प्रेरणा : !!चारोळ्या!!
तुझी आठवण येते तेव्हा
तु पाठवलेल्या खरडी वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
मिरे खिश्यात टाकून मग स्वतःवरच हसतो..
*******************
मागणार्याची चंची कुठेतरी हरविली
मागणारा व्याकुळतेने तडफड्ला
चंची मागूनही नाही मिळाली
मग मागणार्याने तंबाखू सोडली..
आपला आंबोळी
प्रतिक्रिया
23 Apr 2010 - 12:24 pm | मराठमोळा
पहिली जमेश!!
:)
दुसरी काही आवडली नाही बॉ.. :(
बघा काही बदल करता येतोय का.. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
23 Apr 2010 - 1:47 pm | राजेश घासकडवी
असंच म्हणतो.
मिरे शब्द हृदयाला भिडतो...
23 Apr 2010 - 2:50 pm | विसोबा खेचर
वा! वेगळ्याच चारोळ्या..!
आवडल्या.. :)
आपला,
(चंचीप्रेमी) तात्या.
23 Apr 2010 - 3:49 pm | मदनबाण
वा.आंबोळीराव. :)
आता आमच्या टाळकयातल्या ४ ओळी
तिरडी तयार असुन सुद्धा
अजुन कोणी मयत कसा झाला नाही
आंबोळी येउन देखील सुद्धा
कंदील कसा अजुन पेटला नाही...
(आंबोळीच्या कंदीलाला लयं घाबरणारा)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
23 Apr 2010 - 4:16 pm | धमाल मुलगा
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
अग्गाय्यायायायाया...... _/\_
दोन चारोळ्यांमध्ये दोन सुवर्णकाळांचं भावस्पर्शी चित्रण अगदी सहीसही उतरलं आहे असं कौतुकाने म्हणावेसे वाटते. ;)
आंबोळी गुर्जी,
अहो, आपल्या सिध्दहस्त लेखनाची किती वाट पहायला लावायची आपल्या चाहत्यांना? हे असं वागणं बरं आहे का? :D
23 Apr 2010 - 5:20 pm | टारझन
=)) =)) =)) =))) =)) =))
जबरा आंबॉळी =))
आजळ्या वेगळ्या चारोळ्या !! =))
- (गोली की) हम्जोली