आमची प्रेरणा मिल्याची सुंदर गझल पंढरी
वदंता वाटते आता.. कहाणी जी खरी होती
त्वचा ही आमची काळी कधी ती पांढरी होती
तिच्या बद्दल मते माझी जराशी वेगळी होती
जवळ जाता मला कळले..दरी होती बरी होती
तशी नव्हती भिती मजला जरा ही सासर्याची पण
घरामधली तिच्या कुत्री.. जराशी चावरी होती
तिला भेटायला जाईन का मी रिक्त हातांनी?
चिलखताच्या बरोबर ढाल ही माझ्या करी होती
तिच्या हातातले डाव्या लाटणे वाटले साधे
बुडावर अदळता कळले अरे ती डावरी होती
घरी यावे नि समजावे, कुणी मुक्काम ठोकावा
शयनकक्षी निजे सासू.. अम्हाला ओसरी होती
म्हणे येणार ती जी शेवरी सम ऐकले होते
उडालो पाहता ती दोनशे(च्या ही) वरी होती
मला सांगूनही "केश्या" न कळला अर्थ कवितेचा
तुला पण वाटले.. केली तुझी मी मस्करी होती
प्रतिक्रिया
29 Mar 2010 - 6:19 am | राजेश घासकडवी
छान...