संचित
मी शोधितो आधार माझ्या जन्माचा
कि भोगावया आलो मी भाग संचिताचा
शौर्यास भेटली जेथे लज्जा प्रणयात्
माझ्याच जाणिवेची होती ती सुरवात
देहात नव्या होता संस्कार गतजन्माचा
कि भोगावया आलो मी भाग संचिताचा
लाभली मोहक कांती डोळ्यांमध्ये तेज
वैभवात नटले आहे स्वरांसूराचे साज
सहज का लाभावे असेल योगी मी जन्मांचा
कि भोगावया आलो मी भाग संचिताचा
रोज खुणावते एक मृग का गिरीशिखरावरती
का ओळखिची वाटे मज वाट ही वैराग्याची
आता न मन रमावे मोहात संसाराच्या
कि भोगावया आलो मी भाग संचिताचा
(स्वरचीत. हक्क संरक्षित)
शैलु.
प्रतिक्रिया
5 Apr 2010 - 8:48 pm | शुचि
सुंदर!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!
6 Apr 2010 - 1:09 pm | shaileh vasudeo...
धन्यवाद शुचि,
आपल्या नावावरुन ....
कवितेची मुळ कल्पना गीतेतील ह्या श्लोकातून आली आहे..
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः!
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभि जायते !!
अ.६ श्लोक ४१
फ़ोड:
योगभ्रष्ट: पुण्यकॄतां लोकांन् प्राप्य शाश्वतीः समाः उषित्वा शुचीनां श्रीमतां गेहे अभिजायते.
अर्थ:
तो जीव पूर्व जन्मातील योगभ्रष्ट असल्याने श्रीमंत होतो,(श्रीमंतीचा अर्थ पैसा एवढाच अभिप्रेत नाही)
तसेच पूर्व जन्मातील योगभ्रष्ट असल्यानेच तो पुन्हा त्या मार्गाकडे ओढला जातो.
शैलु.
6 Apr 2010 - 9:46 pm | शुचि
१० ते १२ वर्षापूर्वी गीता रहस्य वाचलं होतं. अतिशय म्हणजे अतिशय आवडलं होतं (अर्थात जितकं कळलं तितकं)
कर्माचे मला वाटतं ४ प्रकार विषद केले होते -
(१) संचित कर्म
(२) प्रारब्ध कर्म
(३) आगामी कर्म
(४) क्रियमाण कर्म
संचित कर्म - जन्मानुजन्मांचे साठलेले कर्म ज्याचा की अनेकानेक जन्म घेऊन निचरा करायचा आहे.
प्रारब्ध कर्म - ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो ते. या जन्मी भोगायचं आहे ते.
आगामी कर्म - आपण जे करतो आणि ज्यामुळे संचित कर्माची पुंजी वाढत रहाते असं कर्म
क्रियमाण कर्म - जे की "is in action" म्हणजे मी चोरी केली मला तत्काळ शिक्षा झाली. फिट्टंमफाट झाली. कर्माचा तेथल्या तेथे निचरा झाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!