थरारक अनुभव: अकस्मात...!!

वसंत वडाळकर_मालेगांव's picture
वसंत वडाळकर_मालेगांव in जनातलं, मनातलं
27 Apr 2010 - 4:39 pm

दि. ७ मे. १९८०.
आम्ही तिघेजण. दुपारची वेळ.
राजदूत गाडीवरून मालेगांव- चाळीसगांव मार्गावर प्रवास करत होतो.
गप्पा मारत हळू हळू जात होतो.
दरेगांव फाटा आला. तेथे आम्ही चहा-फराळ केला.
चार वाजले होते.
एकजण म्हणाला- "आता उतरते ऊन्ह आहे. त्यापेक्षा आपण ५ वाजता निघू."
गप्पा मारत आम्ही वेळ काढत होतो. गिरणा डॅमवर मित्राच्या मित्राकडे जेवाअला जायचे होते.
मालेगांव ते दरेगांव फाटा मी मध्ये बसलो होतो. मागे माझा मित्र बसला होता. पुढे मित्राचा मित्र गाडी चालवत होता.
दरेगांव फाट्यावर आमचा बसणाचा क्रम बदलला. मी मागे बसलो. माझा मित्र मध्ये बसला. आणि मित्राचा मित्र गाडी चालवत होता....
***
साधारणत: ८-१० किलोमीटर आम्ही गेलो असू तोच माझ्या मित्राच्या अंगावर ३-४ फूट लांबीचा नाग पडला.
वर पहातो तर घार घिरट्या घालत होती. तीच्या पायातून तो निसटून मित्राच्या अंगावर पडला व क्षणात मित्राच्या हाताचा चावा घेतला.
कारण साप चवताळलेला होता.
आम्ही गाडी थांबवली. गाडीखालीच सापाला मारले. तो नाग जहरी होता, विषारी होता.
***
आम्ही मित्राला घेवून परत मालेगांव ला गेलो. मित्र पार घाबरून गेला होता. त्याला धीर देत देत आम्ही दवाखान्यात पोचलो.
आम्ही घडलेली हकीकत डॉक्टरांना सांगितली.
नाग चावलेला हात दाखवला. त्यावर सूज आली होती.
मित्राची शुद्ध हरपत चालली होती.
"डॉक्टर, तुम्ही लवकर इलाज करा"
डॉक्टरांनी सलाईनमध्ये अ‍ॅण्टीव्हेनमलर टाकली.
सलाईनची अर्धी बाटली संपली असेल नसेल तोच मित्राला रक्ताची उलटी झाली.
आम्ही हतबल झालो. थोड्यावेळाने आचक देत मित्र देवाघरी गेला.
आमच्या दु:खाला पारावार राहीला नाही.
कित्येक दिवस मी सुन्न मनस्थितीत होतो....
***
मालेगांव ते दरेगांव फाटा मी मध्ये बसलो होतो. मागे माझा मित्र बसला होता. पुढे मित्राचा मित्र गाडी चालवत होता.
नंतर आम्ही क्रम बदलला. मित्राचे मरण विधिलिखित होते म्हणून क्रम कदाचित बदलला गेला....
मध्ये मी असतो तर...???
आजही ते आठवून शहारे येतात.
अघटीत घटना- वरून साप पडणे...
काळ कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही....
हा प्रसंग मला आजही तसाच आठवतो आणि जन्मभर आठवत राहील....
-- श्री. वसंत जनार्दन वडाळकर, मालेगांव कॅम्प, (रिटायर्ड- सहाय्यक पशुधन विकास अधिकारी)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मी_ओंकार's picture

27 Apr 2010 - 4:46 pm | मी_ओंकार

फायनल डेस्टीनेशन आठवला.

वारा's picture

27 Apr 2010 - 5:00 pm | वारा

वाचुन शहारे आलेत..

प्रमोद देव's picture

27 Apr 2010 - 5:13 pm | प्रमोद देव

जाणार्‍याला कुणीही रोखू शकत नाही..हेच खरं

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Apr 2010 - 12:31 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो....

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

27 Apr 2010 - 6:46 pm | रेवती

बापरे!
कसला विचित्र प्रसंग!
तुम्ही वाचलात ते चांगले झाले.
आपल्या मित्राबद्दल वाईट वाटले.

रेवती

प्रमोद देव's picture

28 Apr 2010 - 12:38 pm | प्रमोद देव

रेवतीतै...सापरे म्हणा!
वाह उस्ताद नही...वाह ताज बोलिये च्या चालीवर. :D

भोचक's picture

27 Apr 2010 - 7:24 pm | भोचक

बापरे. खतरनाक प्रसंग.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

प्राजु's picture

27 Apr 2010 - 7:49 pm | प्राजु

आई गं!
भयंकर आहे घटना..
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

संदीप चित्रे's picture

27 Apr 2010 - 8:23 pm | संदीप चित्रे

काळ कधी आणि कसा येईल सांगता येत नाही हेच खरं.
जेफ्री आर्चरच्या पुस्तकातील फक्त एक पानी पण थरारक कथा आठवली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2010 - 8:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>काळ कधी आणि कसा येईल सांगता येत नाही हेच खरं.
सहमत...!

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2010 - 9:02 pm | कानडाऊ योगेशु

घारीच्या पंजातुन साप निसटुन पडणे आणि त्यामुळे मृत्यु एखाद्याचा मृत्यु होणे ही गोष्ट फक्त पंचतंत्रातल्या एका कथेतच वाचली होती.
खरेच असे घडु शकते ह्यावर विश्वास बसु शकत नाही.
मृत्यु एखाद्याला अचानक कसा गाठेल काही सांगता येत नाही हेच खरे.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

योगी९००'s picture

27 Apr 2010 - 9:11 pm | योगी९००

वाचून अंगावर काटा आला.. खरोखर दुर्दैव तुमच्या मित्राचे..!!!

गरक्ष,यम आणि छोट्या पक्षाची कथा आठवली.

नाग चावलेला हात दाखवला. त्यावर सूज आली होती.
मित्राची शुद्ध हरपत चालली होती.
प्राथमिक उपचार नाही केलेत काय? कदाचित ८० साली साप चावल्यावर प्राथमिक उपचार काय करावेत हे माहीत नसावे किंवा तुम्ही सर्वजण अचानक आलेल्या संकटाने घाबरला असावेत.

एक नक्की वाटले की त्यादिवशी तुम्ही केलेल्या दिनक्रमात समजा २/३ मिनिटे जरी फरक झाला असता तर तुमचा मित्र वाचला असता.

खादाडमाऊ

टुकुल's picture

27 Apr 2010 - 9:14 pm | टुकुल

>>>एक नक्की वाटले की त्यादिवशी तुम्ही केलेल्या दिनक्रमात समजा २/३ मिनिटे जरी फरक झाला असता तर तुमचा मित्र वाचला असता. <<<
पुर्ण लेख वाचुन सुध्दा तुम्ही "जर, तर" बोलत आहात याचे नवल वाटते.

--टुकुल

योगी९००'s picture

27 Apr 2010 - 10:37 pm | योगी९००

पुर्ण लेख वाचुन सुध्दा तुम्ही "जर, तर" बोलत आहात याचे नवल वाटते.
मग काय बिघडले? मला जे वाटले ते मी लिहीले..!!

खादाडमाऊ

दिपाली पाटिल's picture

27 Apr 2010 - 9:28 pm | दिपाली पाटिल

बापरे...चांगलं झालं-वाईट झालं म्हणता येणार नाही...

दिपाली :)

शुचि's picture

27 Apr 2010 - 11:00 pm | शुचि

वाईट वाटलं ऐकून.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

डावखुरा's picture

28 Apr 2010 - 12:14 am | डावखुरा

प्राथमिक उपचार झाले असते तर कदाचित तो मित्र आपल्यात असता...
पण जे झाले ते वाईटच.....
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

Pain's picture

28 Apr 2010 - 2:19 am | Pain

बाप रे.
चान्गल्या लोकान्नाच का सगळे त्रास ?

इंटरनेटस्नेही's picture

28 Apr 2010 - 3:51 am | इंटरनेटस्नेही

छान लेख आहे.... तुमच्या लेखावरुन फायनल डेस्टिनेशन या चित्रपटाची आठवण झाली...

--
इंटरनेटप्रेमी.

रानी १३'s picture

28 Apr 2010 - 3:12 pm | रानी १३

तुमचा लेख वाचुन पुराणातिल एक गोस्ट आठवली.......तक्षक अअणि एक राजा....नीट आठवत नाही आता.....पन वेळ कोनाल चुकत नाही.हेच खरे