आस ! जन्मो जन्मीची ! !

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
5 Apr 2010 - 3:39 pm

आस ! जन्मो जन्मीची ! !

मस्तीत होतो मी बरा,
का साद मजला घातली ?
ना जंर होणार माझी
का आस वृथा हि दाविली ?

याद तव नाही असा,
क्षण एकहि न पाहिला.
वेदनांचा अधिकार मजला
तोही तू ना ठेविला !

घेवूनी सल ही उरी,
जन्म हा काढू कसा ?
वेदनांचे शब्द हृदयी
जपुनी मी ठेऊ कसा ?

लागले नेत्र पैलतीरी अता,
कुरवाळू कुठवर यातना.
तोडून बंध सारे तू,
ये मज आता भेटण्या ! !

ना जंर तू मज भेटली
येईन परतुनी मी पुन्हा,
घेउनिया जन्म दुसरा
शोधित तव पाऊलखुणा ! ! !

निरंजन वहाळेकर

शृंगारकरुणकविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

5 Apr 2010 - 5:04 pm | शुचि

व्याकुळ करणार्‍या भावना. आयुष्याला वेढलेली अ-पू-र्ण-ता.
कविता आवडली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
But the moon is death.
Its cold rocks fill my belly as if I had
swallowed song of birds
and awakened in a tree.