बावळ्ट्पना

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in जनातलं, मनातलं
18 Apr 2010 - 10:31 am

मी वाशिला एक प्रदर्शन बघायला गेले होते... खुप दुकाने होती...फिरत फिरत मी एका ठिकाणी क्रोशाच्या वस्तु विकायला होत्या तिथे आले.....माझ्या मुलीसाठी एक पोन्चो आणि माझ्यासठी एक पर्स घेतली अणि नेहमिप्रमणे घासघिस सुरु झाली...शेवटी २८० रुपयावर येउन अडलो...परत " भैया थोडा कम करो..बहोत मेहेन्गा है" वगैरे सुरु झाले...

आता हे सान्गितले पाहिजे की मी सकाळपासुन काही फारसे खाल्ले नव्हते...आणि आता ४ वाजत आले होते....पोटात कावळे काव काव करत होते...पण आता माघार घेणे नाही...म्हणून घासघिस सुरुच ठेवली...शेवटी वैतगून दुकान्दार म्हणाला "अछा बेहेनजी तो १८० दे दो"..."दोनोके लिये?" .."हा".."लेकिन आपने तो बोल था २८०?" .."हा, वोहितो , बराबर है..२८०"...मी त्याला पैसे दिले आणि आता त्याला २८० का १८० देउ असे करत २८०च दिले आणि चालु लागले....आणि दोन मिनीटानि लक्शात आले काय झाले ते....सार काय तर उपशिपोटी भारतात असताना खरेदीला जाउ नये...घासघिस करताना डोक ठिकाणावर रहात नाही..

ता. क. - ईन्ग्रजी की बोर्डा वरून मराठी लिहिताना खूपच अवघड गेले...समजून घ्यावे..

शिल्पा

वावर

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

18 Apr 2010 - 10:46 am | कानडाऊ योगेशु

उपाशी पोटी डोके चालत नाही हेच खरे :S
माझ्याही बाबतीत असा प्रकार घडणार होता पण मित्रामुळे वाचलो.
दादरला ब्रिजखाली बूट विकत घेत होतो.२०० चे जोड घासाघीस करुन १२५ पर्यंत खाली आणले पण दुकानदाराला प्रत्येक बुटाचे १२५ असे समजुन २५० देणार इतक्यात मित्राला ताबडतोब लक्षात आले आणि त्याने माझ्या हातातुन पैसे जवळजवळ हिसकावुन घेतले आणि दुकानदाराला १२५च दिले.
अजुनही हा अनुभव आठवला कि मला कसेनुसेच होते.
जनरली ज्याठिकाणी फसवणुक होण्याची शक्यता असते अश्या ठिकाणी कोणाला सोबत घेवुन गेल्यास उत्तम.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

हेरंब's picture

18 Apr 2010 - 4:21 pm | हेरंब

एका बूटाची किंमत ही आयडियाच भन्नाट आहे. नशीब तुम्ही लेसचे पैसे वेगळे नाही समजलात!!!

कानडाऊ योगेशु's picture

18 Apr 2010 - 8:51 pm | कानडाऊ योगेशु

दुकानदाराने एकानंतर एक असे ते दोन्ही बूट दिले आणि माझा पढतमूर्ख दिमाग त्यापध्दतीने हिशोब करत बसला.
पण ह्यामुळे एक झाले पैसे देताना मी त्यानंतर थोडाफार सावध झालो.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

टारझन's picture

18 Apr 2010 - 11:12 am | टारझन

खरोखर कहर आहे बावळटपणा चा :) तसंही म्हैलांच्या बाबतीत ही गोष्ट नॅचरल कॅटॅगरीत मोडली जाते ... :) त्यामुळे काही "खास" नाही :)

बाकी अनुभव उत्तम ... तो दुकानदार आता चातकासारखी वाट पहाणार तुमची बहुतेक ..

अवांतर : बाकी मुंबैत लै भारी भारी उपनगरं आहेत. "वाशी" हे सर्वांत घाणेरडं वाट्टं

- (न्युमुंबैकर) सीबीडी टारझन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2010 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>तसंही म्हैलांच्या बाबतीत ही गोष्ट नॅचरल कॅटॅगरीत मोडली जाते ...

काही म्हैला की सर्वच म्हैला रे टा-या ? :)

बाकी, 'घासाघिशीच्या' बाबतीत म्हैलांचे खूप नाव आहे. :)

-दियुत्सु

रेवती's picture

18 Apr 2010 - 10:12 pm | रेवती

बिरूटेसर, मी एक महिला आहे तरी घासाघीस अज्जिबात जमत नाही.
हां, लेखाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर पोटात कावळे ओरडत असताना ही चूक कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत होवू शकते. लेखिकेला अनुमोदन देणारा प्रतिसाद कानडाऊ योगेशु यांचा आहेच!
रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2010 - 10:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>पोटात कावळे ओरडत असताना ही चूक कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत होवू शकते.

मान्य....!

>>मी एक महिला आहे तरी घासाघीस अज्जिबात जमत नाही.
अहो वहिनी, अपवाद असतातच ना ? आपण नसाल करत घासाघीस हेही मान्य.

काही आकडेवारी नाही, काही आधार नाही, पण मला उगाचच असे वाटते की, महिला घासाघीसीच्या बाबतीत पुरुषांना मागे टाकतील.

अवांतर : आमची 'ही' आहे ना, ती वस्तूंची खरेदी करुन आल्यानंतरही तिचे स्वगत चालूच असते. अजून कमी कीमतीत वस्तू मागितली असती तर दुकानदाराने दिली असती. :)

-दिलीप बिरुटे

राजेश घासकडवी's picture

18 Apr 2010 - 12:16 pm | राजेश घासकडवी

मी व माझा एक मराठी मित्र बेजिंगमधल्या एक मोठ्ठ्या मॉलसदृश दुकानात गेलो. खरं तर ते जरा चकाचक दिसणारा, बिल्डिंगच्या आतमध्ये असलेला रानडे रोडच होता. तिकडे आम्ही दोघं गरीब भारतीय असल्याचं चीनी, इंग्लिश, मराठी यांचा संस्कृतीसंगम करणाऱ्या भाषेत सांगितलं. आम्ही दोघे अमेरिकेत राहातो हे अर्थातच लपवून ठेवलं. असो. माझ्या मित्राने प्रचंड घासाघीस करून ८ डॉलर सांगितलेले लहान मुलाचे साताठ टीशर्ट ३ डॉलरला घेतले. दुकानदाराच्या चेहेऱ्याकडे बघून त्याने टाकलेल्या निश्वासावरून आम्हाला आमचा अभिमान वाटला. शेवटी भारतात घासाघीस करण्याचा अनुभव असल्याचा फायदा वाटला. एकंदरीतच स्वत:चं अभिनंदन करून बाहेर पडत असताना दुकानदाराने आपलं कार्ड दिलं आणि म्हणाला, 'कम अगीन'... त्याच्या सुहास्य वदनावरून आणि आम्हाला परत बोलवण्याच्या आतुरतेवरून आम्हाला सौदा जितका स्वस्त पडला त्यापेक्षा दुकानदाराला फायदेशीर पडला असं आम्हाला वाटलं...

त्याने जर ते कार्ड दिलं नसतं तर दुसऱ्या दिवशी आम्ही परत त्याच दुकानात जाऊन कदाचित आणखी खरेदी केली असती...

अरुंधती's picture

18 Apr 2010 - 1:49 pm | अरुंधती

भरल्या पोटी - डोळ्यांवर सुस्ती आलेली असताना, उपाशी पोटी - भुकेने जीव मेटाकुटीला आलेला असताना, तहानेने घशाला जाम कोरड पडली असताना, नैसर्गिक आवेग असह्य झाला असताना शहाण्याने खरेदीच्या वा घासाघिशीच्या भानगडीत पडू नये....स्त्री अथवा पुरुष.... हमखास तोंडावर आपटण्याचे चान्सेस जास्त असतात...

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

II विकास II's picture

18 Apr 2010 - 5:12 pm | II विकास II

घासाघीस करण्यासाठी कमालीची चिकाटी, भरपुर वेळ, विक्रेतेचे तुच्छ कटाक्ष सहन करण्याचा निर्लज्जपणा, सांगतलेल्या दराच्या १/४ (स्थळाप्रमाणे हे प्रमाण बदलु शकते.) ह्या गोष्टी हव्याच. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, मला ह्या वस्तुची गरज नाही, पण मी घेतो आहे, हे दाखवता आले पाहीजे.

पर्नल नेने मराठे's picture

18 Apr 2010 - 6:20 pm | पर्नल नेने मराठे

लहानपणी मी मैत्रिणीबरोबर रद्दी विकायला गेले होते.
रद्दीवाला म्हणाला ३.५० ने घेइन. मैत्रिण तयार झाली.
मी म्हणाले अग भाव कर ना, कमी करेल तो =))
असे करुन मी २.५० ने रद्दी विकली.
घरी आल्यावर तिच्या आईला तिने आनंदाने मी केलेला व्यवहार सान्गितला. तिची आई अशी >>>> :T

चुचु

प्रमोद देव's picture

18 Apr 2010 - 7:00 pm | प्रमोद देव

भले शाबास चुचुतै!
=)) =)) =)) =)) =))

अरुंधती's picture

18 Apr 2010 - 8:28 pm | अरुंधती

हा हा हा.... चुचु... सह्हीच!
=)) =))
मैत्रिणीच्या आईने तुला परत कधी मैत्रिणीबरोबर पुन्हा खरेदीला जाऊ दिले का गं?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मी-सौरभ's picture

19 Apr 2010 - 12:18 am | मी-सौरभ

=)) =)) =)) =))

-----
सौरभ :)

प्रमोद्_पुणे's picture

19 Apr 2010 - 12:47 pm | प्रमोद्_पुणे

....१ नंबर....

स्वाती२'s picture

19 Apr 2010 - 8:18 pm | स्वाती२

=)) =)) =)) =))

मदनबाण's picture

18 Apr 2010 - 9:11 pm | मदनबाण

भारी धागा !!!

चुचु ताई लै भारी !!!
हसुन हसुन पोट दुखायला लागले आहे...शेख चिल्ली असता तर तोही भोवळ येउन पडला असता... :D

असच एकदा मी दुकानातुन सामान घेउन बाहेर पडत होतो,तेव्हा दोघ नवरा बायको एका बाईकवर बसुन दुकाना जवळ आले. बाईक पार्क केली आणि दुकानात शिरले...मी बाजुच्या दुकानात दुसर्‍या वस्तु आणण्यासाठी शिरलो...थोड्या वेळाने मी निघालो...पाहतो तर माझ्या समोर मघाशी बाईकवर आलेल जोडप पायी आत (कॉलनीत)चालल होत..तेव्हढ्यात ती बाई आपल्या नवर्‍याला ओरडली...अहो बाईक दुकानाबाहेरच पार्क करुन विसरलो. :D

मी मनात म्हंटल,,, नशीब बायकोला विसरुन... स्वतः बाईकवर बुसुन तिचा नवरा आत गेला नाही ते !!! ;)
मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
सामान्य मुंबईकर :---
http://mazeyoutube.blogspot.com/2010/04/blog-post_18.html

पर्नल नेने मराठे's picture

19 Apr 2010 - 11:41 am | पर्नल नेने मराठे

ह्म्म्..अजुन एक्. काही कामानिमित्त आम्ही व आमचा एक मित्र बाहेर जाणार होतो. मित्राला पार्किन्ग मिळत नव्ह्ते त्यामुळे तो वैतागुन आम्च्या घराभोवती घिरट्या मारत होता. आम्ही ५ मिनिटात खाली येतोच असे त्याला म्हटले व बोलता बोलता लिफ्टमधे शिरलो. काही वेळाने त्याच्या परत फोन आला, तो म्हणाला १५ मिनिटे होउन गेलित आहात कुठे. तेव्हा लक्शात आले आम्ही बोलत बोलत १५ मिनिटे लिफ्ट मधेच उभे व खाली जायचे बटण दाबलेच नव्हते, ह्याला वाटले मी दाबले मला वाटले ह्याने दाबले. 8|
चुचु

मेघवेडा's picture

19 Apr 2010 - 12:51 pm | मेघवेडा

=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))

१५ मिनीटे लिफ्टमध्येच??? खरंच शेखचिल्लीसुद्धा म्हणाला असता, चुचु तुस्सी ग्रेट हो!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

वारा's picture

18 Apr 2010 - 10:39 pm | वारा

दिल्ली मध्ये ब्यागा घेताना आलेला अनुभव.
आमचा एक मित्र करोल बाग मधे ब्याग घेत होता. त्याने घासाघीस करुन ३५०/- रु ची ब्याग २८०/- रु ला घेतली. नन्तर तोच माणुस तिच ब्याग आम्हाला २५०/- रु ला देऊ लागला मित्राला वाटले दोन घेतल्यामुळे स्वस्तात देत असेल त्याने तिही ब्याग घेतली . थोड पुढे गेल्यावर दुसरया मासणाने या दोन ब्यागा बघुन आम्हि कोणी होल्सेलर असेल म्हणुन तिच ब्याग आम्हाला १८० रु ला दिली. बावळट्पणा दुसर काय. (तो मित्र दुसरा तिसरा कोण नसुन स्वतः मिच होतो.)

भानस's picture

19 Apr 2010 - 12:09 am | भानस

खरेयं उपाशी पोटी काही सुचत नाही.... हमखास घोळ घातला जातो. शिवाय आधी चीडचीड चाललेली असतेच ती कसे मस्त गंडले गेलो हे लक्षात आले की ती अजूनच वाढते...:( बाकी चुचु भले शाब्बास गं.... :)

शुचि's picture

19 Apr 2010 - 5:48 am | शुचि

शिल्पा छान मनोरंजन केलत. तसच शिकायलाही मिळालं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

इन्द्र्राज पवार's picture

19 Apr 2010 - 9:05 pm | इन्द्र्राज पवार

कन्याकुमारी येथील खरेदीचा बावळटपणा ~~~
विवेकानंद रॉक मेमोरीअल पाहून झाल्यानंतर कन्याकुमारी येथील "सूर्यास्त" पाहणे हा एक मोठा गाजावाजा झालेला कार्यक्रम असतो. इतका कि जो पर्यंत सुर्यनारायण अस्ताला जात नाहीत तो पर्यंत सागर किनारी अक्षरश: कोणतीही हालचाल नसते (आय मीन... विक्रेत्यांची..!). एकदा का हा क्षण संपला कि तुमच्या कारभोवती मोहोळ येते. तुम्हास तेथे दक्षिणेकडील इतर वस्तुसमवेत साड्यांचे अनेक प्रकार, जे आपण पुस्तकात वाचत असतो, वा दक्षिणेकडील चित्रपटातून पाहत असतो, ते घेऊन, खांद्यावर टाकून, विक्रेते येतात. एरवी तमिळनाडू आणि केरळा इथे हिंदी भाषा तोंडातून बाहेर काढायला जणू सक्त मनाई, मात्र कन्याकुमारीचा सागरी किना-यावरील हा बाजार त्याला अपवाद. जवळपास सर्व विक्रेते हिंदी सहज बोलतात, दोघे तर आमच्या सुमोची नंबर प्लेट MH-09 पाहून चक्क मराठी बोलू लागले होते. बहिणीसाठी काही साड्या मीनाक्षी मंदिरच्या परिसरात घेण्याचा विचार सर्वांचाच होता. तरीही आता इथे समोर आलाच आहे तर एक साडी घ्यावी म्हणून नित्याची घासाघीस सुरु झाली. त्याच्याकडे शेवटच्या म्हणून दोनच साड्या होत्या व दोन्हीही एकाच किमतीच्या म्हणून त्याने सांगितल्या (म्हणजे प्रत्येकी ७०० रुपये....). अर्थात अशा ठिकाणी तो सांगेल ती किमत कुणीच देत नसते, त्यानुसार दुस-या मित्राने कमी करत करत त्याने मला ती साडी ४५० रुपयाला द्यायला लावली. मलाही बरे वाटले कारण अशा खरेदीचा माझा अनुभव शून्यच होता. तो विक्रेता आता तशीच दुसरी साडीही (शेवटची असल्याने ...) घ्या म्हणून सुमोतील अन्य मित्रांच्या मागे लागला, म्हणजे असे कि, "आता काय बाजार संपला, मलाही परत गावी जायचे आहे, कशाला ही साडी घेऊन जाऊ, तुम्हीच घ्या..." इ. इ. कशीबशी कटकट टाळावी म्हणून माझ्या शेजारी बसलेला मित्र कावेबाजपणे म्हणाला, "अर्रे माझ्याकडे काय इतके पैसे नाहीत, तू ही साडी २०० रुपयाला देतोस का, ते बोल !" यावर त्या विक्रेत्याने झटकन खांद्यावरील ती दुसरी साडी त्या मित्राच्या अंगावर टाकली व म्हणाला, "दिली, द्या २०० रुपये...". तो मित्र तर मुकाच झाला, पण त्यापेक्षा मला जो धक्का बसला तो वर्णन करण्यासारखा अजिबात नव्हता. मित्राने दोनशेला ती साडी घेतली व तो विक्रेता नोटा खिशात घालत असताना मी सात्विक संतापाने त्याच्यावर ओरडलो, "अर्रे, पण आताच दोन मिनिटापूर्वी हीच साडी तू मला ४५० रुपयांना दिलीस कि !" "होय दिली, तुम्ही २०० ला मागितली असती तर तुम्हालाही दिली असती." आणि तो चालता झाला. या प्रसंगावर सुमो मध्ये माझ्या मित्रांनी मीनाक्षी मंदिर येईपर्यंत जो "मोरू" केला तो शब्दातीत आहे. या अनुभवाने मी मदुराई इथे एक रुपयाचीदेखील खरेदी केली नाही.

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"