(भांडणशब्द २)

Primary tabs

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
20 Apr 2010 - 12:10 pm

प्रेरणा शुचि यांची सुंदर कविता चांदणशब्द, व नामप्रेरणा ३_१४_अदिती यांची (न कळलेली) भांडणशब्द.
शुचिंच्या शृंगारिक कवितेचं समाजात दिसणाऱ्या झुंडशाहीच्या संदर्भातल्या कवितेत रूपांतर करायला मजा आली.

भांडणशब्द
प्रक्षुब्ध वाणी॥१॥
नग्न प्रतीके
ठायीठायी॥२॥
स्नायुप्रतापी
टवाळभाषा॥३॥
गरम माथा
केविल चडफड॥४॥
शब्द प्रसूती
हीन व हिणकस॥५॥
उसना आवेश
व्यर्थ हि धडपड॥६॥
कोण त्रुटीचे
कांपेन्सेशन?॥७॥
'सही' विडंबना-
सही विटंबन||८||

भयानकबिभत्सविडंबन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Apr 2010 - 12:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच! गुर्जींना हा हाफव्हॉली कसा दिसला नाही याचंचं आश्चर्य वाटत होतं.
(याच विषयावर आधी लिहायचं ठरवलं होतं, पण मुख्य संदेश समजायला चारजणला का महत्त्व द्यायचं म्हणून सोडून दिलं.)

अदिती

टारझन's picture

20 Apr 2010 - 12:45 pm | टारझन

हॅहॅहॅ ... हॅहॅहॅ ... हॅहॅहॅ
चालु द्या कौव्वाली चा पोग्राम :)
बाकी उसना आवेश , व्यर्थ धडपड इत्यादी वाचुन गडबडाट लोळलो =)) =)) =))

बाकी आमच्या मिर्‍या योग्य लोकांना बरोबर झोंबलेल्या पाहुन गम्मत वाटली :)

- सहिस मिर्‍याझोंबवी

झोड कोणाला | लागे कोणाला ||
घडीचा टाईमपास | बळेच व्यर्थ म्हणे धडपड ||
गार डोक्याने | भडकवली दोन डोकी ||
चालु झाली गुर्‍हाळे | उण्हाळ्यामधी ||
सहि विडंबण | आमुचा नारा ||
घासबसवी | वाढवी पारा ||
एका विडंबणे | झालासे कहर ||
सारे निकष | मारु फाट्यावर ||

राजेश घासकडवी's picture

20 Apr 2010 - 4:36 pm | राजेश घासकडवी

एकंदरीत कवितेच्या अर्थाविषयी गैरसमज असल्याचे प्रतिसाद वाचून लक्षात आलं. म्हणून खुलाशासाठी मी या कवितेचं रसग्रहण देतो आहे. कवितेतले शब्द, किंवा त्यांचे प्रतिशब्द अवतरणांत दिलेले आहेत.

मुळात म्हटल्याप्रमाणे आपल्या समाजात दिसणाऱ्या झुंडशाहीच्या प्रच्छन्न व एका अर्थाने बिनडोक प्रदर्शनाला उद्देशून ही कविता आहे. केवळ शक्तीच्या आधारे समाजाविरुद्धच काही लोक उभे राहातात व पुंडशाही करून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात (दुर्दैवाने यशस्वीही होतात) हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे.

माझ्या डोळ्यासमोर उदाहरण होतं ते मुतालिक प्रकरणाचं. तथाकथित उद्देश - संस्कृतीरक्षण. पण त्यांचा मार्ग धाकदपटशा करणे, दादागिरी करणे व त्यातून राजकीय बळ मिळवणे/वाढवणे (ज्याला जालिय भाषेत टीआरपी वाढवणे म्हणता येईल) हाच असतो. यासाठी त्या सेनांमध्ये बुद्धीहीन वानरांची भर होते. त्यांच्यात 'स्नायूप्रताप आणि टगेगिरी' याशिवाय काही नसतं, व झाडांच्या फांद्यावर उड्या मारणे व पारंब्यांवर लोंबकाळणे याशिवाय दुसरी काही कला अवगत नसते. मग व्हॅलेंटाईन्स डे वगैरेचं निमित्त करून तरुण पीढीशी 'प्रक्षुब्ध भाषेत भांडणशब्द' घेतले जातात. 'ठिकठिकाणी शक्तीची, बळजबरीची भाषा वापरून' आपल्या 'निर्लज्ज पणाची प्रतीकं' दाखवली (जाहीर केली) जातात. 'अतिशय हिडीस शब्द' वापरून 'सात्विक संतापाने माथी भडकावून' संस्कृती रक्षणाच्या आरोळ्या देतात खरे, पण ती मनातली तरुण पीढीला मिळणाऱ्या सुखांविरुद्धची सूप्त 'केविलवाणी चडफड' असते. 'उसना आवेश आणून ही फुकटची धडपड' शेवटी कशासाठी? त्यांना न मिळालेल्या सुखांचा हा जळफळाट आहे का? त्यांना तरुणपणी प्रेम व्यक्तच करता आलं नाही या 'कमीपणातून आलेलं हे द्राक्षं आंबट' म्हणणं आहे का?

'सही' विडंबना-
सही विटंबन||८||

हे कडवं जरा समजावून घेण्यासारखं आहे. त्याची फोड

विडंबनासही, 'सही' विटंबन

अशी आहे. (विडंबना शब्दानंतर '-' आहे विडंबनासही हा एक शब्द आहे हे दाखवण्यासाठी)
याचा अर्थ असा की मुतालिकांच्या वानरांनी जी लांच्छनास्पद कृत्य करून भारतीय संस्कृती रक्षणाच्या नावाखाली संस्कृतीची विडंबना केली त्याचं प्रत्युत्तर म्हणून मग तरुण पीढीलाही त्यांच्या तोंडावर काळं फासून त्यांची 'सही' (खरोखरची, उत्तम) विटंबना करण्याची वेळ आली.

अर्थातच एकदा कविता प्रसिद्ध झाली की कवीइतकाच वाचकांचाही कवितेच्या अर्थावर हक्क राहातो. त्यामुळे टारझन यांची प्रतिक्रिया वाचून त्यांनी नक्की काय अर्थ हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. त्यांनी खरोखरच काहीतरी वैयक्तिक, युनिक अर्थ काढलेला दिसतो.

बाकी आमच्या मिर्‍या योग्य लोकांना बरोबर झोंबलेल्या पाहुन गम्मत वाटली

त्यांनी नक्की कुठच्या मिऱ्या कोणाच्या डोक्यावर वाटून उधळल्या, व त्या कोणाला झोंबल्या अशी कल्पना झाली (व त्यातनं नक्की गंमत कशी झाली) ते सांगावं. कवितेच्या रसग्रहणात वेगवेगळ्या अर्थांनी भरच पडते असं माझं मत आहे. मग मिपावर असं लोकांना मिऱ्या झोंबवणं योग्य का हा प्रश्न दुय्यम ठरतो असं मला वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Apr 2010 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विश्व स्वयंकेंद्रीतच असतं असं कोणा तत्वज्ञाने म्हटलेलं चूक नाही आहे तर!

अदिती
(खास उपक्रमी चर्चाप्रस्तावकांसाठी काही शब्द, विशेषतः क्रियापदं अधोरेखित केली आहेत.)

टारझन's picture

20 Apr 2010 - 4:53 pm | टारझन

खुलाश्याबद्दल धन्यवाद :)

बाकी आमचा ही प्रतिसाद घेतला तर वैयक्तिक घेतला तर जेनेरिक असाच आहे :) हे शेवटी घेणार्‍यावर अवलंबुन आहे :) काहींना मिर्‍या झोंबतात तर काही उगाच स्वतःच अर्थ काढुन काही तरी ओरडत बसतात आणि स्वतःचे समाधान करुन घेत बसतात :)
जसं तुम्ही मागे आम्ही एका कवितेला दिलेला एक साधासरळ प्रतिसाद स्वत:वर ओढवुन घेतलेला शिवाय त्याच्याच वर "टारझन रडतो .. तात्याला सांगुन प्रतिसाद उडवुन घेतो " इत्याची टीमकी सोडली होतीत .. तेंव्हा हे मनाचे श्लोक वाचुन आमचं अंमळ मनोरंजन झालेलं हा भाग अलहिदा .

- टारेश खुलासाकर्वी

मनीषा's picture

20 Apr 2010 - 2:56 pm | मनीषा

सही भांडण !

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2010 - 6:40 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी.... रसग्रहण तर भारीच... :)

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

20 Apr 2010 - 9:08 pm | Nile

जबरा. रसग्रहण सुप्पार!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2010 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जबरा. रसग्रहण सुप्पार!

-

प्रकाश घाटपांडे's picture

20 Apr 2010 - 9:24 pm | प्रकाश घाटपांडे

रसग्रहन वाईट नाही आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2010 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रसग्रहन वाईट नाही आहे.

हॅ हॅ हॅ

स्पष्ट सांगा ना..! रसग्रहण चांगलं आहे म्हणून. :)

दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

20 Apr 2010 - 9:36 pm | प्रकाश घाटपांडे

रसग्रहन चांगले आहे नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Apr 2010 - 10:37 pm | llपुण्याचे पेशवेll

कविता आणि टार्‍याचा प्रतिसाद २न्ही उत्तम. चालूद्या.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix