काय दोष देणार?

(आजकाल ही स्थिती भारतातही आढळते म्हटल्यास मला आश्चर्य वाटणार नाही अजिबात.)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

टारझन's picture

1 May 2010 - 8:42 pm | टारझन

हाहाहा =))
बाकी आम्ही एकदा ऑनसाईट गेलो होतो :) तिकडे पहिल्याच दिवशी क्लायंट हॉटेलात घेऊन गेले. थोड्या वेळाने एक सुंदरी डायरेक्ट मांडीवर ? क्षणभर चक्राउन गेलो ... पण क्लायंट लोकं एकदम नॉर्मल होती , आम्ही लगेच सावरुन घेतलं आणि परिस्थितीचा लुत्फ घेतला हॅहॅहॅ :)

आश्चर्य, मनस्ताप ह्या गोष्टी आश्चर्यकारक वाटतात हल्ली :)

भोचक's picture

30 Apr 2010 - 8:12 pm | भोचक

बापरे. कठीण आहे. परवा टिव्हीवर 'नेमक' किसींग सीन अचानक लागला. मग उगाचच आमची चुळबूळ झाली. माझी साडेचार वर्षीय लेक म्हणाली, 'बाबा, गालावर ओठ टेकतात, त्याला 'लव्ह यू मच' म्हणतात! मी अवाक.
(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

भडकमकर मास्तर's picture

30 Apr 2010 - 11:47 pm | भडकमकर मास्तर

गालावर ओठ टेकतात, त्याला 'लव्ह यू मच' म्हणतात!

आय्डिआ भारी आहे.... गालावर ओठ टेकताना असाच आवाज होत असावा.. ;)

जर नोकरी साठी शरीर प्रदर्शन करावे लागत असेल तर हे अतीच होतेय असे वाटते.
वेताळ

Dhananjay Borgaonkar's picture

30 Apr 2010 - 8:41 pm | Dhananjay Borgaonkar

छे छे.........अमेरिका सारख्या प्रगत देशात

आहो साहेब अमेरीकेत सुद्धा माणसच रहातात. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

स्वातीताई आता पर्यंत असे अनुभव इकडुन तिकडुन ऐकले होते.
आज खुद्द मिपा वर ऐकायला मिळाला.

पण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात असे अनुभव (वयात आलेल्या मुलांच्या विधानांचे) बर्‍याच भारतीयांना येतच असतीलच नाही का?

पण आता यात त्यांना तरी का दोष द्यायचा.आजुबाजुच्या परीस्थीतीनुसारच मुलं घडतात.

काही बर्षात असे अनुभव भारतात सुद्धा ऐकायला मिळतील.

जयंत कुलकर्णी's picture

30 Apr 2010 - 8:49 pm | जयंत कुलकर्णी

सेक्स सेल्स याचा अर्थ लक्षात घ्या... both the sex sales. आता तुम्हाला या विषयी लिहावेसे वाटले कारण मला वाटते, तुमच्यावर आपले मध्यमवर्गीय संस्कार झाले असावेत. आता तुम्ही जर USA मधे याच संस्काराची अपेक्षा करत असाल तर ते आत्ता त्याच्या या वयात चूक आहे. Genetics वर जर आपला विश्वास असेल तर (माझा आहे) मला खात्री आहे त्याला थोडे मोठे झाल्यावर आणि जर तेव्हा त्याला आपल्या संस्कृती बद्दल सांगितले तर कदाचित त्याचे मत बदलेल. आत्ता त्याला सांगून काहिच फायदा नाही. त्याला ते पटणार नाही. जरा maturity आल्यावर मात्र निश्चितच पटेल. अर्थात त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर !

आगाऊ सल्ल्याबद्दल आपली माफी मागतो.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

अरुंधती's picture

30 Apr 2010 - 9:07 pm | अरुंधती

स्वाती, तू खूप मोकळेपणाने हा अनुभव शेअर केला आहेस!
माझा मध्यंतरी माझ्या अमेरिकेतील मावसबहिणीशी [तिचा स्वतःचा लेकही आता टीन-एजर झालाय] ह्याच गोष्टींवरून संवाद झाला होता. ती म्हणाली, तेथील मुलांचे शाळेतील, बाहेरचे जग इतके वेगळे आहे की आपल्या भारतीय संस्कारांच्या मनाला ते चटकन झेपत नाही. पण ते स्वीकारणे तर अपरिहार्य आहे, कारण मुलांना त्याच जगात मोठं व्हायचंय, स्वतःचं अस्तित्त्व सिध्द करायचंय आणि त्यासाठी संघर्षही करायचाय.... ती म्हणाली, इथली मुलं भारतातील मुलांच्या मानाने खूप लवकर शारीरिक दृष्ट्या मॅच्युअर होतात, बहुसांस्कृतिक वातावरणात वावरतात, लवकर बोल्ड होतात, पक्की व्यवहारी असतात. त्यांना काही शिकवायला गेलं की आपल्यालाच धडे मिळतात. त्यांच्यावर कोणती जबरदस्ती करूनही चालत नाही.
त्यापेक्षा त्यांना घरात असताना भरपूर आधार देणे, शक्य तिथे भारतीय संस्कारांशी त्यांची नाळ जोडण्याचा प्रयत्न करणे, त्यांचे मनोबल उत्तम राहील ह्याची काळजी घेणे, जरुर तिथे मदत करणे, शिस्तीच्या बाबतीत ठाम राहाणे व त्यांच्याशी कायम दुतर्फी संवाद ठेवून त्यांची मते, विचार, दृष्टीकोन जाणणे अशाच गोष्टी हातात असतात. आणि सर्वात शेवटी, परस्परांमध्ये कितीही वाद झाले तरी आपले पालक आपल्यावर प्रेम करतात आणि आपली कोणतीही चुकीची गोष्ट ते खपवून घेणार नाहीत हा विश्वास त्यांच्या मनात जागता ठेवणे हे महत्त्वाचे!

तुझ्या मुलाने वास्तव पाहिलंय व स्वीकारलंय.... पण त्याला, जगात ''सेल'' होण्यासाठी तोच एकमेव पर्याय नाही, इतर सन्मान्य व व्यक्तिविकास घडवून आणणारे अन्य पर्यायही उपलब्ध आहेत ह्याची जाणीवही व्हायला हवी.... :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रभो's picture

30 Apr 2010 - 11:36 pm | प्रभो

स्वातीताई, तुझ्या मुलाने वास्तव पाहिलंय व स्वीकारलंय.... पण त्याला, जगात ''सेल'' होण्यासाठी तोच एकमेव पर्याय नाही, इतर सन्मान्य व व्यक्तिविकास घडवून आणणारे अन्य पर्यायही उपलब्ध आहेत ह्याची जाणीवही व्हायला हवी....

शुचि's picture

30 Apr 2010 - 9:15 pm | शुचि

मी पाहीलेल्या रेस्टॉरंट्समधे मुली अतिशय "प्रेझेंटेबल" असतात, तरुण, प्रसन्न असतात. व्यक्तीमत्व मोहक आणि प्रोफेशनल असते.
"हुटर्स" वगैरे मधे "स्तनांमधील घळ (क्लीव्हेज) वगैरे दाखवत असावेत. तेथे कधी गेले नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

धमाल मुलगा's picture

30 Apr 2010 - 9:47 pm | धमाल मुलगा

उघड्या डोळ्यांनी पाहुन मान्य करायचं की डोळे गच्च मिटून घेऊन "नाही नाही...आजच्या काळात असं काही नाहीच्च" अशी स्वतःची वेडी समजुत घालत बसायचं ते ज्याचं त्यानं ठरवायचं. मात्र त्यामुळे १४-१५ वर्षांच्या लहानग्यांच्याही तोंडुन येणारं "Everybody knows that sex sales" हे कटु सत्य काही बदलत नाही. (भले Sales करणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष...)

अमेरिका असो, युरोप असो - तिथल्या लैंगिकतेबाबतच्या मोकळ्या वातावरणामुळे उघडपणे ह्या गोष्टी बोलल्या जातात्/केल्या जातात, भारतासारख्या देशांमध्ये शरीरसंबंध, त्यातुनही पुन्हा लग्नाशिवायचे ह्याबद्दल नसलेला सांस्कृतिक मोकळेपणा अशा बाबी ना उघडपणे बोलण्यास धजाऊ देतो, ना मान्य करु देतो.

स्वाती२,
चांगला अनुभव इथे आम्हाला सांगितलात. धन्यवाद.

@अरुंधती,
उत्तम प्रतिसाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Apr 2010 - 10:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धम्या, हे मान्य करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. थोड्या फार प्रमाणात या गोष्टी सगळीकडेच चालतात, चालणार. जे थांबवता येणार नाही त्याला सामोरं जाण्याची तयारी करणं हे जास्त महत्त्वाचं आणि व्यवहार्य! आज पाश्चिमात्य देशांमधे आहे, उद्या आपल्याकडे होणार आहे.
अरुंधतीताईंनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला आहे. मुलांपासून गोष्टी लपवण्यापेक्षा त्यांना नीट समजावून सांगणं, मुलांशी संवाद असलेलाच उत्तम!

अदिती

राजेश घासकडवी's picture

1 May 2010 - 6:03 am | राजेश घासकडवी

उत्तम अनुभव... मुलांशी इतके मोकळपणाचे संबंध राखण्याबद्दल अभिनंदन.
मला लेखातला 'नाईव्ह' हा शब्द आवडला. तो १५ वर्षाच्या मुलाच्या तोंडून आला म्हणून अधिकच धारदार होतो. संस्कृतीने घातलेली बंधनं, त्यासाठी उभे केलेले 'दाउ शाल्ट नॉट'चे बागुलबोवे, हे बेगडी असतात हे तरुण पीढीला उमगणारं सत्य तीच पीढी मोठी झाल्यानंतर विसरते का?

१४ व्या वर्षाच्या मुली असल्या चर्चा करतात हे आपल्याला अब्रह्मण्यम वाटतं. पण जेव्हा संस्कृती नव्हती तेव्हा १५-१६ व्या वर्षी मुलं होत असत. त्या काळाकडे जावं असं मी म्हणत नाही. संस्कृती आणि संस्कार यांची बंधनं बाजूला केली तर लैंगिक वर्तणुक काय होईल? किंवा खरं तर लैंगिक प्रेरणा, हार्मोन्सचं थैमान वगैरे लक्षात घेतलं तर आदर्श वागणूक काय असायला हवी? त्यानुसार संस्कार काय असले पाहिजेत हे ठरावं असं वाटतं.

'सेक्स सेल्स'चं दुसरं अंग म्हणजे वेश्याव्यवसाय. तो समाजाची 'गरज' म्हणून मानला गेलेला आहे. एका बाजूने संस्काराच्या दबावाखाली ऊर्मी दाबून ठेवायच्या, मग त्या दुसरीकडून उफाळून बाहेर येतात म्हणून त्या भागवण्यासाठी वेश्याव्यवसायासारख्या यंत्रणेचं समर्थन करायचं... हे प्रतिगामी वाटतं.

बंधनांची आवश्यकता, केवळ त्याच वयात शिक्षण पूर्ण करून घेण्याची गरज एवढ्याच (काहीशा तकलादू) कारणाने जस्टीफाय करता येते. एकंदरीतच लैंगिक कृतीकडे नीती-अनीतीच्या चष्म्यातून बघणं कमी व्हावं असं वाटतं.

श्रावण मोडक's picture

30 Apr 2010 - 11:15 pm | श्रावण मोडक

वेल, हे वाचल्यानंतर तुमचा याआधीचा एक लेख आठवला. त्यानिमित्तानं समर जॉब आणि इतरही एक लेख नजरेखालून पुन्हा गेला.
पालकत्वातील आव्हानं तुम्ही हुकुमतीनं मांडताहात हे ध्यानी येतंय. म्हणून एक सुचवतो - एक लेखमाला करा अशा अनुभवांची. लेखन म्हटलं की काही तरी भव्यदिव्य अशी काही कल्पना असण्याची गरज नाही, अशा - एरवी साध्या वाटणाऱ्या, पण मनोगतांतून पुरेशा व्यक्त होणाऱ्या - लेखनातून हा अत्यंत गंभीर आणि विलक्षण संवेदनशील, नाजूक विषय चांगला हाताळला जातो आहे. म्हणून ही लेखमाला व्हावी.

भडकमकर मास्तर's picture

30 Apr 2010 - 11:51 pm | भडकमकर मास्तर

सहमत.. लेखमाला व्हावी असे मलाही वाटते...
आणि वरचा अरुंधती यांचा प्रतिसादही पटला...

धनंजय's picture

2 May 2010 - 11:41 pm | धनंजय

मोलाचे अनुभव आहेत.

शरीरसौष्ठवाला बाजारभाव असतो, तसा अन्य गुणांनाही बाजारभाव असतो, यश मिळते, हे तुमच्या मुलाला कळते आहे. भोळेपणा नसून हे चांगले संस्कार आहेत.

लेखमाला बनवा ++ सहमत.

इंटरनेटस्नेही's picture

3 May 2010 - 1:15 am | इंटरनेटस्नेही

मोकळेपणाने मांडलेला चांगला विषय...
लेखमाला यावी असे मलाही वाटते... +++ सहमत.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

वाहीदा's picture

1 May 2010 - 12:09 am | वाहीदा

स्वाती लेखातील तुझे शेवटचे वाक्य बरेच काही सांगून गेलं....
But sex is not the only thing which sells your own caliber
also sales and gives better bucks, better currency !
पण हे आपल्या सारख्या भारतीय संस्कारांच्या मनाला पटते , तिथे born and brought up झालेल्या मुलांना सांगितले तर वेडयातच काढतात .

आता तर इथेही हळू हळू हीच परिस्थिती आहे .. एकदा तर माझ्या मावस भावाच्या मुलीनेही (तिचे वय अवघे १७) मला असाच भलता सलता प्रश्न विचारला होता अन मी नाही म्हंटल्यावर तिने मला सऱळ सरळ "Oh Phuphi, you are so damn Conservative Phuphi (आत्या)" म्हणून हिणविले होते. मी ही तिला ठोपरा पासून नमस्कार केला होता. भावाला सांगायची माझी हिंम्मत ही नव्हती .

जमाना बदल रहा है और क्या कहें ?? :-(
अरुंधती ,प्रतिसाद अगदी योग्य अन हा तर खालील सल्ला तर अगदी लाजवाब
परस्परांमध्ये कितीही वाद झाले तरी आपले पालक आपल्यावर प्रेम करतात आणि आपली कोणतीही चुकीची गोष्ट ते खपवून घेणार नाहीत हा विश्वास त्यांच्या मनात जागता ठेवणे हे महत्त्वाचे!

~ वाहीदा

गोगोल's picture

1 May 2010 - 12:38 am | गोगोल

तिथल्या अ तुकडीतली पोर पोरि पण अशीच असतात क देव जाणे.

चतुरंग's picture

1 May 2010 - 4:13 am | चतुरंग

आपल्या मुला-मुलींचे पौगंडावस्थेतील संक्रमण हा आई-बापांसाठी नेहेमीच नाजूक आणि संवेदनशील असा जिव्हाळ्याचा विषय असतो.
तुम्ही वर्णन केलेला अनुभव हा त्या वयातल्या मुलांचा प्रातिनिधिक म्हणता येईल असा आहे.
आपल्यापाशी एक स्त्री म्हणून 'काही वेगळे' आहे आणि त्या जोरावर आपण फायदा करुन घेऊ शकतो ही जाणीव त्या मुलीला होणे हे फार वावगे वाटत नाही. सध्याच्या काळात वावरताना जे आजूबाजूला दिसते, समाजात नजरेला पडते त्यामागचे अर्थ समजण्या इतकी अक्कल नसली तरी काय झाल्यावर काय होते हा कार्यकारण भाव समजण्याइतपत जाण आलेली असते.
तसेच १५-१६ वर्षाची मुले नुकतीच व्यायाम करायला लागलेली असली तर शरीर थोडे आकार धारण करु लागलेले असते त्या वेळी समवयस्क मुलींवर 'इंप' मारायचा प्रयत्न असतो! हे ही सेलिंगच आहे जे अजाणतेपणी होते.
बर्‍याचदा करुन बघायचे इतकाच उद्देश असू शकतो. त्यावर एकदम तुटून न पडता तो विषय हाताळणे कौशल्याचे काम आहे. वरती अरुंधतीताईंनी लिहिले आहे त्याप्रमाणे संवाद साधत राहणे हे फार महत्त्वाचे. आपण कोणताही अनुभव आपल्या आई-वडिलांपाशी बोलू शकतो ही भावनिक सुरक्षितता सर्वात महत्त्वाची, ती तुमच्या मुलाला मिळाली आहे असे दिसते कारण त्याशिवाय तो हे बोलला नसता!
(खुद के साथ बातां : रंगा, घोडा मैदान जवळ आहे! :SS :T )

चतुरंग

प्रियाली's picture

1 May 2010 - 7:04 am | प्रियाली

आणि उपयुक्तही.

चित्रा's picture

1 May 2010 - 8:23 am | चित्रा

पौगंडावस्थेतील आणि तरूण नवीन मिसरूड फुटलेल्या मुलांना आईशी (किंवा काही मोठ्या व्यक्तींशी) बोलताना मोकळेपणा असला तरी काही प्रमाणात आईला जरासे छळण्याची (चांगल्या अर्थी, वाईट अर्थी नाही) सुप्त इच्छा (!) असते, तसे थोडे असावे. म्हणजे जरासे वेगळे बोलायचे वागायचे, आईची कितपत चलबिचल होते ते बघायचे असे काहीतरी.. तुमच्या मुलाला सॅली करते ते बरोबर आहे असे वाटत नसावे - तो तसे म्हणत असला तरी. (अर्थात हे झाले माझे मत).

मुलगा मोकळेपणाने बोलतो आहे ह्यातच बरेच काही आले.

स्वाती२'s picture

1 May 2010 - 5:47 pm | स्वाती२

सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद. आमच्याकडे कुठलाही विषय टॅबू धरला जात नाही. तसेच एखाद्या गोष्टी बाबत वाद घालणे हेही संवादाचाच भाग म्हणुन गृहित धरले गेलेले. त्यामुळे लेक बिंधास हुज्जत घालतो. कुणीतरी शाळेत सांगितलेला नॉनव्हेज सांगत मला कोथिंबिर निवडायला मदतही करतो.या किश्शातली मुलगी ११वीतली. त्याच्या लंचटेबलवरची. इथे मुलं १४-१५ व्या वर्षापासून काम करायला लागतात. बहुतेक कामं minimum wage वाली. त्यामुळे एकंदरीतच जळजळीत वास्तवाशी परिचयही फार लवकर होतो.माझा मुलगा ज्या गोष्टीला हुषारी समजत होता तिच गोष्ट माझ्यासाठी 'कसला हा आगीशी खेळ' या सदरात मोडणारी. माझ्यासाठी हे वर्तन नैतिक दृष्ट्या चुकीचे होतेच पण त्याही पेक्षा त्या मुलीच्या सुरक्षिततेबद्दल काळजी होती. बरोबरीच्या मुला मुलींनी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी केलेले प्रयत्न वेगळे आणि हे असं वागणे वेगळे. स्वतःला ही मुलगी कितीही स्मार्ट समजत असली तरी ३०-६० वयाच्या अनुभवी पुरुषांसमोर तिचा कितपत निभाव लागेल हा मला पडलेला प्रश्न मुलाला नव्हता. त्यांच्या दृष्टीने ती असे उल्लू बनवू शकते एवढेच महत्त्वाचे होते. नैतिकतेच्या बाबतीत एकंदरीतच त्याचे विचार -'हा ज्याचा त्याचा स्वतःचा चॉईस.'

वेताळ's picture

1 May 2010 - 6:08 pm | वेताळ

भारतात लहान मुलाकडुन काम करवुन घेतले तर बाल मजुर म्हणुन त्यांचे शोषण केले जाते असा आरोप पाश्चिमात्य राष्ट्रांकडुन केला जातो. मग अमेरिकेत शाळेतील मुलांकडुन काम करवुन घेतले जाते ते ह्या वर्गवारीत का मोडत नाही?

वेताळ

स्वाती२'s picture

2 May 2010 - 1:21 am | स्वाती२

अमेरिकेत शाळकरी मुलांना काम करण्यासाठी परमिट लागते. प्रत्येक राज्याच्या लेबर डिपार्टमेंट मधे चाईल्ड लेबर साठी खास वेगळा ब्युरो असतो. त्यांच्या नियमात बसेल त्याच प्रकारचे काम करता येते. किती तास काम करता येइल याचेही नियम असतात. ते काटेकोरपणे पाळले जातात.
http://www.in.gov/dol/childlabor.htm या आमच्या राज्याच्या संकेतस्थळाला भेट दिल्यास तुम्हाला साधारण कल्पना येइल.

प्रियाली's picture

2 May 2010 - 3:20 am | प्रियाली

स्वाती यांनी उत्तर दिले आहेच पण त्यात थोडी भर. अमेरिकेत मुलांनी कोणती कामे करावीत, कोणत्या वयात करावीत आणि ती किती तास करावीत याचे कायदे आहेत. काही कामांसाठी त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग घ्यावे लागते किंवा प्रशस्तीपत्रकही दिले जाते. जसे, बेबी सिटिंग. आपल्या वयाला शोभणारी आणि पेलणारी कामेच मुले करू शकतात. यांत, कॅफेटेरियामध्ये काम, बेबीसिटींग, काउंटरवर बॅगा भरून देणे, बिल करून देणे, साफसफाई वगैरे कामे आहेत. पुन्हा ही कामे मुले आपल्या आवडी किंवा गरजेनुसार स्वतः निवडतात. पालकांच्या किंवा इतरांच्या दबावामुळे मुले त्यांना न झेपणारी कामे निवडतात असे होत नाही. याचबरोबर, कामाचा मोबदला मुले स्वतःच्या खर्चासाठी वापरतात. भारताप्रमाणे काम करून घेतल्यावर त्यांचे पैसे लुबाडणारे आई-बाप, मुकादम किंवा दादा नसतो.

तसेच, अभ्यासाचे तास बुडवून मुलांनी ही कामे करावी असा रिवाजही नसतो. शाळेतील विद्यार्थी उन्हाळी सुट्टीत कामे करतात किंवा विकेन्डला एखाद्याचे गवत कापून दे, कार धुवून दे अशी कामे करतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यशिष्ट कॅम्पसमध्ये नोकरी मिळते आणि विशिष्ट तास भरले की पुढे काम करण्याची मुभा नसते.

हे असे काम करण्याने मुलांना पैशाचे महत्त्व कळते, त्यांचा वेळ टवाळक्या करण्यापेक्षा चांगल्या कामी व्यतीत होतो आणि बाहेरच्या जगाचा त्यांना अनुभवही येतो.

अप्पा जोगळेकर's picture

2 May 2010 - 10:12 am | अप्पा जोगळेकर

काही कामांसाठी त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग घ्यावे लागते
- वाकण्याचंसुद्धा ट्रेनिंग देत असतील.

प्रियाली ताई , अमेरिकेचं फार कौतुक की हो तुम्हाला.

Pain's picture

2 May 2010 - 1:46 pm | Pain

प्रियाली ताई , अमेरिकेचं फार कौतुक की हो तुम्हाला.

त्यान्नी वस्तुस्थिती सान्गितली आहे. कौतुक कुठे दिसले ?

प्रियाली's picture

2 May 2010 - 5:06 pm | प्रियाली

जे चांगलं आहे त्याचं कौतुक असावं. वाकण्याचं ट्रेनिंग देत असतील असे वाटत नाही. खवचटपणा करण्याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं होतं का शाळेत? तसंच हं!

बिपिन कार्यकर्ते's picture

2 May 2010 - 5:18 pm | बिपिन कार्यकर्ते

जे चांगलं आहे त्याचं कौतुक असावं.

अगदी अगदी. सौ टके की बात. पण जाऊ द्या हो... असो.

बाकी वाकण्यात काय एवढं वाईट आहे ब्वॉ, अप्पासाहेब? बर्‍याच वेळा माणसाला वाकावं लागतंच की... आणि आपल्या भारतोय संस्कृतीमधेतर योग्य ठिकाणी, योग्य माणसांसमोर वाकण्याला खूपच महत्व आहे. तेव्हा वाकण्याचं ट्रेनिंग देऊन थोडीफार का होईना भारतिय संस्कृतीच्या जवळ माणसं येत आहेत हे चांगलं की...

बिपिन कार्यकर्ते

इंटरनेटस्नेही's picture

3 May 2010 - 1:20 am | इंटरनेटस्नेही

सहमत... उठसुठ अमेरिकेवर तोंड सुख घेण्यापेक्षा आपल्या महान देशात काय दिवे लागलेत ते बघणं आवश्यक आहे!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

टारझन's picture

3 May 2010 - 3:38 pm | टारझन

कोण हुशार म्हणाला की , आपला देश महाण आहे ?
=)) =)) =)) =)) आपला देश गहाण आहे असं म्हणायचं असेल बहुदा !!

पण आटोपशीर लोकसंख्या असलेल्या देशात राबवायला सोपी जात असेल. भारता सारख्या देशात जर मुलाना अश्या पध्दतीने काम द्यायचे म्हटले तर शक्य होणे वाटत नाही.

वेताळ

अरुंधती's picture

2 May 2010 - 5:04 pm | अरुंधती

माझ्या माहितीप्रमाणे काही शहरांमध्ये ''कमवा व शिका'' योजना काही संस्थांमार्फत चालते. उदा: पुण्यातील विद्यार्थी सहायक समिती. येथे गरजू महाविद्यालयीन ग्रामीण विद्यार्थ्यांची रहायची, जेवायची व शिक्षण खर्चाची सवलतीच्या दरात सोय होते, शिवाय मुलांना खर्चात हातमिळवणी करण्यासाठी संस्थेच्या मार्फत त्यांना नागरिक/संस्थांकडे काम देण्यात येते. कामाचे वेतन संस्थेने ठरविल्याप्रमाणे असते. कामाचे स्वरूप : लेखनिक, मदतनीस, संगणक ऑपरेटर - अर्धवेळ/ ताशी.

परंतु अशा संस्था व काम यांची संख्या मर्यादित आहे.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रियाली's picture

2 May 2010 - 5:09 pm | प्रियाली

भारतात आपल्या मुलांना पद्धत लावावी. म्हणजे तारुण्यात प्रवेश करणार्‍या मुलांना सुट्टीत बाजारातून भाजी आणणे, गाडी पुसून देणे, बिले भरून देणे (भारतात अद्यापही सर्व ऑनलाईन होत नसेल असे वाटते) वगैरे वगैरे अशी अनेक कामे करता येतील. त्याचा मोबदला मिळाला की मुलांना शेजारच्यांची कामे करून देतोस का असे विचारावे. अशी कामे लोक आनंदाने देतील असे वाटते.

अशी पद्धत रुजू झाली की ट्रेनिंग देणार्‍या संस्थाही येतील. ;)

वेताळ's picture

2 May 2010 - 5:20 pm | वेताळ

पण आलल्याकडे आपली सामाजिक प्रतिष्ठा आड येते.आपल्या कडे एकादा सधन घरचा पोरगा जर अशी कामे करु लागला तर लोक त्याच्या कडे कौतुकाने न बघता सहानुभुतीने बघतात.त्याना वाटते अरेरे एकदम अशी कशी परिस्थिती पालटली ह्याची. :D
वेताळ

बिपिन कार्यकर्ते's picture

2 May 2010 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते

खरे आहे... पण अशी पद्धत यावी आपल्याकडे.

बिपिन कार्यकर्ते

प्रियाली's picture

2 May 2010 - 5:47 pm | प्रियाली

तुमचेही खरेच आहे आणिही एक गोष्ट प्रतिसाद लिहिल्यावर माझ्या डोक्यात आली.

बंड्याने शेजारच्या काकूंना सांगितले की "काकू, तुमची बाजारहाट मी करून येईन. मला वीस रू. मोबदला दिला तर."

यावर काकू म्हणतील, "मेल्या बंड्या, काकू म्हणतोस आणि मोबदला मागतोस? लहानपणी कितीवेळा माझी साडी ओली केली होतीस. मी मागितला होता का मोबदला तुझ्या आयशीकडे?"

बंड्या बिचारा गारद! ;)

टारझन's picture

2 May 2010 - 6:06 pm | टारझन

लहानपणी कितीवेळा माझी साडी ओली केली होतीस

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=))
धण्य आहेत बंडोबा ;) आणि धण्य आहे किस्सा !! आणि धण्य आहेत काकु !!!

- (एक्स 'बंड्या' आणि हल्ली चा 'खंड्या') टारझन

विशाल कुलकर्णी's picture

3 May 2010 - 5:33 pm | विशाल कुलकर्णी

प्रियालीतै =))

बंड्या बिचारा स्वतःच्याच थोबाडीत मारुन घेइल...
करशील पातळं ओली ? >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

नितिन थत्ते's picture

3 May 2010 - 2:33 pm | नितिन थत्ते

१४ ते १८ वयातल्या मुलांनी काम केले तर त्याला बालमजुरी म्हणत नाहीत बहुधा. भारतात तरी फॅक्टरी अ‍ॅक्टात अशी तरतूद आहे.

नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर's picture

2 May 2010 - 9:48 am | अप्पा जोगळेकर

एकदा अमेरिकेत राहायचं म्हटल्यावर या गोष्टी ओघाने येत असाव्यात असा अंदाज आहे. 'नमस्ते लंडन' सिनेमा आठवला. डॉलरमधे पैसे तर हवेत, कायम वास्तव्य तर अमेरिकेत करायचे आहे पण मुलांवर संस्कार मात्र शुद्ध भारतीय हे अजब वाटते. एकदा एखादी गोष्ट आपली मानली की त्याबाबतीतल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी स्वीकारल्याच पाहिजेत. आणि जिथे आपल्याला समृद्धी, संपत्ती मिळाली त्या भूमीबद्दल आपलेपणा वाटलाच पाहिजे. या घटनेमुळे जर आश्चर्य वाटले (भारतीय मूळ असल्यामुळे) तर ते समजण्यासारखे आहे. पण जर तक्रारीचा सूर असेल तर तो मात्र पटण्यासारखा नाही.

बंधनांची आवश्यकता, केवळ त्याच वयात शिक्षण पूर्ण करून घेण्याची गरज एवढ्याच (काहीशा तकलादू) कारणाने जस्टीफाय करता येते.

याचा अर्थ संस्कृती , विवाहसंस्था या ज्या गोष्टी माणसाने तयार केल्या आहेत त्यांना काहीच अर्थ नाही का? जनावरं असंस्कॄत असतात, बौद्धिक विकासाच्या खालच्या पायरीवर असतात त्यामुळे ती फक्त नैसर्गिक प्रेरणांनुसार वागतात. मी चुकत नसेन तर समागम करताना जनावरे फक्त नर्-मादी हा भेद पाळतात. आई,बाप, भाऊ, बहीण वगैरे बंधनं ते पाळत नाहीत. अशा पद्धतीने माणसाने वागू नये, निकोप संतती निर्माण व्हावी, समाज ऑर्गनाईझ्ड पद्धतीने चालावा, समागमाबाबत बळजबरी होऊ नये (ती तरीदेखील बर्‍याचदा होते) याकरता देखील बंधनं आवश्यक आहेत. प्रदेश बदलला की ही बंधनं कमी-अधिक प्रमाणात बदलतात पण अशी बंधनं स्वतःवर घालून घेणं हीदेखील मनुष्यप्राण्याची नैसर्गिक प्रेरणा असली पाहिजे. किंवा ते माणसाचा बौद्धिक, भावनिक विकास झाल्याचं एक व्यवच्छेदक लक्षण मानलं पाहिजे. माणूस कालपरत्वे अधिकाधिक विकसित होत चालला आहे. विज्ञानाने सिद्ध झालेल्या नवनवीन गोष्टी आणि परिस्थितीचे ताण यांच्यामुळे जुन्या धार्मिक श्रद्धा, परंपरा उध्वस्त करत करतच ही विकासाची प्रक्रिया पुढे जात असते. पण हे होत असताना विज्ञानाधिष्ठित, समाजशास्त्राधिष्ठित असे नविन पायंडे , नविन परंपरा तयार झालेच पाहिजेत. पण जे पाहतो, ऐकतो आणि वाचतो त्यावरुन असं वाटतं की अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेचा विपर्यास केला गेला आहे. त्यामुळे परंपरा, नियम, बंधनं ह्या संज्ञा अमेरिकन लोकांना मान्य नसाव्यात. पण त्यांना मान्य असो अथवा नसो हे असंच चालू राहिलं तर आणखीन दोनशे वर्षांनी तिथेदेखील परिस्थितीचे असे काही ताणतणाव निर्माण होतील की त्यांनादेखील स्वतःवर बंधनं घालून घेणं आवश्यक वाटू लागेल. हा अनुभव वाचून मला 'जावे त्यांच्या देशा' मधला पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेलं 'एक बेपत्ता देश' आठवला.

मुक्तसुनीत's picture

2 May 2010 - 10:04 am | मुक्तसुनीत

हा वरचा प्रतिसाद मोठा रोचक आहे. परंतु मूळ विषयाशी त्याचा काय संबंध आहे ते मला कळले नाही बॉ.

II विकास II's picture

2 May 2010 - 11:34 am | II विकास II

>>हा वरचा प्रतिसाद मोठा रोचक आहे.
+१
>>परंतु मूळ विषयाशी त्याचा काय संबंध आहे ते मला कळले नाही बॉ.
+०.५
पहीला परीच्छेद मुळ लेखात घडलेल्या घटनेच्या मागची अपरिहार्यता व्यक्तता करणारा वाटला. सगळेच फायदे नसतात, कधी कधी तोटे पण असतात, ते सुध्दा स्वीकारावे लागतात.
जसे 'You can't make an omelette without breaking eggs'

दुसरा परीच्छेद मात्र मुळ विषयापासुन बराच लांब वाटला.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

Pain's picture

2 May 2010 - 1:50 pm | Pain

डॉलरमधे पैसे तर हवेत, कायम वास्तव्य तर अमेरिकेत करायचे आहे पण मुलांवर संस्कार मात्र शुद्ध भारतीय हे अजब वाटते.

अजब काय ? प्रत्येक सन्चातिल स्वतःच्या मनाने सर्वोत्तम निवडण्याची प्रव्रुत्ती स्वाभाविक आणि चान्गली आहे.

अप्पा जोगळेकर's picture

3 May 2010 - 7:13 am | अप्पा जोगळेकर

अजब काय ? प्रत्येक सन्चातिल स्वतःच्या मनाने सर्वोत्तम निवडण्याची प्रव्रुत्ती स्वाभाविक आणि चान्गली आहे.

ते स्वाभाविक असेल पण ते बरोबर नाही. प्रत्येक स्वाभाविक गोष्ट बरोबर असते असं मानण्याचं काय कारण ? ज्याला धूम्रपानाची सवय असते त्याच्यासाठी सिगरेट पिण्याची इच्छा होणं हीदेखील एक स्वाभाविक गोष्ट असते पण ती बरोबर गोष्ट नसते. बरोबर गोष्ट ही असते की आपण चूक करतो आहोत याची जाणीव होणं.

स्वाती२'s picture

3 May 2010 - 5:00 am | स्वाती२

>>एकदा अमेरिकेत राहायचं म्हटल्यावर या गोष्टी ओघाने येत असाव्यात असा अंदाज आहे. 'नमस्ते लंडन' सिनेमा आठवला. डॉलरमधे पैसे तर हवेत, कायम वास्तव्य तर अमेरिकेत करायचे आहे पण मुलांवर संस्कार मात्र शुद्ध भारतीय हे अजब वाटते. एकदा एखादी गोष्ट आपली मानली की त्याबाबतीतल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी स्वीकारल्याच पाहिजेत. आणि जिथे आपल्याला समृद्धी, संपत्ती मिळाली त्या भूमीबद्दल आपलेपणा वाटलाच पाहिजे. या घटनेमुळे जर आश्चर्य वाटले (भारतीय मूळ असल्यामुळे) तर ते समजण्यासारखे आहे. पण जर तक्रारीचा सूर असेल तर तो मात्र पटण्यासारखा नाही.>>
माझ्यामते ज्याला आपण family values म्हणतो त्या सगळीकडे सारख्याच असतात. त्यात भारतिय, अमेरिकन असे काही नसते. आपली मुले चांगली शिकावित, कष्टाळू असावित, त्यांना कसली व्यसने लागू नयेत म्हणुन सगळेच पालक धडपडतात. आपल्या मुलांना १६ व्या वर्षी लग्नाशिवाय मुलं व्हावीत, आपली मुलगी डेट रेपची शिकार व्हावी असे कुठल्या आईबापांना वाटेल? तेव्हा चांगले संस्कार करायचा प्रयत्न सगळेच आईबाप करतात. शेवटी आईवडिलांची माया सगळीकडे सारखीच. झाल्या प्रकाराबद्दल आश्चर्य वाटले का? तर याचे उत्तर नाही. तक्रारीचा तर प्रश्नच उद्भवत नाही. लेकाला 'मोठं' करताना आलेला एक अनुभव इथे मांडावासा वाटला इतकेच. राहिता राहिला प्रश्न आपलेपणाचा. तो तर वाटतोच. म्हणूनच माझ्या गावातल्या त्या मुलीबद्दल काळजी वाटली.

अप्पा जोगळेकर's picture

3 May 2010 - 7:16 am | अप्पा जोगळेकर

लेकाला 'मोठं' करताना आलेला एक अनुभव इथे मांडावासा वाटला इतकेच.
हे छान केलंत.

समंजस's picture

3 May 2010 - 1:52 pm | समंजस

अनुभव छान मांडलाय स्वातीतै!!
तुमच्या लेकाच्या बोलण्यातून जरी एकंदरीत बेफिकीरपणा वाटत असला तरी तो स्वतः मात्र तसा नाहीय हे जाणवतंय.

'sex sales' हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे!!! वयानुरुप त्याला आता हे कळायला लागलंय आणि त्याने हे त्याच्या पद्धतीने सांगितलंय एवढचं !! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2010 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुभव मांडल्याबद्दल धन्यु....!

>>>आपली मुले चांगली शिकावित, कष्टाळू असावित, त्यांना कसली व्यसने लागू नयेत म्हणुन सगळेच पालक धडपडतात.

अगदी खरं आहे...! आपली भावनाही लक्षात येते.

भारतीय म्हणून 'संस्कार' नावाच्या अनेक गोष्टी रक्तात भिनलेल्या आहेत. काही वेगळं वाचलं की, अरेरे...! असे स्वर बाहेर पडतात. आपल्या परंपरेने इतके बारीक सारीक गोष्टींचे संस्कार केले आहेत की विचारु नका. आता सोडा हो, त्या संस्कार बिंस्काराच्या गोष्टी. जग आधुनिक होत आहे, त्याचे बोट धरुन चालले पाहिजे, असेही वाटते. पण मग पुन्हा प्रश्न पडतो की आपण अशा आधुनिकीकरणाने कुठे जाणार आहोत. म्हणून या अनुभवाच्या निमित्तानं हा प्रतिसादही बराच बोलका वाटला.

-दिलीप बिरुटे

Dipankar's picture

3 May 2010 - 8:12 pm | Dipankar

भारतातही sex sales' हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे फरक येवढाच आहे भारतात नोकरी करुन पैसे मिळवायचे वय हे जास्त आहे अमेरिकेत लोक लहान वयातच पैसे मिळवतात त्यामुळे ते सत्य त्यांना लवकर कळते