पाणिग्रहण

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
3 Apr 2010 - 10:01 pm

पाणिग्रहण.........
रुढिन ठसवलेल
इतरानि सुचवलेल 8>
तु मनोमन असशिल जाणल
तर हा हात धर

र॑ग रुप शरिर
मनि जाचत नसल
त्या पलिकडे तुझ मन पोचल
तर हा हात धर

माझ्या मनिचा भाव
माझ्या भावनन्चि गुम्फण
हे सर्व तुला पुरेपुर उमगल्...भावल
तर हा हात धर

या प्रितिच प्रतिबिम्ब
तुझ्या मनाच्या आरशात
अगदि अस्सच उमटल
तर हा हात धर

घेण्यापेक्शा देण्या कड
रागापेक्शा लोभाकड
जर तुझ मन झुकल
तर हा हात धर......

लेखक हो तुमच्यासाठि...
अपर्णाचा सलामि नगमा चु.भु.द्या.घ्या.

शांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2010 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाणिग्रहण करण्यासाठी मांडलेल्या अटी आवडल्या.
पण पहिल्या काही ओळींचा काय अर्थ लागेना पाहा. :S
[रसग्रहणासाठी कोणी मदत करेल का ? ]

पुढील कवितेसाठी शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

kanhegaonkar's picture

4 Apr 2010 - 4:02 pm | kanhegaonkar

छानच
खुपच सुन्दर मनातले सर्व भाव आतिशय योग्य शब्दात मान्डलेले
झकास
मनोज