म्युच्युअल फंड

शेखर जोग's picture
शेखर जोग in काथ्याकूट
22 Apr 2010 - 8:17 pm
गाभा: 

आपण मराठी माणसे गुंतवणूकीबद्दल फारच थोडा विचार करतो.
साधारणपणे गुंतवणूक म्हटली की आपण पी पी एफ, पोस्ट ऑफीस, इन्सुरन्स (नेहमीचा) यांचा विचार करतो.
आपण काही चाकोरी बाहेर विचार केला तर आपल्या गुंतवणूकीवर जादा मोबदला मिळेल का? असा विचार बरेचजण करण्याचे टाळतात.
माझे असे मत आहे( ते इतरांच्या दृष्टीने चुकीचे ही असू शकेल पण बर्‍याच जणांच्या फायद्याचे असेल) की होय!
ते शक्य आहे.
त्या अगोदर आपण गुंतवणूकीवर मिळणारा मोबदल्याचा तुलनात्मक अभ्यास कसा करायचा याचा विचार करू.
अरे बापरे! म्हणजे आली का पंचाईत.
आता ती त्रास देणारी आकडेमोड!
नाही ! मी मिळणारा मोबदला कसा विचारात घ्यावा याची सोपी पध्दत सांगतो.
ती म्हणजे '७२ चा नियम' !!!

साधे सोपे गणित. गुंतवणूकीचा जो दराचा मोबदला दिला असेल त्याने ७२ ला भागा.
तेवढ्या वर्षात तुमचे पैसे दुप्पट.
अर्थात या परिस्थीतीत असे गृहीत धरून चालले पाहिजे की तुमची गुंतवणूक पूर्ण मुदतीची असेल व उगाच काही सबब सांगून पैसे काढले जाणार नाहीत. (कठीणच आहे बाबा! नाही का)

उदा. जर तुम्हाला मोबदला १० टक्के वर्षाला मिळणार असेल. तर ७२/१०= ७.२ वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील.
दुसरे उदाहरण घेऊ म्हणजे हा नियम नक्की समजल्याची खात्री होईल.
समजा तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला २० टक्के नफा देत असतील तर ७२/२० = ३.६ वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील.
तर आता हे बघून घेऊ की पैश्याच्या बाजारात सर्वसामान्यासाठी असलेल्या गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या प्रकारात साधारण किती वर्षानी पैसे दुप्पट होतील.

बँकेतील मुदतीची ठेव साधारण वर्षाला व्याज : ६.७५%, ७% किंवा अगदिच फार तर ७.२५% सोयीसाठी ७ % धरायला हरकत नाही. तेव्हा हे पैसे दुप्पट होतील : ७२/७= १०.२८ वर्षानी
( बापरे! तरूण असू तर आजोबा होउ. आजोबा असू तर नातवाला मिळतील.)
खाजगी कंपनीत पैसे मुदतीच्या ठेवीत गुंतवल्यास : १०% ते ११% व्याज
तेव्हा हे पैसे दुप्पट होतील : ७२/१० = ७.२ वर्षानी. बहुतेक खाजगी कंपन्या साधारण एका वर्षासाठी पैसे मुदतीसाठी घेत नाहीत.
पोस्ट ऑफीस मधे मुदतीच्या ठेवीत ठेवले तर व्याज दर = ६.२५%
तर पैसे दुप्पट व्हायला लागतील :७२/६.२५= ११.२५ वर्षे म्हणजे परत म्हातारे झालोच की!
मग यावर उपाय शेअर मार्केटच!
बापरे म्हणजे नुकसान हमखास! असे सर्व म्हणतील.
जर शेअर बाजाराचा नफा व बर्‍याच प्रमाणात पैसे न जाण्याची खात्री झाल्यास कोणास नको आहे?
तेव्हा यावर उपाय म्हणजे म्युच्युअल फंड.
मी स्वत: बरीच वर्षे म्युच्युअल फंडमधे माझे स्वतःचे पैसे गुंतवित आहे व चांगला नफा कमावत आहे.
या वाटचालीत मी गुंतवणूकीची कुठली सुत्रे वापरली हे सांगण्याचा एक प्रयत्न.
क्रमशः

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

22 Apr 2010 - 9:25 pm | नितिन थत्ते

येऊदे अजून.

नितिन थत्ते

सविस्तर माहिती सांगा म्हणजे माझे काही गैरसमज दूर होतील...गुंतवणूकीबद्दल

(गुंतवणूकीस उत्सुक) पिंगू

chintamani1969's picture

22 Apr 2010 - 10:34 pm | chintamani1969

गुंतवणूकी सारखा अवघड विषय सोप्याभाषेत सुरु केल्या बद्दल शेखर जोगांचे अभिनंदन

चिंतामणी

तुमच्या चेहरा संदर बनवायचा सर्वात स्वस्त उपाय म्हणजे हसणे होय.

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Apr 2010 - 7:45 am | डॉ.प्रसाद दाढे

एम आय पी बद्दल थोडे लिहाल का? साठी ओलांडलेल्यांसाठी योग्य आहे का? अंदाजे तेरा ते चौदा टक्के व्याज व मूळ रक्कम कधीही काढण्याची सोय ही फिचर्स आकर्षक वाटतात.

झकासराव's picture

23 Apr 2010 - 9:03 am | झकासराव

लिहा लिहा.
मी सध्या फक्त टॅक्स सेव्हिंग मध्येच पैसे घालतो ते ही टॅक्स जातो म्हणून..
अजुन माहिती मिळाली तर गुंतवणूक म्हणुन विचार करता येइल.
ओपन एंडेड फंड घेता येतील..:)

वेडा कुंभार's picture

23 Apr 2010 - 10:31 am | वेडा कुंभार

खरेच खूप छान माहिती आहे. अजून माहिती लवकर येवूद्या.
मी सुद्धा सध्या फक्त टॅक्स सेव्हिंग मध्येच पैसे घालतो ते ही टॅक्स जातो म्हणून..
अजुन माहिती मिळाली तर गुंतवणूक म्हणुन विचार करता येइल.
सध्या Highest NAV देण्याचे पेव फुटले आहे, त्याबद्दल काही लिहाल का ?
खरेच तेवढा मोबदला मिळतो का?
==========================================
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

भारद्वाज's picture

26 Apr 2010 - 5:03 pm | भारद्वाज

व्वा छान आहे विषय. अजुन येऊ द्या. गुंतवणूक सुरु करताना काय काय करावयाचे याचं मार्गदर्शन झालं तर हवंच आहे....